1️⃣ प्रश्न काळ (Question Hour)
✅️ अर्थ: प्रत्येक संसदीय बैठकीचा पहिला तास म्हणजे प्रश्नकाळ असतो.
➤ या काळात सदस्य शासनाच्या धोरणांबद्दल, निर्णयांबद्दल आणि प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्न विचारतात.
➤ संबंधित मंत्री हे प्रश्नांचे उत्तर देतात.
2️⃣ प्रश्नांचे प्रकार (Types of Questions)
अ) तारांकित प्रश्न (Starred Question)
✅️ उत्तर: तोंडी दिले जाते.
➤ सदस्य उपप्रश्न (Supplementary Questions) विचारू शकतात.
➤ अध्यक्ष/सभापती हे प्रश्न अतारांकित प्रश्नांमध्ये रूपांतरित करू शकतात.
➤ एका दिवशी एका सदस्याला एका प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.
➤ एका दिवशी जास्तीत जास्त 20 प्रश्न घेतले जातात.
➤ पेपरचा रंग: हिरवा (Green Paper)
ब) अतारांकित प्रश्न (Unstarred Question)
✅️ उत्तर: लेखी स्वरूपात दिले जाते.
➤ सदस्यांना उपप्रश्न विचारता येत नाहीत.
➤ या प्रश्नांमध्ये सामान्यतः आकडेवारी किंवा विस्तृत माहिती मागवली जाते.
➤ एका दिवशी एका सदस्याचे 4 किंवा 5 प्रश्न घेतले जातात.
➤ एका दिवशी एकूण 230 प्रश्न घेतले जातात.
➤ पेपरचा रंग: पांढरा (White Paper)
क) अल्प सूचना प्रश्न (Short Notice Question)
✅️ अर्थ: जेव्हा 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीत उत्तर आवश्यक असते, तेव्हा हा प्रश्न विचारला जातो.
➤ अध्यक्ष/सभापती आणि संबंधित मंत्र्यांची परवानगी आवश्यक असते.
➤ या प्रश्नाचे उत्तर तोंडी दिले जाते.
➤ मंत्र्यांविरुद्ध खासगी सदस्यांनाही प्रश्न विचारता येतात (खाजगी विधेयक असल्यास).
➤ पेपरचा रंग: फिकट गुलाबी (Light Pink Paper)
ड) खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्न (Question by Private Member)
✅️ अर्थ: हे प्रश्न सरकारी मंत्र्यांऐवजी इतर खासगी सदस्यांना विचारले जातात.
➤ पेपरचा रंग: पिवळा (Yellow Paper)
📘 महत्त्व:
➤ प्रश्नकाळ हा संसदेतील लोकशाही उत्तरदायित्वाचा सर्वात प्रभावी साधन मानला जातो.
➤ तो शासनाचे कामकाज पारदर्शक ठेवतो आणि मंत्र्यांना जबाबदार बनवतो.
No comments:
Post a Comment