Ads

28 September 2020

भारतीय रिझर्व्ह बँकेची “पॉजिटीव्ह टू पे” योजना.


🔰अधिकोषण (किंवा बँकिंग) घोटाळ्यांना आळा घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँक नव्या वर्षाच्या सुरुवातीला “पॉजिटीव्ह टू पे” योजना सादर करणार आहे.


🔴ठळक बाबी...


🔰“पॉजिटीव्ह टू पे” ही एक प्रणाली आहे. या प्रणालीच्या अंतर्गत, 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाच्या माहितीची पुष्टी करणे अनिवार्य आहे.


🔰धनादेश देणाऱ्याला SMS, इंटरने बँकिंग, मोबाईल अ‍ॅप किंवा ATM अश्या माध्यमातून लाभार्थ्याचे नाव, तारीख, रक्कम असा धनादेशाचा तपशील सादर करावा लागतो.माहितीच्या असमानतेच्या परिस्थितीत निवारण उपाययोजना हाती घेतल्या जातात.


🔰नशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही संस्था या प्रणालीचा कार्यप्रणाली व्यवस्थापितअनुसरण करीत आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा एक डोसही ठरु शकतो पुरेसा.


🔰अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये लशी मानवी चाचणीच्या निर्णायक टप्प्यांवर आहेत.


🔰अमेरिकेत तर नोव्हेंबरपासन लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. ट्रम्प प्रशासनाने तशी तयारीच केली आहे.


🔰अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सनने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या फेजची चाचणी  सुरु झाली आहे.


🔰जॉन्सन अँड जॉन्सनने करोना विरोधात विकसित केलेल्या लशीच्या पहिल्या फेजच्या चाचणीचे निष्कर्ष आता समोर आले आहेत.


🔰परायोगिक लशीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली.


🔰जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नाहीत. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

पराप्तिकर विभागाने 'चेहराविरहित प्राप्तिकर अपील' प्रणालीचा शुभारंभ केला.


🔰25 सप्‍टेंबर 2020 रोजी प्राप्तिकर विभागाने आज 'चेहराविरहित प्राप्तिकर अपील' (Faceless Income tax Appeals) प्रणालीचा शुभारंभ केला.


🔴परणालीची ठळक वैशिष्ट्ये


🔰या प्रणालीच्या अंतर्गत, प्राप्तिकरासंबंधीच्या सर्व अपीलांना चेहराविरहित वातावरणात चेहराविरहित पद्धतीने अंतिम स्वरूप देण्यात येणार. मात्र, गंभीर अफरातफरी, मोठ्या प्रमाणातली करचुकवेगिरी, संवेदनशील आणि तपासाबाबतची प्रकरणे, आंतरराष्ट्रीय कर आणि काळापैसा कायदा- याविषयीच्या प्रकरणांचा त्याला अपवाद असणार आहे.


🔰चहराविरहित अपील प्रणालीच्या अंतर्गत, माहिती विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या उपयोगातून प्रकरणांचे वितरण केले जाणार असून, यासाठी कार्यक्षेत्राचा व्यापक विचार केला जाणार आहे.

डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर (DIN) अर्थात दस्तऐवज परिचय क्रमांकही दिला जाणार आहे.अपीलाच्या आदेशाचा मसुदा एका शहरात तयार होणार तर त्याचे पुनर्परीक्षण दुसऱ्या शहरात होणार. त्यामुळे वस्तुनिष्ठ, न्यायसंमत आणि उचित पद्धतीने आदेश तयार होणार.


🔰चहराविरहित अपील प्रणालीमुळे करदात्यांचा तर फायदा होणारच शिवाय, न्यायसंमत आणि उचित अपील आदेश निघाल्याने पुढच्या संभाव्य कायदेशीर कृतींचे प्रमाण कमी होणार. या नवीन प्रणालीमुळे प्राप्तिकर विभागाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायिता येण्यास मदत होणार आहे.


🔴इतर बाबी..


🔰दि. 13 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पारदर्शक करप्रणाली - प्रामाणिकतेचा सन्मान' मंचाचा भाग म्हणून, 'चेहराविरहित मूल्यांकन आणि करदाते' सनदीचा शुभारंभ केला होता.


🔰गल्या काही वर्षात, प्राप्तिकर विभागाने करप्रक्रिया सुलभ होण्यासाठी व करदात्यांच्या सोयीसाठी प्रत्यक्ष करांबाबत अनेक सुधारणा केल्या आहेत. आता, चेहराविरहित अपीलाच्या अंतर्गत प्राप्तिकराच्या अपिलांविषयीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण होणार असून, येथून पुढे अपील करणारी व्यक्ती आणि प्राप्तिकर विभाग यांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष संपर्काची गरज पडणार नाही.


