Saturday 6 February 2021

"मनुष्यबळ भांडवलाचे पुनरूज्जीवन"▪️राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व घटकांचा समावेश करून 15,000 शाळांना बळकट करणार; स्वयंसेवी संस्था, खाजगी शाळा आणि राज्ये यांच्याबरोबर भागीदारी करून नवीन 100 सैनिकी शाळांची स्थापना करणार.


▪️उच्च शिक्षण आयोगाच्या स्थापनेसाठी कायदा आणणार. यामध्ये सर्व गोष्टी एकाच छताखाली करणे शक्य व्हावे यासाठी स्थापना, मान्यता, नियमन आणि निधी यांच्यासाठी मानके निश्चित करणार; सर्व शासकीय महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था यांना एकाच छताखाली आणून एक महारचना तयार करणार; लडाखमध्ये उच्च शिक्षणाच्या सुविधेसाठी लेह येथे केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणार.


▪️आदिवासी क्षेत्रामध्ये 750 एकलव्य निवासी शाळा स्थापन करणार; आदिवासी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्यावर भर देणार; अनुसूचित जाती कल्याण अंतर्गत मॅट्रिक/दहावी नंतर देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा; केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या 35,219 कोटी रुपयांच्या मदतीमध्ये सहा वर्षासाठी म्हणजे 2025-26 पर्यंत वाढपदव्युत्तर शिक्षण उमेदवारी, पदवी प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी पदविकाधारक यांच्यासाठी विद्यमान राष्ट्रीय उमेदवारी प्रशिक्षण योजनेच्या पुनर्गठनासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद; संयुक्त अरब अमिरात कौशल्य पात्रता, मूल्यांकन, प्रमाणपत्र आणि प्रमाणित कर्मचारी नियुक्त करण्यास मान्यता.


▪️डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्यासाठी 1,500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावितराष्ट्रीय भाषा अनुवाद मिशन (NTLM) याचे कार्य करणार. त्यामध्ये सरकारी योजना आणि त्यासंबंधित धोरणात्मक माहिती प्रमुख भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणार.


▪️न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्यावतीने PSLV-CS51 याचे प्रक्षेपण करणार यामध्ये ब्राझिलच्या अॅमेझोनिया उपगृहाचे आणि काही भारतीया उपग्रहांचे प्रक्षेपण करणार.


▪️गगनयान मोहिमेअंतर्गत, भारतीय 4 अंतराळवीरांचे रशियातल्या जेनेरिक स्पेस फ्लाईटव्दारे प्रशिक्षण सुरू आहे; पहिल्या मानवविरहित यानाचे डिसेंबर 2021 मध्ये प्रक्षेपण केले जेल.


▪️अतिखोल सागरात जलसंपत्तीच्या आणि सागरी जैवविविधता संवर्धन मोहिमेसाठी पाच वर्षात 4000 कोटी रुपये खर्च करणार.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...