​​भारताला नियोजित वेळेत ‘एस-४००’ क्षेपणास्त्रे देणार- पुतिन



🅾भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० क्षेपणास्त्रे भारताला नियोजित वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. भारत आणि रशियामध्ये करण्यात आलेल्या याबाबतच्या कराराविरुद्ध अमेरिकेने इशारा दिला आहे.

🅾भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० ही ट्रम्फ क्षेपणास्त्रे संपादित करण्याची इच्छा असल्याचे भारताने २०१५ मध्येच जाहीर केले होते. पुतिन गेल्या वर्षी भारतात आले होते तेव्हा त्याबाबतचा ५.४३ अब्ज डॉलरचा करार करण्यात आला होता. एस-४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा योजनेनुसारच केला जाईल, असे पुतिन यांनी येथे ११ व्या ब्रिक्स परिषदेनंतर सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात ब्रिक्स परिषदेच्या वेळी द्विपक्षीय चर्चा झाली.

🅾रशियासमवेतच्या एस-४०० कराराला अमेरिकेने विरोध दर्शविला असून रशियाकडून शस्त्रे आणि लष्करी सामग्री घेणाऱ्या देशांवर र्निबध घालण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...