Tuesday 23 November 2021

प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा बंद

🔰दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता येथील शाळा प्रत्यक्ष उपस्थितीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील; तर ऑनलाइन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा सुरू राहतील, असे शिक्षण संचालनालयाने रविवारी जाहीर केले.


🔰हवेचा दर्जा रविवारी सकाळी ‘अतिशय वाईट’ होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी ९ वाजता हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स- एक्यूआय) ३८२ इतका होता. शनिवारी २४ तासांतील सरासरी एक्यूआय ३७३ इतका होता.


🔰‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि आसपासच्या भागांच्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या पुढील आदेशांपर्यंत सर्व शाळा तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याने दिले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी व खासगी शाळा पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील’, असे शिक्षण विभागाच्या अतिरिक्त संचालक रिता शर्मा यांनी सांगितले.


🔰तथापि, ऑनलाइन अध्यापन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा यापूर्वी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर शाळा व इतर शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा दिल्ली सरकारने १३ नोव्हेंबरला केली होती. करोना महासाथीमुळे सुमारे १९ महिने बंद राहिल्यानंतर येथील शाळा १ नोव्हेंबरपासून उघडल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...