Saturday 13 March 2021

आर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाची पहिली बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली संपन्न


🚨आर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाची (CGETI) पहिली आभासी बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 मार्च ते 11 मार्च 2021 या कालावधीत संपन्न झाली.


🚨बराझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांची संघटना असलेल्या BRICS समूहाची 2021 या वर्षासाठी संकल्पना “BRICS@15: BRICS देशांदरम्यान अखंडता, दृढता आणि सर्वसहमती यासाठी सहकार्य” (BRICS@15:Intra BRICS Cooperation for Continuity Consolidation and  Consensus) ही आहे.


🚨आर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाच्या (CGETI) भारत सरकारच्या अध्यक्षतेदरम्यान पूर्ण करता येतील अशा बाबीविषयीचे भारत सरकारच्या विविध संबंधित विभागांनी तयार केलेले सादरीकरण निरनिराळ्या सत्रांत प्रस्तावित केले गेले. या सादरीकरणात खालील बाबींचा समावेश होता -


🚨रशियाच्या 2020 मधील BRICS अध्यक्षपदाच्या कालावधीत  स्वीकारलेल्या ‘BRICS आर्थिक भागिदारी 2025 रणनीती’ या दस्तावेजावर आधारीत कृती आराखडा

जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) ट्रिप्स (TRIPS) सवलत प्रस्तावासह बहुआयामीय व्यापार प्रणालीबाबत BRICS सहकार्य

ई कॉमर्स प्रणालीतील ग्राहक संरक्षणासाठी चौकट तयार करणे


🚨शल्करहित उपाययोजना ठराव यंत्रणा

स्वच्छता आणि शारिरीक आरोग्य स्वच्छता कार्य यंत्रणा (SPS)


🚨अनुवांशिक संसाधने आणि पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणासाठी सहकार्याची चौकट


☄️वयावसायिक सेवा सहकार्यासाठी BRICSची संरचना


🚨कोरोना विषयक सद्यस्थितीत भारताने प्रस्तावित केलेल्या विविध उपक्रमांतून एकत्रपणे कार्य करण्याला BRICSच्या भागीदार देशांची सहमती दर्शविली.


☄️BRICS समूहाविषयी


🚨BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.


🚨रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...