🔰या प्रक्रियेत अपीलाचे ई-वितरण, नोटिशी किंवा प्रश्नावली ई-पद्धतीने कळविणे, ई-पडताळणी / ई-चौकशी पासून ते ई-सुनावणी आणि शेवटी अपिलीय आदेश ई-पद्धतीने कळविणे या साऱ्या टप्प्यांचा समावेश आहे. करदाते अगर त्यांचे प्रतिनिधी यांचा प्राप्तिकर विभागाशी कोणताही प्रत्यक्ष संपर्क येणार नाही. करदात्यांना त्यांच्या घरी बसून माहिती भरता येणार असल्याने त्यांच्या वेळेची आणि अन्य स्त्रोतांची बचत होऊ शकणार आहे.


🔴भारतातला प्राप्तिकर...


🔰भारतातला प्राप्तिकर हा भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीच्या केंद्रीय यादीतल्या ‘नोंद 82’ याद्वारे शासित आहे आणि केंद्र सरकारला ‘प्राप्तिकर अधिनियम-1961’ आणि ‘प्राप्तिकर नियम-1962’ अन्वये अकृषक उत्पन्नावर कर आकारण्याचे अधिकार दिले गेले आहेत. प्राप्तिकर विभाग हा केंद्र सरकारचा प्रमुख महसूल संकलक आहे.

सडे टाइम्स’चे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक हॅरॉल्ड इव्हान्स यांचे निधन


🔰सडे टाइम्सचे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक आणि शोधपत्रकार सर हॅरॉल्ड इव्हान्स यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मुद्रित माध्यमांचा खंदा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.


🔰बरिटिश अमेरिकी पत्रकार असलेल्या इव्हान्स यांनी थॅलिडोमाइड या औषधाच्या दुष्परिणामांवर वृत्तमालिका चालविली होती.

नियतकालिकाचे संस्थापक, पुस्तक प्रकाशक, लेखक व अगदी शेवटी रॉयटर्सचे मानद संपादक अशा बहुविध भूमिकांतून त्यांनी काम केले होते.


🔰त 14 वर्षे संडे टाईम्सचे संपादक होते. 2003 मध्ये त्यांना ‘नाइटहूड’ म्हणजे ‘सर’ हा किताब पत्रकारितेतील सेवेसाठी देण्यात आला होता.


🔰काही काळ ते काँड नॅस्ट ट्रॅव्हलर नियतकालिकाचे संपादक होते. नंतर रँडम हाऊस या प्रकाशन कंपनीचे अध्यक्ष बनले.

प्रेस गॅझेट व ब्रिटिश जर्नालिझम रिव्ह्य़ू यांच्या जनमत चाचणीत ते सर्वात महान पत्रकार ठरले  होते.

Online Test Series

27 September 2020

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )

वाचा :- मराठी व्याकरण



🔴 परयोग व त्याचे प्रकार  


प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types):


वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.


मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

1. कर्तरी प्रयोग 

2. कर्मणी प्रयोग 

3. भावे प्रयोग 


1. कर्तरी प्रयोग (Active Voice) : जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.

उदा . तो चित्रा काढतो. (कर्ता- पुल्लिंगी) 

       ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)

       ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)


कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

1. सकर्मक कर्तरी प्रयोग 

2. अकर्मक कर्तरी प्रयोग 


1. सकर्मक कर्तरी प्रयोग : ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा . राम आंबा खातो.

       सीता आंबा खाते. (लिंग)

       ते आंबा खातात. (वचन)



2. अकर्मक कर्तरी प्रयोग : ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा . राम पडला 

       सिता पडली (लिंग)

       ते पडले (वचन)    


2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) : क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.

उदा . राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)

       राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)

       राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)



कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग  

2. नवीन कर्मणी प्रयोग 

3. समापन कर्मणी प्रयोग 

4. शक्य कर्मणी प्रयोग 

5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग


1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग : हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.                

उदा. नळे इंद्रास असे बोलीले.

      जो - जो किजो परमार्थ लाहो.


2. नवीन कर्मणी प्रयोग :  ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.

उदा . रावण रमाकडून मारला गेला.

       चोर पोलिसांकडून पकडला गेला.



3. समापण कर्मणी प्रयोग : जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा . त्याचा पेरु खाऊन झाला.

       रामाची गोष्ट सांगून झाली.



4. शक्य कर्मणी प्रयोग : जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा . आई कडून काम करविते.

       बाबांकडून जिना चढविता.


5. प्रधान कर्तुत कर्मणी प्रयोग : कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा . त्याने काम केले. 

       तिने पत्र लिहिले.  



3. भावे प्रयोग : जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा . सुरेशने बैलाला पकडले.

       सिमाने मुलांना मारले.    


भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात. 


1. सकर्मक भावे प्रयोग :

2. अकर्मक भावे प्रयोग :

3. अकर्तुक भावे प्रयोग :


1. सकर्मक भावे प्रयोग : ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.

उदा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.

      रामाने रावणास मारले.


2. अकर्मक भावे प्रयोग : ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा . मुलांनी खेळावे.

       विद्यार्थांनी जावे.


3. अकर्तुक भावे प्रयोग : भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा . आता उजाडले.

       शांत बसावे.

       आज सारखे उकडते.

वाचा :- रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ



●  केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. गहू, चना, मसूर, मोहरी, ज्वार आणि सुर्यफूलासह रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या वाढीस केंद्राने मान्यता दिली आहे.


रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय


गहू, चना, मसूर, मोहरी, ज्वार आणि सुर्यफूलासह रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या वाढीस केंद्राने मान्यता दिली आहे.


एबीपी माझा वेब टीमLast Updated: 21 Sep 2020 08:32 PM (IST)


नवी दिल्ली : कृषी विधेयकावर अभूदपूर्व गोंधळानंतत केंद्रातील मोदी सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. सोमवारी याला मंजुरी मिळाली आहे. गहू, चना, मसूर, मोहरी, ज्वार आणि सुर्यफूलासह रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या वाढीस केंद्राने मान्यता दिली आहे.

● कोणत्या पिकाची किमान आधारभूत किंमत किती वाढली:-



● गहू

गव्हाचे किमान आधारभूत किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे गव्हाची किमान आधारभूत किंमत 1975 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. ही वाढ 2.6 टक्के आहे. शेतकऱ्याला किंमतीवर 106 टक्के नफा मिळेल.



● हरभरा

हरभरासाठी किमान आधारभूत किंमत 5100 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. यामध्ये 225 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 4.6 टक्के आहे. शेतकऱ्यांना खर्चाच्या किंमतीवर 78 टक्के नफा मिळणार आहे.



● मसूर

मसूरसाठीची किमान आधारभूत 5100 रुपये प्रतिक्विंटल असणार आहे. यामध्ये 300 प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. यात 6.3 टक्के वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खर्चाच्या किंमतीवर 78 टक्के नफा मिळणार आहे.



● ज्वारी

ज्वारीची आधारभूत किंमत 1600 प्रतिक्विंटल ठरवण्यात आली आहे. यामध्ये प्रतिक्विंटल 75 रुपये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 4.9 टक्के आहे



● मोहरी

मोहरीची आधारभूत किंमत प्रति क्विंटल 4650 रुपये जाहीर केली आहे. यामध्ये प्रतिक्विंटरल 225 रुपये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 5.1 टक्के आहे


घटना आणि देशातील पहिले राज्य

 


● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान


● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान  


● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड


● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा


● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश


● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ 


● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब


● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक


● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक


● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश


● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)


● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र 


● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) 


● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड


● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

वाचा :- जम्मू-काश्मीर, कलम ‘३५ अ’ आणि ३७०



🅾️जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने पर्यटकांना काश्मीर सोडण्याचं आवाहन केल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. केंद्र सरकारने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याचं कारण दिलं असलं तरी केंद्र सरकारच्या या कृतीमुळे काश्मीरमधील राजकारण ढवळून निघालं आहे.


🅾️लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्तेत आल्यास ३७० कलम रद्द करण्यात येईल असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं होतं. आता शहाच केंद्रीय गृहमंत्री झाले असून त्यातच काश्मीरमध्येही ३८ हजार अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात आल्याने जम्मू- काश्मीरमधील ३५ अ आणि ३७० ही दोन्ही कलमे हटविण्याची चर्चा सुरू झाली आहे. काय आहेत ही कलमं त्याविषयीची ही माहिती... 


🧩कलम ३५ अ...


🅾️तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीर या राज्याला स्वतःची राज्यघटना असून ती १९५६मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये महाराजा हरिसिंग यांच्या काळातील; कायमस्वरूपी नागरिकांची व्याख्या परत आणण्यात आली. त्यानुसार १९११पूर्वी राज्यात जन्मलेले किंवा स्थायिक झालेले सर्व नागरिक किंवा संबंधित तारखेपूर्वी दहा वर्षांहून अधिक काळ कायदेशीर मार्गाने स्थावर मालमत्ता धारण केलेले नागरिक यांचा समावेश आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधून स्थलांतर केलेले सर्व नागरिक, त्यामध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झालेले नागरिकही येतील, हा राज्याचा विषय असेल. स्थलांतरितांच्या पुढील दोन पिढ्यांतील वंशजांचाही यात समावेश आहे. 


🧩कलम ३७०..


🅾️शख अब्दुल्ला यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे तसेच पंतप्रधान नेहरू संयुक्त राष्ट्रांमध्ये गेलेल असल्यामुळे या कलमाची आणि काश्मीर भारतात यावे यासाठी काय पावले उचलावीत असा पेच निर्माण झाला होता. अशावेळी सरदार पटेल यांनी ‘इन्स्ट्रमेंट ऑफ अ‍ॅक्सेशन’ अर्थात ‘सामीलनामा’ ही संकल्पना मांडली. (अन्य संस्थानांबाबत ‘विलीननामा’ ही संकल्पना आहे.) आणि या पेचातून यशस्वी तोडगा काढला. काश्मीरी जनतेचे काही अधिकार अबाधित ठेवत तसेच त्यांच्या सार्वमताची हमी देत काश्मीर भारतात सामील झाले. सदर कलमाच्या ‘अधिकारक्षेत्रात’ वेळोवेळी बदल झाले. मात्र भारतीय संविधानातील नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्यातील उच्च न्यायालयाची कार्यकक्षा, निवडणूक प्रक्रिया आदी बाबी काही अपवादात्मक तरतुदींद्वारे या राज्यास लागू होतात. राष्ट्रपती- संसद यांचे अधिकार, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, महालेखापालांचे कार्यक्षेत्र (कॅग), सर्वोच्च न्यायालयाची अधिकार व्याप्ती या बाबी भारताच्या मूळ राज्यघटनेत ‘जशा आहेत तशा’ स्थितीत काश्मीरलाही लागू होतात. मात्र, राज्य लोकसेवा, राज्यांतर्गत आणिबाणी लागू करणे, राज्याच्या सीमांमध्ये बदल करणे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असे राज्यघटनेतील मुद्दे काश्मीरला ‘जसेच्या तसे’ लागू होत नाहीत. म्हणजे नेमके काय तर, अशा मुद्यांचा अवलंब करण्यापूर्वी काश्मीरच्या राज्य विधानसभेची सहमती घेणे अनिवार्य होते. 


