Tuesday 23 November 2021

आता भारतातही करोना लसीचा तिसरा डोस दिला जाणार?; पुढील आठवड्यात तज्ज्ञांच्या समितीची बैठक

🔰करोना लसीचे बूस्टर शॉट्स देण्याची प्रक्रिया अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे तर अजूनही अनेक देशांमध्ये यावर विचार केला जात आहे. आता भारतातही दोन डोसनंतर तिसरा डोस देण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. भारतातील करोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत प्रशासन धोरण ठरवू शकते. भारतात, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना अतिरिक्त शॉट म्हणून करोनाचा तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


🔰यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सीएनएन-न्यूज१८ ला दिलेल्या माहितीमध्ये देशातील लसीच्या तिसऱ्या डोसवर धोरणात्मक दस्तऐवज तयार करण्यासाठी तज्ञ गट काम करत आहे. तिसऱ्या लसीच्या डोसची सुरुवातीला बूस्टर डोसऐवजी अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केली जाईल.


🔰नयूज१८ नुसार, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे अशा लोकांना अतिरिक्त डोस दिले जातात, तर निरोगी लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनंतर बूस्टर शॉट दिला जातो. कोणत्याही रोगामुळे कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक सामान्य दोन-डोस कार्यक्रमाद्वारे पूर्णपणे संरक्षित नाहीत. त्यामुळे अशा लोकांना अतिरिक्त डोस देण्याची तयारी सुरू आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगासारख्या रोगामुळे खराब झाली आहे ते दोन डोसच्या लसीकरणातून संरक्षित नाहीत. अशावेळी तिसरा डोस देणे महत्त्वाचे असते.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प

𝟏)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ 𝟐)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 𝟑)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरा...