Friday 1 January 2021

शनिवारच्या कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड.


🔰 कोरोना लसीकरणाचा ड्राय रन उद्या देशभर होणार असून त्यासाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. 


🔰 कद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केल्याचं त्यांनी सांगितलं.


🔰 ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातली तीन आरोग्य केंद्रं निवडली आहेत. तीनही  ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडलं जाईल. मात्र प्रत्यक्षात लस टोचली जाणार नाही. पण त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. 


🔰 परत्यक्ष लसीकरणाच्या दृष्टीनं काही उणिवा राहिल्या असतील तर त्या दूर करण्याच्या दृष्टीनं या ड्रायरनचा मोठा उपयोग होईल, असं टोपे यांनी सांगितलं.


🔰 लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तिनं कक्ष केले जातील. 


🔰 पण्यातलं जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातलं जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातलं डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचं शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातलं शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...