🅾️कलम ३५ अ कशामुळे चर्चेत?

वी द सिटिझन या स्वयंसेवी संस्थेने २०१४मध्ये कलम या कलमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. कलम ३६८अंतर्गत सुधारणांद्वारे हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे सांगून याचिकाकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. संसदेसमोर हे कलम मांडण्यात आले नाही, तसेच ते तातडीने लागू करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात दुसऱ्या एका प्रकरणात दोन काश्मिरी महिलांनी म्हणणे मांडले होते. कलम ३५अ आधारित राज्याच्या कायद्यामुळे आमच्या मुलांचे नागरिकत्व हिरावले गेले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते. 


🅾️विरोध का?

३५ अ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाटते आहे. कलम रद्द झाल्यास मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्ततेवर आधारित असल्याचे राज्यातील राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. ३५ अ रद्द झाल्यास राज्यात हिंदू धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडलेला नाही. राज्यातील जम्मू भागात हिंदू बहुसंख्य आहेत, तर लडाखमध्ये बौद्ध धर्मिक मोठ्या संख्येने आहेत. त्यांना खोऱ्यात संपत्ती खरेदी करण्याचा, तसेच स्थायिक होण्याचा अधिकार आहे.


वाचा :- आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष



📚 पहिली १९६० : सयाजी सिलम


📚 दसरी १९६२ : त्र्यंबक भरडे


📚 तिसरी १९६७ : त्र्यंबक भरडे


📚 चौथी १९७२ : एस. के. वानखेडे, बाळासाहेब देसाई


📚 पाचवी १९७८ : शिवराज पाटील, प्राणलाल वोरा


📚 सहावी १९८० : शरद दिघे


📚 सातवी १९८५ : शंकरराव जगताप


📚 आठवी १९९० : मधुकरराव चौधरी


📚 नववी १९९५ : दत्ताजी नलावडे


📚 दहावी १९९९ : अरुणलाल गुजराती


📚 अकरावी २००४ : बाबासाहेब कुपेकर


📚 बारावी २००९ : दिलीप वळसे-पाटील


📚 तरावी २०१४ : हरिभाऊ बागडे


📚 चौदावी २०१९ : नाना पटोले


वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने



1) गाडगे महाराज - अमरावती


2) समर्थ रामदास- सज्जनगड


3) संत एकनाथ - पैठण


4) गजानन महाराज - शेगाव


5) संत ज्ञानेश्वर - आळंदी


6) संत गोरोबा कुंभार - ढोकी


7) संत चोखा मेळा - पंढरपूर


8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी


9) संत तुकडोजी  - मोझरी


10) संत तुकाराम - देहू


11) साईबाबा - शिर्डी


12) जनार्दन स्वामी - कोपरगाव 


13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर


14) दामाजी पंत - मंगळवेढा


15) श्रीधरस्वामी - पंढरपूर


16) गुरुगोविंदसिंह - नांदेड


17) रामदासस्वामी - जांब


18) सोपानदेव - आपेगाव


19) गोविंदप्रभू - रिधपुर


20) जनाबाई - गंगाखेड


21) निवृत्तीनाथ - आपेगाव


वाचा :- समुह दर्शक शब्द


*✳️आब्याच्या झाडाची*▶️=- आमराई


*✳️उतारुंची*▶️= झुंबड


*✳️उपकरणांचा*▶️= संच


*✳️उटांचा, लमानांचा*▶️= तांडा


*✳️कसांचा*▶️= पुंजका, झुबका


*✳️करवंदाची*▶️= जाळी


*✳️कळ्यांचा*▶️= घड, लोंगर


*✳️काजूंची, माशांची*▶️= गाथण


*✳️किल्ल्यांचा*▶️= जुडगा


*✳️खळाडूंचा*▶️= संघ


*✳️गाईगुरांचे*▶️= खिल्लार


*✳️गरांचा* ▶️=कळप


*✳️गवताचा* ▶️=भारा


*✳️गवताची* ▶️=   पेंडी, गंजी


*✳️चोरांची, दरोडेखोरांची*▶️= टोळी


*✳️जहाजांचा*▶️= काफिला


*✳️तार्‍यांचा*▶️= पुंजका


*✳️तारकांचा*▶️= पुंज


*✳️दराक्षांचा*▶️= घड, घोस


*✳️दर्वाची* ▶️=जुडी


*✳️धान्याची*▶️= रास


*✳️नोटांचे*▶️ =पुडके


*✳️नाण्यांची*▶️= चळत


*✳️नारळांचा*▶️= ढीग


*✳️पक्ष्यांचा*▶️= थवा


