Wednesday 13 October 2021

टपाल विभागाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी ‘बँकिंग दिवस’ पाळला..

🌇भारताच्या टपाल विभागाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी ‘बँकिंग दिवस’ साजरा केला. यावर्षी बँकिंग दिनाची मुख्य संकल्पना सुकन्या समृद्धी योजनेची जाहिरात करणे ही आहे.

🌇दरवर्षी 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ याच्या एका भागाच्या स्वरूपात ‘आजादी का अमृत महोत्सव’ सहीत हा दिवस पाळण्यात आला.

🌇यावर्षी, टपाल विभाग आर्थिक बाबींविषयी जनजागृती करण्यासाठी आणि वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘वित्तीय समावेशन (FI) मेळावे आयोजित करून ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे. तसेच, विविध IPPB सेवांना या मेळाव्याद्वारे प्रोत्साहन दिले जाईल.

🖱भारतीय टपाल विभाग..

🌇‘इंडिया पोस्ट’ या नावाखाली व्यवहार करणारे टपाल विभाग, ही भारत सरकारची टपाल प्रणाली आहे जी दळणवळण मंत्रालयाची उपसंस्था आहे. ही जगातली सर्वाधिक प्रमाणात विस्तारलेली टपाल प्रणाली आहे. 01 ऑक्टोबर 1854 रोजी लॉर्ड डलहौजी यांनी संस्थेची स्थापना केली. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

🖱टपाल विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजना खालीलप्रमाणे आहेत -

🌆बचत बँक खाते (बचत खाता / आवर्ती ठेव / मुदत ठेव / मासिक उत्पन्न योजना (MIS) किंवा राष्ट्रीय बचत योजना (NSC) / कृषी विकास पत्र)
सुकन्या समृद्धि खाते / PPF खाते
वित्त पोषित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संलग्न केलेले IPPB खाते
टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमा योजना
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना / पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...