Saturday 6 February 2021

डेन्मार्क देशात जगातील प्रथम ऊर्जा बेट उभारला जाणार🔶डन्मार्क सरकारने उत्तर समुद्रात जगातील पहिले ऊर्जा बेट उभारण्यासंबंधीच्या प्रकल्पाला परवानगी दिली आहे.


🔶या प्रकल्पामुळे युरोपीय देशांमधील 3 दशलक्ष कुटुंबांच्या विजेची गरज भागविण्यापुरती पुरेशी हरित ऊर्जा उपलब्ध होणार आणि ती तिथे साठवून ठेवली जाऊ शकते.


▪️प्रकल्पाविषयी 


🔶हा प्रकल्प जवळपास 120,000 चौ. मीटर एवढ्या क्षेत्रात उभारला जाणार आहे.हा प्रकल्प समुद्रातील शेकडो पवन चक्क्याच्या जाळ्याला जोडले जाणार आहे.


🔶हा प्रकल्प जलवाहतुक, विमानचालन, उद्योग आणि अवजड वाहतुकीसाठी हरित हायड्रोजन तसेच घरांना वीज या दोन्ही गोष्टी पुरविणार.

डेन्मार्क हा उत्तर युरोप व स्कॅंडिनेव्हिया प्रदेशातील एक देश आहे. कोपनहेगन ही देशाची राजधानी आहे. डॅनिश क्रोन हे राष्ट्रीय चलन आहे.


🔶उत्तर समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. हा समुद्र उत्तर युरोपात ग्रेट ब्रिटन, स्कॅंडिनेव्हिया, बेल्जियम व नेदरलँड या देशांच्यामध्ये स्थित आहे. उत्तर समुद्र अटलांटिक महासागरासोबत दक्षिणेला इंग्लिश खाडी तर उत्तरेला नॉर्वेजियन समुद्राद्वारे जोडला गेला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...