Monday 25 April 2022

दरवर्षी 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिन साजरा केला जातो.

🔶दरवर्षी 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिन साजरा केला जातो.

🔶या दिवशी पंचायत राज व्यवस्था 24 एप्रिल 1993 रोजी भारतीय राज्य घटनेच्या 73व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 नुसार अंमलात आली.

🔶भारतातील पंचायत राज त्रिस्तरीय आहे.

🔶आधुनिक भारतात प्रथमच तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांनी 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थान मधील नागोर जिल्ह्यातील बगदरी गावात पंचायत राज व्यवस्थेचे उदघाट्न केले होते.

🔶24 एप्रिल 2010 पासून राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

🔶भारतीय राज्य घटनेतील कलम 40 राज्यांना पंचायती स्थापन करण्याचा निर्देश देते.

🔶भारतीय राज्य घटनेच्या 73 व्या घटना दुरुस्ती नुसार, पंचायत राज संस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

🔶73 वा घटना दुरुस्ती विधेयक संसदेने 1992 मध्ये मंजूर केले आणि 24 एप्रिल 1993 पासून याची अंमलबजावणी झाली

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...