*✳️परश्नप्रत्रिकांचा, पुस्तकांचा*▶️= संच


*✳️पालेभाजीची*▶️= जुडी, गडडी


*✳️वह्यांचा* ▶️=गठ्ठा


*✳️पोत्यांची, नोटांची*▶️=थप्पी


*✳️पिकत घातलेल्या आंब्यांची* ▶️=अढी


*✳️फळांचा*▶️= घोस


*✳️फलझाडांचा*▶️= ताटवा


*✳️फलांचा*▶️= गुच्छ


*✳️बांबूचे*▶️= बेट


*✳️मडक्यांची*▶️= उतररंड


*✳️महिलांचे* ▶️=मंडळ


*✳️लाकडांची, ऊसाची*▶️= मोळी


*✳️विधार्थ्यांचा* ▶️=गट


*✳️माणसांचा*▶️= जमाव


*✳️मलांचा* ▶️=घोळका


*✳️मग्यांची*▶️= रांग


*✳️मढयाचा*▶️= कळप


*✳️विमानांचा*▶️= ताफा


*✳️वलींचा*▶️= कुंज


*✳️साधूंचा*▶️= जथा


*✳️हरणांचा, हत्तींचा*▶️= कळप


*✳️सनिकांची/चे तुकडी,*▶️= पलटण, 


〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


*✳️आब्याच्या झाडाची*▶️=- आमराई


*✳️उतारुंची*▶️= झुंबड


*✳️उपकरणांचा*▶️= संच


*✳️उटांचा, लमानांचा*▶️= तांडा


*✳️कसांचा*▶️= पुंजका, झुबका


*✳️करवंदाची*▶️= जाळी


*✳️कळ्यांचा*▶️= घड, लोंगर


*✳️काजूंची, माशांची*▶️= गाथण


*✳️किल्ल्यांचा*▶️= जुडगा


*✳️खळाडूंचा*▶️= संघ


*✳️गाईगुरांचे*▶️= खिल्लार


*✳️गरांचा* ▶️=कळप


*✳️गवताचा* ▶️=भारा


*✳️गवताची* ▶️=   पेंडी, गंजी


*✳️चोरांची, दरोडेखोरांची*▶️= टोळी


*✳️जहाजांचा*▶️= काफिला


*✳️तार्‍यांचा*▶️= पुंजका


*✳️तारकांचा*▶️= पुंज


*✳️दराक्षांचा*▶️= घड, घोस


*✳️दर्वाची* ▶️=जुडी


*✳️धान्याची*▶️= रास


*✳️नोटांचे*▶️ =पुडके


*✳️नाण्यांची*▶️= चळत


*✳️नारळांचा*▶️= ढीग


*✳️पक्ष्यांचा*▶️= थवा


*✳️परश्नप्रत्रिकांचा, पुस्तकांचा*▶️= संच


*✳️पालेभाजीची*▶️= जुडी, गडडी


*✳️वह्यांचा* ▶️=गठ्ठा


*✳️पोत्यांची, नोटांची*▶️=थप्पी


*✳️पिकत घातलेल्या आंब्यांची* ▶️=अढी


*✳️फळांचा*▶️= घोस


*✳️फलझाडांचा*▶️= ताटवा


*✳️फलांचा*▶️= गुच्छ


*✳️बांबूचे*▶️= बेट


*✳️मडक्यांची*▶️= उतररंड


*✳️महिलांचे* ▶️=मंडळ


*✳️लाकडांची, ऊसाची*▶️= मोळी


*✳️विधार्थ्यांचा* ▶️=गट


*✳️माणसांचा*▶️= जमाव


*✳️मलांचा* ▶️=घोळका


*✳️मग्यांची*▶️= रांग


*✳️मढयाचा*▶️= कळप


*✳️विमानांचा*▶️= ताफा


*✳️वलींचा*▶️= कुंज


*✳️साधूंचा*▶️= जथा


*✳️हरणांचा, हत्तींचा*▶️= कळप


*✳️सनिकांची/चे तुकडी,*▶️= पलटण,


महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते



1. देवेंद्र फडणवीस (भाजप)  

4 दिवस, 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 2019 


2. पी के सावंत (काँग्रेस) - 

10 दिवस, 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1963

 

3. नारायण राणे (शिवसेना) - 

259 दिवस, 1 फेब्रुवारी ते 17 ऑक्टोबर 1999

 

4. शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस) - 

277 दिवस, 3 जून 1985 ते 6 मार्च 1986

 

5. मारोतराव कन्नमवार (काँग्रेस) - 370 दिवस, 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर1963

 

6. बाबासाहेब भोसले (काँग्रेस) - 377 दिवस, 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

वाचा :- जवाहर ग्राम योजना



🅾️योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999


🅾️योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना


🅾️लक्ष रोजगार निर्माण करणे


🅾️उद्देश जवाहर रोजगार योजनेस अधिक प्रभावी आणि व्यवहारिक बनविण्याच्या दृष्टीने जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली ग्रामीण भागामध्ये मागणी आधारीत सुविधा उभारून शाश्वत मालमत्ता उभारणे व निरंतर रोजगार उपलब्ध करणारी कायमस्वरूपी  साधन सामग्री तयार करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.


