➊ मूलभूत माहिती व पार्श्वभूमी
➤ संपूर्ण नाव : राजा राममोहन रॉय
➤ जन्म : १७७२, राधानगर, हुगळी जिल्हा (पश्चिम बंगाल)
➤ वडील : रमाकांत रॉय | आई : तारिणीदेवी
➤ आजोबा : कृष्णचंद्र बंदोपाध्याय (बंगाल नबाबांच्या दरबारात अधिकारी)
➤ 'रॉय' ही पदवी नबाब दरबाराकडून सन्मान म्हणून देण्यात आली
➋ शिक्षण व भाषाशिक्षण
➤ १७८९ मध्ये अरबी व पर्शियन भाषा शिकण्यासाठी पाटणा येथे पाठवले
➤ नंतर बनारस येथे संस्कृत आणि हिंदू धर्मशास्त्रांचे शिक्षण
➤ १८०३ नंतर इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली
➤ फारसी, बंगाली, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, पर्शियन, हिब्रू या भाषांवर प्रभुत्व
➌ सामाजिक व धार्मिक सुधारणा कार्य
➤ १८०५ साली ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी
➤ १८१५ मध्ये नोकरी सोडून ‘आत्मिया सभा’ ची स्थापना – वैचारिक चर्चेचे व्यासपीठ
➤ १८२८ मध्ये ‘ब्राम्हो समाज’ ची स्थापना – एकेश्वरवादावर आधारित समाज
➤ सती प्रथेविरुद्ध प्रयत्न –
➤ १८२९ मध्ये सतीप्रथा रद्द करण्यात यश
➤ विधवा पुनर्विवाहासाठी ब्रिटिश सरकारकडे सातत्याने प्रयत्न
➤ स्त्रीशिक्षण व स्त्री हक्कांचा पुरस्कार
➤ धार्मिक सहिष्णुता आणि सर्व धर्मांचा अभ्यास
➍ पत्रकारिता व साहित्य योगदान
➤ तुहफत-उल-मुव्वहिदीन (१८०३) – फारसीत एकेश्वरवादाचा पुरस्कार
➤ वेदांत ग्रंथ (१८१५) – शंकराचार्यांच्या भाष्यांचे बंगालीत भाषांतर
➤ उपनिषदांचे भाषांतर – ईश, केण, मुंडक, मांडूक्य
➤ संवाद कौमुदी (१८२१) – बंगाली साप्ताहिक
➤ मिरात-उल-अखबार (१८२२–१८३२) – फारसी साप्ताहिक
➤ इतर विषयांवरही पुस्तके : इतिहास, भूगोल, बंगाली व्याकरण
➎ शिक्षणासाठी योगदान
➤ १८२७ – डफ्यू हिअर यांच्यासह श्रीरामपूर विद्यालय स्थापन
➤ आधुनिक, वैज्ञानिक व स्त्री शिक्षणावर भर
➤ आत्मीय सभेत विविध विषयांवर चर्चासत्रे – द्वारकानाथ ठाकूर, प्रसन्नकुमार टांगरे, आनंदप्रसाद इत्यादींचा सहभाग
➏ इंग्लंडप्रवास व मृत्यू
➤ इंग्लंडमध्ये दिल्लीच्या बादशाहाचे दूत म्हणून गेले – ‘राजा’ किताब प्राप्त
➤ ब्रिटनच्या स्टेपलटन येथे १८३३ साली मृत्यू
➤ रवींद्रनाथ ठाकूर यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर यांनी कलकत्त्यात समाधी बांधली
➐ ऐतिहासिक महत्त्व व गौरव
➤ भारताच्या सामाजिक सुधारणांचा पाया घालणारे व्यक्तिमत्त्व
➤ ‘भारतीय रेनेसॉन्स’ चे पितामह
➤ आधुनिक भारतातील सर्वांत पहिला जागरूक समाजसुधारक
➤ हिंदू धर्माचे आत्मपरीक्षण घडवून आणणारा क्रांतिकारक
No comments:
Post a Comment