Saturday 6 February 2021

देशातील 'हे' ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करा ; संरक्षण विभागाचे आदेश.


🔰पुणे (लष्कर) : पुणे ,खडकी, देहूरोड सहित राज्यातील ७ व देशभरातील ५६  कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ११ तारखेपासून होईल. या आदेशाला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दुजोरा दिला आहे.


🔰सरक्षण विभागाच्या प्रधान निर्देशकांनी याबाबतचे पत्र देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंटच्या मुख्यकार्यकरी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. हे सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड १० फेब्रुवारी २०१५ ला अस्तित्वात आले होते. १० फेब्रुवारी २०२९ला त्यांचा कार्यकाळ संपला. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यात ६ महिन्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याची तरतूद आहे, त्यामुळे  सहा -सहा महिन्यांचा दोन  मुदतवाढ मिळाल्या होत्या. ही मुदत येत्या १० तारखेला संपत असून बोर्ड बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने  आता अधिकृत पत्र रक्षा संपदा विभागाकडून प्राप्त झाल्याने येत्या ११ फेब्रुवारीपासून बोर्ड बरखास्त होणार आहे.


🔰कन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यातील तरतुदीनुसार जेव्हा बोर्ड बरखास्त होतो तेव्हा पुढील निवडणूक जाहीर होईपर्यंत बोर्डाचा कारभार बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर व मुख्यकार्यकारी अधिकारी या द्विसदस्यीय समितीमार्फत चालतो किंवा बोर्डावर प्रशासक म्हणून लोकांचा प्रतिनिधी  म्हणून सुद्धा संरक्षण मंत्रालय नेमु शकते. अश्यावेळी अध्यक्ष , उपाध्यक्ष लोकप्रतिनिधी व मुख्यकार्यकारी अधिकारी अशा त्रिसदस्यीय समिती मार्फत बोर्डाचा कारभार चालतो.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...