Friday 1 April 2022

महाराष्ट्राच्या नैसर्गिक आणि राजकीय सीमा

➡️नैसर्गिक सीमा
👉महाराष्ट्राच्या वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत.
👉उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.
👉राज्याच्या ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे.
👉राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.
         

➡️ राजकीय सीमा –

👉महाराष्ट्राला एकूण ६ राज्यांच्या सीमा स्पर्श करतात. यापैकी सर्वाधिक लांब सीमा मध्यप्रदेश बरोबर असून सर्वात कमी सिमा गोवा या राज्याबरोबर आहे. तसेच दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात सिमा लागते.

👉 राज्य दिशा - सिमेवरील जिल्हे - एकूण
👉 गुजरात - वायव्य ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार - ४
👉 मध्यप्रदेश उत्तर - नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया - ८
👉 छत्तीसगढ - पुर्व गोंदिया व गढचिरोली - २
👉 आंध्रप्रदेश - आग्नेय गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड - ४
👉 कर्नाटक - दक्षिण नांदेड, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर, सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग - ७
👉 गोवा - दक्षिण सिंधुदुर्ग - १

👉 राज्याच्या वायव्येस असणारा केंद्रशासित प्रदेश – दादरा व नगरहवेली
👉 दोन राज्यांना संलग्न आसणारे जिल्हे - धुळे, नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...