Saturday 13 March 2021

चीनला मोठा दणका देण्याची भारताची तयारी, Huawei वर लवकरच बंदी घालण्याची शक्यता



🎍भारत चीनला अजून एक मोठा दणका देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. अमेरिकेनंतर आता भारतही चीनची दिग्गज टेक कंपनी Huawei वर बंदी घालण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत याबाबत सरकारकडून घोषणा केली जाईल असंही समजतंय.


🎍१५ जूननंतर नाही खरेदी करता येणार Huawei  ची उपकरणं? :- वृत्तसंस्था Reutersने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या Huawei या कंपनीच्या दूरसंचार उपकरणांचा वापर करण्यापासून भारतातील मोबाईल कंपन्यांना रोखलं जाईल, असं सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. ‘१५ जूननंतर टेलिकॉम कंपन्यांना केवळ सरकारद्वारे परवानगी देण्यात आलेल्या काही ठराविक कंपन्यांकडूनच उपकरणं खरेदी कारावी लागतील. तसेच ज्या कंपन्यांकडून उपकरणं खरेदी करता येणार नाहीत त्यांची ब्लॅकलिस्टही जारी केली जाईल. या ब्लॅकलिस्टमध्ये Huawei कंपनीचं नाव असू शकतं’, असंही या दोन अधिकाऱ्यांनी सांगितलं.


🎍ZTE कॉर्पवरही बंदीची शक्यता :- भारतात एखादी कंपनी गुंतवणूक करत असताना भारतीयांच्या सुरक्षेला धक्का लागत असेल तर अशा परिस्थितीत आर्थिक फायदा-तोटा न पाहता जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल, असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, ZTE कॉर्प या चिनी कंपनीलाही भारतात बंदी घातली जाऊ शकते, असं अन्य एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं. दोन्ही कंपन्या आपल्या उपकरणांद्वारे चिनी सरकारसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


🎍दरम्यान, गेल्या वर्षी भारत-चीन सैन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनच्या बहुतांश लोकप्रिय आणि मोठ्या कंपन्यांचे अॅप्स बॅन करत आहे. सरकार आता Huawei या चीनच्या मोठ्या टेक कंपनीवरही बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

No comments:

Post a Comment

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...