Thursday 26 August 2021

राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’: पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठी वित्त मंत्रालयाची योजना..



🔰23 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी ‘राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’ (नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन) याच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले.


🔴ठळक बाबी...


🔰योजनेत केंद्रीय सरकारच्या ब्राउनफिल्ड पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठीची आर्थिक वर्ष 2022 ते 2025 या चार वर्षांची रुपरेषा समाविष्ट आहे.

नियोजित चार वर्षाच्या कालावधीत केंद्रीय सरकारच्या मिळकतीच्या मुद्रीकरणातून 6 लक्ष कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी होऊ शकेल.


🔰गतवणूकदारांसाठी दृश्यमानता प्रदान करण्याव्यतिरिक्त ते सरकारच्या मालमत्ता चलनीकरण उपक्रमासाठी मध्यम मुदतीची रुपरेषा म्हणून देखील कार्य करेल.


🔰तयाच्यानुसार केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या मालमत्तांचे मुद्रीकरण केले जाईल.

मुद्रीकरणातून निर्मिती या तत्वावर आधारित मालमत्ता मुद्रीकरणाचे उद्दिष्ट, नवीन पायाभूत सुविधा निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आमंत्रित करणे हे आहे.


🔰रोजगार संधींची निर्मिती आणि त्याद्वारे आर्थिक विकास साध्य करून ग्रामीण आणि शहरी भाग अशा सर्वच भागांच्या सार्वजनिक कल्याणाचे उद्दिष्ट गाठता येईल.


🔰यामध्ये 'भांडवली खर्चातून राज्यांना आर्थिक मदतीची योजना' या उपक्रमातून राज्य सरकारांच्या मालकीच्या मालमत्तांच्या पुनर्वापरातून पायाभूत सुविधांना वेग देणाऱ्या योजनेचाही समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...