Wednesday 26 June 2024

कोण होते फिरोज गांधी: जाणून घेऊया....



● फिरोज गांधी यांचा जन्म 12 सप्टेंबर 1912 रोजी मुंबईतील पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जहांगीर आणि आईचे नाव रतिमाई होते .


● ते मुंबईतील खेतवाडी परिसरातील नौरोजी नाटकवाला भवनात राहत असत. फिरोजचे वडील जहांगीर किलिक निक्सन येथे अभियंता होते, नंतर त्यांची वॉरंट अभियंता म्हणून पदोन्नती झाली.


● फिरोज त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात लहान होता; त्यांना दोराब आणि फरीदुन जहांगीर, अशी दोन भाऊ आणि , तहमिना कार्शश अशा दोन बहिणी होत्या. 


● फिरोज यांचे कुटुंबीय मूळचे दक्षिण गुजरातमधील भरुचचे असून त्यांचे वडिलोपार्जित घर अजूनही कोटपारीवाडमध्ये आहे.


● 1920 च्या दशकाच्या सुरूवातीच्या वडिलांच्या निधनानंतर, फिरोज आपल्या आईसह अलाहाबादमधील आपल्या अविवाहित काकू, शिरीन कमिश्शरी यांच्या कडे राहिला गेले.


● फिरोज यांचे प्रारंभिक शिक्षण अलाहाबादमधील विद्या मंदिर हायस्कूलमध्ये झाले आणि त्यानंतर त्यांनी इव्हिंग ख्रिश्चन कॉलेजमधून शिक्षण घेतले.


● फिरोज हे तेथील लेडी डफरीन रुग्णालयात कामाला होते. तेथे त्यांची ओळख इंदिरा नेहरू यांच्याशी झाली. त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी लग्न केले. इंदिरा गांधी या पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कन्या होत्या. त्यांना राजीव गांधी आणि संजय गांधी असे दोन मुले झाली.


● फिरोज गांधी हे एक भारतीय राजकारणी आणि पत्रकार होते . ते लोकसभेचे सदस्यही देखील होते. 


No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...