Saturday 6 February 2021

लसीकरणानंतरही रुग्ण वाढले, सौदी अरेबियात भारतासह २० देशातील विमानांना प्रवेशबंदी
🔶भारत, अमेरिकेसह जगातील २० देशांच्या प्रवासी विमानांना सौदी अरेबियाने प्रवेशबंदी जाहीर केली आहे. सौदी अरेबियात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून २० देशातील प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करत असल्याचे सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी जाहीर केले.


🔶भारताशिवाय पाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, जपान आणि अन्य देशाच्या प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड या देशांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.


🔶प्रवेशबंदीच्या या नियमातून राजनैतिक अधिकारी, सौदीचे नागरिक, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना सवलत देण्यात आली आहे. सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. सौदी अरेबियात आतापर्यंत ३ लाख ६८ हजार नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. ६,४०० नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...