अ) ॲरिस्टॉटल –
➤ याला "जीवशास्त्राचा जनक" म्हणतात.
➤ त्याने वनस्पती व प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांच्यातील कार्यक्षम भाग जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
➤ त्याने प्रथम प्राण्यांचे वर्गीकरण केले.
ब) थिओफ्रास्टस –
➤ याला "वनस्पतीशास्त्राचा जनक" म्हणतात.
➤ त्याने वनस्पतींच्या जुन्या वास्तव्यावरून (Habitat) आणि आकारावरून प्रथमच वर्गीकरण केले.
क) कार्ल लिनियस –
➤ याला "आधुनिक जीवशास्त्राचा जनक" म्हणतात.
➤ त्याने प्रथमच वनस्पती व प्राण्यांचे शास्त्रीय नामकरण केले.
➤ त्याने वनस्पती व प्राणी यांना नावे देण्याची द्विनाम पद्धती (Binomial Nomenclature) सुरू केली.
ड) क्युआयर –
➤ याला "जीवाश्म शास्त्राचा जनक" म्हणतात.
➤ त्याने प्राण्यांचे अस्थिमुळे साधर्म्य आहे व अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या सांगाड्याच्या तुलनेत अभ्यास केला.
इ) शेलडेन व श्वान –
➤ यांनी "पेशी सिद्धांत" मांडला.
➤ प्रत्येक सजीवाचे शरीर पेशीपासून बनलेले असते.
➤ पेशींना आकार सर्व अवयवांत सारखा असतो.
➤ पेशीद्वारे अनुवांशिक गुण पुढच्या पिढीत संक्रमित केले जातात.
फ) ओपेरिन –
➤ यांनी "सजीवाच्या उत्पत्तीविषयीचा सिद्धांत" मांडला.
➤ चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीभोवती उष्ण वायू व धातूंचे बाष्प होते.
➤ हायड्रोजन अधिक क्रियाशील होता; त्याने कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजनशी अभिक्रियेतून मिथेन, अमोनिया, पाणी तयार झाले.
➤ ५०°C तापमानावर अल्कोहोल, ग्लिसरॉल, स्निग्ध आम्ल, अमिनो आम्ल, शर्करा, नायट्रोजनयुक्त पदार्थ निर्माण झाले.
➤ यांच्या संयोगातून प्रथिने, स्निग्ध पदार्थ व कर्बोदके तयार झाली.
➤ यांच्या एकत्रिकरणातून प्राथमिक अवस्थेतील पेशी तयार झाली.
➤ यालाच Chemosynthetic theory म्हणतात.
ग) जॉन लॅमार्क –
➤ याने "सजीवाच्या उत्क्रांतीविषयक सिद्धांत" मांडला.
▪️उपयोग-अनुपयोगी नियम:
➤ अवयवाचा अधिक वापर → विकास
➤ उपयोग न केल्यास → ऱ्हास
➤ उदा. जिराफाची मान लांब, सापाचे पाय नष्ट
▪️संपादित गुण:
➤ एका पिढीत मिळालेले गुण पुढील पिढीत संक्रमित होतात.
➤ हे तत्त्व उत्क्रांती पूर्णपणे स्पष्ट करू शकत नाही.
च) चार्ल्स डार्विन –
➤ याला "उत्क्रांतीवादाचा जनक" म्हणतात.
➤ १८५९ मध्ये Origin of Species लिहून "नैसर्गिक निवड सिद्धांत" मांडला.
▪️Struggle for Existence:
➤ सजीवाला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो.
▪️Survival of the Fittest:
➤ ज्याच्यात सक्षम गुणधर्म आहेत तोच टिकतो.
▪️Natural Selection:
➤ उपयुक्त गुण पुढील पिढीत जातात.
छ) ह्यूगो डी. व्ह्राईस –
➤ याने "उत्परिवर्तन सिद्धांत" मांडला.
➤ नवीन पिढीमध्ये अचानक बदल होणे = उत्परिवर्तन.
ज) जॉन ग्रेगर मेंडेल –
➤ याला "अनुवांशशास्त्राचा जनक" म्हणतात.
➤ १८६६ मध्ये संकरण प्रयोग केले.
➤ संकरित पिढीत प्रभावी गुण उतरतो.
➤ कमजोर गुण सुप्त राहतो व पुढील पिढीत व्यक्त होतो.
No comments:
Post a Comment