Thursday 26 August 2021

२०३६, २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक



ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. यामध्ये आता भारताचीसुद्धा भर पडली असून २०३६ आणि २०४० पैकी एका ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) यांनी मंगळवारी दिली.


करोनाच्या सावटादरम्यानही ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्यामुळे ‘आयओसी’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०२४ ते २०३२ पर्यंतच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे पॅरिस, लॉस अँजेलिस आणि ब्रिस्बेन येथे होणार आहे. मात्र २०३६, २०४०च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आतापासून अनेक राष्ट्रे पुढे येत आहेत, असे बाख यांनी सांगितले.


‘‘२०३६ आणि २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत, इंडोनेशिया, जर्मनी आणि कतार या चार देशांनी उत्सुकता दाखवली आहे,’’ असे बाख म्हणाले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी बाख यांच्या मताला दुजोरा देत भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी तयारी करत असल्याचे सांगितले. 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...