Friday 27 November 2020

मराठी व्याकरण - काळ ओळखा.


● *क्रिया चालू असते, तेव्हा क्रियापद वर्तमानकाळी असते.*

● *क्रिया पूर्वी झालेली असते, तेव्हा क्रियापद भूतकाळी असते.* 

● *क्रिया पुढे व्हायची असते, तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते.*


🔹 *खालील वाक्यांचा काळ ओळखा.*


*(१) सुप्रिया पुस्तक वाचते.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(२) सुमितने पुस्तक वाचले.*

उत्तर -- भूतकाळ


*(३) चंदना पुस्तक वाचील.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(४) आर्यन चित्र काढतो.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(५) धिरजने चित्र काढले.*

उत्तर -- भूतकाळ


*(६) आदित्य चित्र काढील.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(७) सानिया साखर खाते.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(८) सृष्टीने साखर खाल्ली.*

उत्तर -- भूतकाळ


*(९) रोहिणी साखर खाईल.* 

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१०) ताई शाळेत जाते.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(११) माई शाळेत गेली.* 

उत्तर -- भूतकाळ


*(१२) बाई शाळेत जाईल.*

उत्तर -- भविष्याकाळ


*(१३) आम्ही अभ्यास करतो.* 

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(१४) आम्ही अभ्यास केला.*

उत्तर -- भूतकाळ


*(१५) आम्ही अभ्यास करू.* 

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१६) पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते.*

उत्तर -- भूतकाळ


*(१७) उद्या आमची सहल जाईल.*

उत्तर -- भविष्यकाळ 


*(१८) मी अभ्यास करतो.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(१९) गाय चारा खाते.*

उत्तर -- वर्तमानकाळ 


*(२०) म्हैस चारा खाईल.* 

उत्तर -- भविष्यकाळ

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...