31 October 2025

आधिवासातील जीवनपद्धती



1) सहजीवन (Symbiosis) 🤝

▪️दोन किंवा अधिक सजीव एकमेकांकडून फायदा घेऊन निर्माण करतात त्या घनिष्ठ संबंधांना सहजीवन म्हणतात.


🔹️उदाहरणे :

▪️लायकेन (दगडफूल)

➤ शैवाल + कवक यांचे सहजीवन.

➤ कवक पाणी व खनिजे पुरवतो; शैवाल अन्न तयार करून देतो.

▪️वाळवीतील ट्रायकॉनिंफा

➤ वाळवीला लाकूड पचविण्यास मदत.

➤ ट्रायकॉनिंफाला सुरक्षित आश्रय.

▪️शिंबीवर्गीय वनस्पती – रायझोबियम

➤ मुळांच्या गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण.

➤ वनस्पतींना नायट्रोजनयुक्त संयुगे मिळतात.

▪️जलव्याल (Hydra) – Zoochlorella शैवाल

➤ शैवाल सूर्यप्रकाशातून अन्न देतो.

➤ Hydra संरक्षण व निवासस्थान प्रदान करते.

▪️बाभळीची झाडे – मुंग्या

➤ मुंग्यांना काट्यांमध्ये निवास व अन्न.

➤ मुंग्या झाडांचे संरक्षण करतात.


2) परजीवन (Parasitism) 

▪️एका सजीवाचा लाभ आणि दुसऱ्याचा तोटा होत असल्यास त्या संबंधाला परजीवन म्हणतात.

▪️तोटा होणारा → पोषिंदा (Host)

▪️फायदा घेणारा → परजीवी (Parasite)


🔹️उदाहरणे :

▪️तंबाखूवरील बंबाकू (Aphids)

➤ वनस्पतीचा रस पिऊन जगतात.

➤ वनस्पतीची वाढ कमी होते.

▪️अमरवेल (Cuscuta) – आंबा/कांचन

➤ हिरव्या रंगाचा अभाव; स्वतः अन्न तयार करू शकत नाही.

➤ पोषिंदाच्या वाहिनीतून रस शोषण.

▪️मानवी शरीरातील जंत (Roundworm इ.)

➤ अन्ननलिकेत राहून अन्न शोषून घेतात.

➤ रक्ताल्पता व पोषणतुटी निर्माण होऊ शकते.

No comments:

Post a Comment