Tuesday 23 November 2021

विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती

🔰महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांना आता पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची भाजपाकडून राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. तर, या अगोदर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.


🔰दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणातून काहीसे बाहेर पडल्यानतंर, आता विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणीत महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्रातील जुने व संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात.


🔰२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपाने कापलं होतं. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांचा समावेश होता. मात्र आता भाजपाकडून या दोन्ही नेत्यांचे पुर्नवसन केलं जात असल्याचं दिसत आहे. कारण, कालच बावनकुळे यांना विधानपरिषदचे तिकीट देण्यात आलं. त्यानंतर आज विनोद तावडे यांची राष्ट्रीय सस्तरावरील कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली गेली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...