Friday 1 April 2022

ओझोन दिन विशेष

🌎 दरवर्षी १६ सप्टेंबर हा दिवस 'ओझोन दिवस' म्हणून जगभर साजरा होतो.

🌎 ओझोनचा थर हा पृथ्वीवासीयांसाठी एक मोठं वरदानच आहे.

🌎 सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व या थराच्या संवर्धनासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

🌎 ओझोनचा थर, पृथ्वीच्या वातावरणाचा दुसरा स्तर, म्हणजे स्ट्रॅटोस्फीयरचा एक भाग आहे.

🌎 ह्या ओझोनच्या थराला ओझोनोस्फियर देखील म्हणतात.

🌎 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण १५ ते ३० किलोमीटर वर हा थर आहे.

🌎 आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीला सुरक्षित ठेवण्यात या ओझोनच्या थराचा मोठा वाटा आहे. 

🌎 सूर्यापासून येणारी मध्यम अति-नील किरणे माणसामध्ये व इतर प्राण्यांमध्ये विविध आजार उत्पन्न करू शकतात.

🌎 या मध्यम अति-नील किरणांना शोषून घेत, ओझोन आपली रक्षा करतो.

🌎 या आपल्या सुरक्षा कवचाला छिद्र पाडण्याचे काम स्वत: मानवच करतोय.

🌎 गेल्या ३० ते ४० वर्षांत दोन्ही ध्रुवांवर ओझोनच्या थराला मोठी छिद्रं पडलेली आहेत. या छिद्रांना 'ओझोन होल' असेही म्हणतात.

🌎 नासाच्या 'ओझोन होल वॉच'तर्फे दररोज ओझोनवर लक्ष ठेवले जाते.

🌎 छायाचित्र नासाच्या गोदार्द स्पेस सेंटरने प्रसिद्ध केले आहे.

🌎 ऑक्सिजनचे एकल अणू (O) इतर ऑक्सिजन रेणुंशी (O2) जुळून ओझोनचा (O3) एक रेणू तयार करतात.

🌎 ओझोनने शोषलेल्या अति-नील किरणांमुळे स्ट्रॅटोस्फीयरचे तापमान उंचीप्रमाणे वाढत जाते.

🌎 ही प्रक्रिया सतत चालू असते. त्यामुळे कधी ओझोनचे प्रमाण कमी होते, तर कधी वाढते.

🌎 CFC आणि BFC सर्वत्र (रेफ्रिजरेटर) मध्ये आढळतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...