Wednesday 26 June 2024

भारतीय राष्ट्रध्वजाचा विकास.



●पहिला राष्ट्रध्वज : १९०२ रोजी ʼस्वामी विवेकानंदʼ आणि ʼभगिनी निवेदिताʼ यांनी भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार केला. 


●हा राष्ट्रध्वज स्वदेशी चळवळ अंतर्गत दिनांक ७ ऑगस्ट १९०६ रोजी कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजी द्वारा पारसी बाग चौक (ग्रीन पार्क) येथे फडकविला गेला.


● हिरवा, पिवळा, लाल रंगाच्या या राष्ट्रध्वजात वरच्या पट्ट्यात एकूण ८ कमळ व खालच्या पट्ट्यात ʼसूर्यʼ आणि ʼचंद्रʼ यांचे चित्र आहे. तर मधल्या पट्ट्यात 'वंदे मातरम' हे स्वदेशी चळवळीतील घोषवाक्य आहे.


●द्वितीय ध्वज : १९०७  रोजी जर्मनी येथील 'स्टटगार्ट' शहरात झालेल्या ७ व्या 'आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात' भारताचे क्रांतिकारी 'मॅडम भिकाजी कामा' यांनी सहभाग घेतला होता.


● या संमेलनात दिनांक २२ऑगस्ट १९०७ रोजी 'मॅडम भिकाजी कामा' द्वारा भारताचा राष्ट्र ध्वज फडकावण्यात आला.


● हा राष्ट्रध्वज भगवा,पिवळा आणि हिरवा रंगाचा असून वरच्या पट्ट्यात ८ चांदण्या असून खालच्या पट्ट्यात 'चंद्र' व 'सूर्य'चे चित्र आहे.


● यातील भगवा, पिवळा आणि हिरवा रंग म्हणजे अनुक्रमे बौद्ध, हिंदू, मुस्लिम यांचे प्रतीक आहे.


●वरच्या पट्ट्यातील ८ चांदण्या म्हणजे ब्रिटिशांचे भारतातील आठ विभाग होय.


● खालच्या पट्ट्यात सूर्य व चंद्र यांचे चित्र असून हे हिंदू व मुस्लिम यांचे सन्मानचिन्ह आहे.


●मधल्या पट्ट्यात क्रांतिकारी चळवळीचे घोषवाक्य 'वंदे मातरम' लिहिलेले आहे.


●तृतीय ध्वज : १९१६ रोजी झालेल्या 'लखनऊ करारा'न्वये काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे ऐक्य झाले.


● या पार्श्वभूमीवर १९१७ रोजी कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. ऍनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'होमरूल लीग चळवळीत' भारताचा तिसरा राष्ट्रीय ध्वज तयार केला व फडकविला.


● या राष्ट्रध्वजात ५ लाल पट्ट्या व ४ हिरव्या रंगाच्या पट्ट्या आहेत. लाल व हिरवा रंग हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला गेला.


● झेंड्याच्या एका कोपऱ्यात युनियन जॅक तर दुसऱ्या कोपऱ्यात चंद्र व चांदणी आहे.


● या झेंड्यात एकूण ७ चांदण्या असून या चांदण्या म्हणजे सप्तऋषींचे प्रतीक आहे.


●चौथा ध्वज:  १९२१ रोजी काँग्रेसचे अधिवेशन 'विजयवाडा' येथे भरले असता आंध्र प्रदेशातील युवक 'पिंगली वेंकय्या' यांनी बनवलेला झेंडा महात्मा गांधीजींना दिला.


● या झेंड्यात सुरुवातीस हिरवा व लाल रंग होता. हा रंग म्हणजे  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले गेले. या झेंड्यामध्ये गांधीजींनी बदल करून त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा अन्य समुदायाचे प्रतीक म्हणून जोडला तसेच स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून चरख्याचा पहिल्यांदाच समावेश केला गेला.


● पाचवा ध्वज : १९३१ रोजी भारतीय राष्ट्रध्वज साठी काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सरदार वल्लभाई पटेल होते.


● या ठरावानुसार पहिल्यांदाच तिरंगी झेंडा चा स्वीकार करून केशरी,पांढरा, हिरवा अशा रंगातील झेंड्याचा स्विकार करुन चरख्याचाही त्यात समावेश केला. 


●१९३१ रोजी ठराव झालेल्या ध्वजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे "ध्वज हा कोणत्याही धर्माचा प्रतीक नाही तर संपूर्ण देशातील समुदायांचं प्रतिनिधित्व करणारा आहे." असा ठराव पहिल्यांदाच येथे मंजुर करण्यात आला.


● सहावा ध्वज : भारतीय संविधान सभेत 'राष्ट्रध्वज तदर्थ समिति' गठन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते.


● दिनांक २२ जुलै १९४७ रोजी भारताच्या संविधान सभेने वर्तमान राष्ट्र ध्वजाचा स्वीकार केला.


● राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी ३:२ असुन यावर मधोमध पांढऱ्या पट्ट्यावर चरख्या ऐवजी सारनाथ स्थित अशोक चक्राचा समावेश करण्यात आला.


● अशोक चक्रा मध्ये एकूण चोवीस आर्‍या असून दिवसातील २४ तास प्रगतीच्या मार्गावर चालणे हा यामागे मुख्य उद्देश आहे.


● राष्ट्रध्वज हा खादी कापडापासून बनवावा तसेच सुती,रेशीम, वुल कापडाचा ध्वज बनवण्यास हरकत नाही.


● मात्र हा ध्वज चरख्यावर तयार करावा किंवा ध्वजाची शिलाई करताना खादीचा धागा वापरावा.


● राष्ट्रध्वज संहिता 2002 नुसार, भारताच्या नागरिकास वर्षभर (३६५ दिवस) राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार प्राप्त झाला.

मात्र सूर्यास्त झाल्यानंतर झेंडा उतरविणे अनिवार्य आहे.


● "झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा." हे गीत श्यामलाल गुप्ता यांनी लिहिले.


● हे गीत सर्वप्रथम १३एप्रिल १९२४ रोजी 'जालियनवाला बाग शोक दिवसा' निमित्त फुलबाग चौक कलकत्ता येथे गायले गेले.

या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते.


●१९३८ रोजी हरीपुरा अधिवेशनात सरोजिनी नायडू द्वारा हे गाणे पुन्हा गायले.


● १९४८ रोजी 'आजादी की राह पर' या चित्रपटात सरोजनी नायडू यांनी हे गीत गायले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...