🅾️जवाहर ग्रामसमृद्धी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या 75:25% आर्थिक सहभागातून सुरू करण्यात आली.


🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋


💠💠शती.💠💠


🅾️वानिकी, लॉगिंग आणि मासेमारी यासारख्या शेती आणि संबंधित क्षेत्राचा वाटा जीडीपीच्या  होता, या क्षेत्राने  2014 मध्ये एकूण कामगारांपैकी% रोजगार मिळविला. कृषी क्षेत्राने जीडीपीच्या २% काम केले आणि देशातील एकूण कामगारांपैकी  रोजगार उपलब्ध झाला. 


🅾️मध्ये 2016  भारतीय अर्थव्यवस्था वैविध्यपूर्ण आणि घेतले आहे म्हणून, जीडीपी शेती योगदान हळू हळू 1951 ते 2011 पर्यंत कमी झाली आहे, पण तो अजूनही देशातील सर्वात मोठी रोजगार स्रोत आणि त्याच्या एकूणच सामाजिक व आर्थिक विकास लक्षणीय तुकडा आहे.


🅾️ पचवार्षिक योजनांमध्ये शेतीवर विशेष भर देण्यात आल्यामुळे आणि सिंचन, तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धतींचा वापर आणि शेती पतपुरवठा यांच्या तरतूदीत सातत्याने सुधारणा केल्यामुळे सर्व पिकांचे पीक-उत्पन्न-प्रति-युनिट-क्षेत्र १ since since० पासून वाढले आहे.

 

🅾️भारतातील हरित क्रांतीपासून अनुदान. तथापि, आंतरराष्ट्रीय तुलनेत भारतातील सरासरी उत्पादन हे सहसा जगातील सर्वाधिक सरासरी उत्पादनाच्या 30% ते 50% पर्यंत असल्याचे दिसून येते. राज्यांत उत्तरप्रदेश , पंजाब , हरियाणा , मध्यप्रदेश , आंध्रप्रदेश , तेलंगणा , बिहार , पश्चिमबंगाल , गुजरात आणिभारतीय शेतीत महाराष्ट्र महत्त्वपूर्ण योगदान देणारा आहे.


विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी


🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी


🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स


🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी


🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी


🔶 मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी


🔶 पराणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी


🔶पथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी


🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी


🔶 धातूंचा अभ्यास - मेटलर्जी


🔶 भगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी


🔶 जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी


🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी


🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स


🔶 पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी


🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी


🔶 आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स


🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी


🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी


🔶 हरदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी


🔶 अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स


🔶 पराणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी


🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी


🔶 जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री


🔶 सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी


🔶 रगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स


🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी


🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर


🔶 शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी


🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी


 मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी


🔶 भपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती


✏️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर


✏️गजरात -भिल्ल


✏️झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख


✏️तरिपुरा - चकमा, लुसाई


✏️उत्तरांचल - भुतिया 


✏️करळ - मोपला, उरली


✏️छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब 


✏️नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी


✏️आध्रप्रदेश - कोळम, चेंचू


✏️पश्चिम - बंगाल संथाल, ओरान 


✏️महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली


✏️मघालय - गारो, खासी, जैतिया


✏️सिक्कीम - लेपचा 


✏️तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा

शाश्वत विकास १७ ध्येये



१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.


 २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.


३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.


४. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.


५. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.


६. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.


७. सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.


८. शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.


९.पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.


१०. विविध देशांमधील असमानता दूर करणे.


११. शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.


१२. उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.


१३. हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.


१४. महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.


१५.परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.


१६. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.


१७. चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांचे निधन



- ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे करोना संसर्गाने  कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.


-  वयाची ६८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तीनच दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. बसू यांना यांना मूत्रपिंडाचाही आजार होता. 


- डॉ. बसू यांना २०१४ साली पद्मश्री उपाधीने गौरवण्यात आले होते.


-  ‘आयएनएस अरिहंत’ या अणुऊर्जेवर चालणाऱ्या भारताच्या पहिल्या पाणबुडीसाठी अतिशय गुंतागुंतीची अणुभट्टी (रिअ‍ॅक्टर) तयार करण्याचेही ते प्रणेते होते.


- २०१२ साली डॉ. बसू यांनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली. 


- तारापूर व कलपक्कम येथील ‘न्यूक्लियर रिसायकल प्लांट’ यांचा आराखडा, बांधकाम व संचालन यामागे प्रामुख्याने त्यांचीच प्रतिभा होती.


- प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉ. बसू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, त्यांच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना दर्शवली आहे .

वसुंधरा शिखर परिषद



- ‘वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायर्नमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’च्या अहवालाच्या आधारावर एकविसाव्या शतकातील जगातील पर्यावरण आणि शाश्वत विकासाबाबत चर्चा करण्यासाठी १९९२ सालच्या जूनमध्ये ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे ‘संयुक्त राष्ट्रे पर्यावरण व विकास परिषद (युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायर्नमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट)’ झाली.


-  पर्यावरणसंवर्धनाच्या अनुषंगाने विकासाचे धोरण काय असायला हवे, या विषयावर चर्चा करणारी ही पहिलीच परिषद. ही परिषद ‘अर्थ समिट’ किंवा ‘वसुंधरा शिखर परिषद’ या नावाने अधिक ओळखली जाते. १५० राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या परिषदेत- शाश्वत विकासाची कास धरूनच जगातील, विशेषत: विकसनशील देशांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि संरक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे, हा मुद्दा प्रकर्षांने चर्चिला गेला.


- याच परिषदेत ‘अजेण्डा-२१’ या कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी मंजुरी दिली. हा करार म्हणजे सध्याच्या आर्थिक व पर्यावरणदृष्टय़ा असमान जगातील शाश्वत समाजसंघटनासाठी सर्व राष्ट्रांनी मिळून केलेली


- राज्यकारभाराविषयीची मान्यताप्राप्त ‘ब्ल्यू प्रिंट’ आहे. शाश्वत विकासाची धोरणे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी या ‘अजेण्डा-२१’मध्ये आहेत. या वसुंधरा शिखर परिषदेत- गरिबीचे समूळ उच्चाटन करणे, जीवनमान उंचावणे, जीवावरणातील विविध परिसंस्थांचे आरोग्य अबाधित राखणे, त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य, हे व असे २७ मुद्दे असलेला ‘रिओ जाहीरनामा’ प्रसृत करण्यात आला.


- भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सामाजिक व आर्थिक पर्यावरण विचारात घेऊन, गरजांनुसार त्यात योग्य ते बदल करून राष्ट्रीय अजेण्डा तयार करणे व त्याची रीतसर अंमलबजावणी करणे, हे देशाच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. 


- ‘अजेण्डा-२१’मध्ये नमूद केल्यानुसार, भारतात मानवी आरोग्याचे संरक्षण, शाश्वत शेती व ग्रामीण विकास, जलसंधारण आदी कार्यक्रमांस प्रोत्साहन देणे व पर्यावरण आणि विकास यांत एकात्मता आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शाश्वत विकासात सहभागी असलेल्या अशासकीय संस्था, व्यापार व उद्योग क्षेत्रे सक्षम करून त्यांचे सहकार्य घेतले जावे हे अपेक्षित आहे. यासाठी जलसंसाधनांचा विकास, त्यांचे व्यवस्थापन आणि वापर यांसाठी एकात्मिक (इंटिग्रेटेड) पद्धतीचे उपयोजन करण्याचे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. 


- जैवविविधता टिकविण्यासाठी व्यवस्थापन कार्यक्रम राबविले जात आहेत. पर्यावरणरक्षणाबाबत शिक्षण, लोकजागृती व प्रशिक्षण यांसाठी विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांत स्थानिक प्रशासन आणि विविध संस्था यांचा सहभाग मोलाचा ठरत आहे.

सुकन्या समृद्धी योजना.


🅾️अतर्गत एक पालक आपल्या केवळ दोन मुलींकरिता हे खाते उघडू शकतो आणि दोघींचा खात्यात एका वर्षात 1.50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार नाही


🅾️मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्या झाल्यास तीन मुलींकरिता हे खाते उघडले जाऊ शकते


🅾️सकन्या समृद्धी योजना ही योजना मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे


🅾️सकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे पासबुक काढताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे


🅾️मलीचा जन्म दाखला

ओळखपत्रनिवासी दाखला

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या परिपक्वते नंतर यामध्ये जमा झालेली रक्कम ही संबंधित मुलीच्या मालकीची असते


🅾️सकन्या समृद्धी योजना अंतर्गत भारतात हे खाते कुठेही काढता येऊ शकते  तसेच सोयीनुसार खाते कुठेही स्थानांतरित करता येऊ शकते 


🅾️सकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातेधारक मुलगी वयाच्या दहा वर्षानंतर स्वतःची आपले खाते हाताळू शकते


🅾️सकन्या समृद्धी योजनेअंतर्गत किमान एक हजार रुपये दर वर्षी न भरू शकल्यास त्यासाठी पन्नास रुपये दंड आकारला जाईल मात्र दंडाच्या रकमेसह 14 वर्षांपर्यंत कधी ही हे खाते पुन्हा सुरू करण्याची यामध्ये तरतूद आहे


🅾️सकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींच्या पालकांना मुलीच्या जन्मानंतर वयाच्या 10 वर्षांपर्यंत हे खाते  केव्हाही उघडता येऊ शकते


🅾️सकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ज्या मुलीच्या नावे खाते आहे ती मुलगी देशातील कोणत्याही भागात केली तर तिचे खाते तिथे हस्तांतरित करता येते


🅾️सकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे नावे खाते उघडल्यानंतर भरलेली रक्कम मुलगी 14 वर्षांची होईपर्यंत ठेवणे बंधनकारक राहील


🅾️सकन्या समृद्धी योजना सुरू करण्याच्या एक वर्ष अगोदर ज्या मुली 10 वर्षाच्या झाल्या आहेत अशा मुलीही या योजनेस पात्र ठरतील

जलयुक्त शिवार' अभियानाचे काही प्रमुख उद्देश..


