Saturday 13 March 2021

देशातील पहिली राज्यस्तरीय 'ई-लोक अदालत छत्तीसगडमध्ये



▪️कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 11 जुलै 2020 रोजी भारताची पहिली राज्यस्तरीय 'ई-लोक अदालत छत्तीसगडमध्ये यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. 


▪️छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. आर. रामचंद्र मेनन यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या राज्यस्तरीय ई-लोक अदालत चे उद्घाटन करण्यात आले.


▪️छत्तीसगड उच्च न्यायालय, बिलासपूर आणि छत्तीसगड राज्य न्यायिक सेवा प्राधिकरण यांनी संयुक्तपणे याचे आयोजन केले.


▪️उच्च न्यायालयासह राज्य न्यायिक सेवा प्राधिकरणाची राज्यभरातील सर्व 195 खंडपीठे यात सामील झाली होती


🎯पार्श्वभूमी :


✅ कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल आणि 11 जुलै 2020 रोजी नियोजित 2020 मधील द्वितीय आणि तृतीय राष्ट्रीय लोक अदालत रद्द करण्यात आली होती.


✅ 8 फेब्रुवारी 2020 रोजी 2020 सालची पहिली राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती.


🎯राष्ट्रीय लोक अदालतचे महत्त्व :


👉 नयायिक सेवा प्राधिकार कायदा 1987 अंतर्गत स्थापना.


💥 राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority : NALSA) चा उपक्रम :


👉 अपघाती विमा दावे, चेक परत जाणे, आर्थिक विवाद १. यासारखे आर्थिक खटले प्रामुख्याने लोक अदालतीमध्ये सोडविले जातात.


❇️ राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority: NALSA).


▪️नयायिक सेवा प्राधिकार कायदा 1987 अंतर्गत स्थापना.


▪️ ठिकाण : नवी दिल्ली


▪️भारताचे सरन्यायाधीश हे प्रमुख आश्रयदाता (Patron-in- Chief) आणि सर्वोच्च न्यायालयातील द्वितीय क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश हे त्याचे कार्यकारी अध्यक्ष (Executive Chairman) असतात.


▪️उद्दिष्ट : समाजातील तळागाळातील कमकुवत गटाला मोफत न्यायिक सेवा पुरविणे.


▪️राज्य न्यायिक सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण यांच्या सहकार्याने लोक अदालतींचे आयोजन करण्यात येते.


▪️याशिवाय न्यायिक साक्षरतेसाठी जनजागृती करणे, सामाजिक न्यायासंबंधी खटले लढविणे ही या संस्थेची प्रमुख कार्ये आहेत.


No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...