Tuesday 23 November 2021

गांधी-बोस स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक ; नेताजींच्या कन्या अनिता बोस यांच्याकडून कंगनाला कानपिचक्या



🔰अभिनेत्री कंगना राणावत हिने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर टिप्पणी करून नवा वाद निर्माण केला आहे. स्वातंत्र्य लढय़ातील नेत्यांबद्दल अनादर दाखवणाऱ्या बेताल विधानांवर नेताजी बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनाला कानपिचक्या दिल्या.


🔰‘महात्मा गांधी आणि माझे वडील नेताजी बोस हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक होते’, असे मत अनिता बोस यांनी व्यक्त केले.कंगना राणावत हिने वृत्तपत्राच्या कात्रणाचा आधार घेत दावा केला की, नेताजी देशात परतले असते तर त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याची तयारी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महमद अली जिन्ना यांनी एका ब्रिटिश न्यायाधीशाकडे दाखवली होती.. भगत सिंह यांना फाशी दिली पाहिजे असेही गांधीजींचे मत होते व त्यासंबंधी पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा कंगनाने केला आहे. गांधीजी व नेताजी यांच्यावरील या दाव्यांना अनिता बोस यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.


🔰महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. नेताजींचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असल्यामुळे नेताजींना आपल्या नियंत्रणात ठेवता येणार नाही, असे गांधीजींना वाटत होते. पण, हे लक्षात घेतले पाहिजे की, माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले.


🔰तयांनी गांधीजींचा आदर केला. स्वातंत्र्य लढय़ासाठी आपण करत असलेल्या कामाबद्दल गांधींजी काय म्हणत आहेत, हे नेताजी नेहमी जाणून घेण्यास उत्सुक असत. गांधीजी आणि नेताजी यांचे उद्दिष्ट एकच होते पण, त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. त्यांच्यातील या मतभेदात पंडित नेहरूंना कोणाची बाजू घ्यायची नव्हती. पण, नंतर नेहरू गांधीवादी समर्थकांमध्ये सामील झाले, असे अनित बोस यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...