Tuesday 23 November 2021

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘लाल सलाम’; पहिल्या पुस्तकाची केली घोषणा

🔰केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दंतेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. स्मृती इराणी यांनी या पुस्तकाला ‘लाल सलाम’ असे नाव दिले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या पुस्तकाची घोषणा केली आहे. तसचे हे पुस्तक अॅमेझॉनवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलंय. स्मृती इराणी यांचे हे पुस्तक वेस्टलँड या प्रकाशन संस्थेने आणले आहे.


🔰समृती इराणी यांचे हे पुस्तक एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यापासून प्रेरित आहे. या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. स्मृती इराणी म्हणाल्या की, “ही गोष्ट त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून सुरू होती. मग मी ही कथा कागदावर उतरवण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता लिहायला घेतली. मला आशा आहे की हे पुस्तक वाचणारे लोक पुस्तकाचा आनंद घेतील.”


🔰लाल सलाम हे पुस्तक विक्रम प्रताप सिंग नावाच्या तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे. त्यात विक्रम प्रताप सिंग यांना राजकारण आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो हे सांगितले आहे. प्रकाशनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या पुस्तकाची माहिती देताना, नक्षलवादी आणि माओवादी बंडखोर भागात आव्हानांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. हे पुस्तक २९ नोव्हेंबरपासून वाचकांना उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...