🅾️पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे


🅾️भगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे


🅾️राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे


🅾️भजल अधिनियमाची अंमलबजावणी


🅾️विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे


🅾️पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे


🅾️अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे


🅾️जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे


🅾️पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे.

ईश्वर चंद्र विद्यासागर


📌 26 सप्टेंबर 1820 ते 29 जुलै 1891


📌 मळ नाव :- नाव ईश्वरचंद्र बन्दोपाध्याय.



◾️1839 साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती


◾️तयांचे पुस्तक 'बोर्नो पोरीचॉय' (अक्षर परिचय),अद्याप बंगाली वर्णमाला शिकण्यासाठी प्रारंभिक मजकूर म्हणून वापरला जातो


◾️महिलांच्या शिक्षणसाठी समर्थक असे


◾️शिक्षणखात्यातर्फे मुली शिकल्या पाहिजेत, या हेतूने त्यांनी 35 नवीन बालिका विद्यालये, एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय आणि बंगालमधील प्रमुख शहरांत आदर्श (Model) विद्यालये स्थापन केली


◾️1856 साली विधवाविवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता.


◾️ईश्वरचंद्र हे स्वतः कर्ते सुधारक होते. स्वतःच्या मुलींची लग्‍ने त्यांनी त्या चौदा-पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केली नाहीत. आपल्या मुलाचे लग्‍न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिले होते


◾️बगाली वृत्तपत्र -शोम प्रकाश 1858 मध्ये प्रकाशन करण्यास सुरुवात केली


◾️1877 साली कलकत्त्यास भरलेल्या दरबारात ईश्वरचंद्र यांना इंग्‍लंडच्या राणीकडून बहुमानाची सनद मिळाली व पुढे ‘सी. आय. इ.’ ही पदवीही मिळाली.


◾️‘मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो’, असे ते म्हणत.


◾️सारे जग त्यांना ‘विद्यासागर’ म्हणून ओळखीत असले, तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना ‘दयासागर’ म्हणूनच अधिक ओळखते.

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.


कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती


कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे


कलम १४. - कायद्यापुढे समानता


कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा


कलम १८. - पदव्या संबंधी


कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार


कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी


कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.


कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना


कलम ४४. - समान नागरी कायदा


कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण


कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन


कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग


कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे


कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक


कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता


कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही


कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ


कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता


कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक


कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार


कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ


कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार


कलम ७६. - भारताचा महान्यायवादी


कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल


कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य


कलम ७९ - संसद


कलम ८० - राज्यसभा


कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील


कलम ८१. - लोकसभा


कलम ८५. - संसदेचे अधिवेशन


कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते


कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो


कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही


कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो


कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या


कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक


कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार


कलम १२४. - सर्वोच न्यायालय


कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.


कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात


कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक


कलम १५३. - राज्यपालाची निवड


कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ


कलम १५७. - राज्यपालाची पात्रता


कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)


कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती


कलम १७०. - विधानसभा


कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग


कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक


कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार


कलम २१४. - उच्च न्यायालय


कलम २३३. - जिल्हा न्यायालय


कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये


कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार


कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी


कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार


कलम २८०. - वित्तआयोग


कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा


कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग


कलम ३२४. - निवडणूक आयोग


कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा


कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा


कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती


कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी


कलम ३५६. - राज्य आणीबाणी


कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी


कलम ३६८. - घटनादुरुस्ती


कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती


कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे


कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता

पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX): भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे नौदल यांच्यामधला संयुक्त सागरी सराव


💬 पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यामधला संयुक्त “पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX) नामक सागरी सराव आयोजित करण्यात आला.


♦️ठळक बाबी....


💬 दोन्ही नौदलांच्या दरम्यान होणाऱ्या कार्यात सुसूत्रबद्धता राखणे, एकमेकांना समजून घेणे तसेच सुयोग्य पद्धतीना आत्मसात करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.


💬 सरावात भारतीय नौदलाच्या INS सह्याद्री आणि INS कर्मुक या जहाजांनी भाग घेतला होता.हा भारतीय नौदलाच्या पुढाकाराने मित्र राष्ट्रांच्या नौदलासोबत नियमितपणे आयोजित केला जाणार सराव आहे.


♦️ऑस्ट्रेलिया देश....


💬 ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे. कॅनबेरा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे