Saturday 26 September 2020

वाचा :- रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ



●  केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. गहू, चना, मसूर, मोहरी, ज्वार आणि सुर्यफूलासह रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या वाढीस केंद्राने मान्यता दिली आहे.


रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, केंद्र सरकारचा निर्णय


गहू, चना, मसूर, मोहरी, ज्वार आणि सुर्यफूलासह रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या वाढीस केंद्राने मान्यता दिली आहे.


एबीपी माझा वेब टीमLast Updated: 21 Sep 2020 08:32 PM (IST)


नवी दिल्ली : कृषी विधेयकावर अभूदपूर्व गोंधळानंतत केंद्रातील मोदी सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. सोमवारी याला मंजुरी मिळाली आहे. गहू, चना, मसूर, मोहरी, ज्वार आणि सुर्यफूलासह रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या वाढीस केंद्राने मान्यता दिली आहे.

● कोणत्या पिकाची किमान आधारभूत किंमत किती वाढली:-



● गहू

गव्हाचे किमान आधारभूत किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे गव्हाची किमान आधारभूत किंमत 1975 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. ही वाढ 2.6 टक्के आहे. शेतकऱ्याला किंमतीवर 106 टक्के नफा मिळेल.



● हरभरा

हरभरासाठी किमान आधारभूत किंमत 5100 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. यामध्ये 225 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 4.6 टक्के आहे. शेतकऱ्यांना खर्चाच्या किंमतीवर 78 टक्के नफा मिळणार आहे.



● मसूर

मसूरसाठीची किमान आधारभूत 5100 रुपये प्रतिक्विंटल असणार आहे. यामध्ये 300 प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. यात 6.3 टक्के वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खर्चाच्या किंमतीवर 78 टक्के नफा मिळणार आहे.



● ज्वारी

ज्वारीची आधारभूत किंमत 1600 प्रतिक्विंटल ठरवण्यात आली आहे. यामध्ये प्रतिक्विंटल 75 रुपये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 4.9 टक्के आहे



● मोहरी

मोहरीची आधारभूत किंमत प्रति क्विंटल 4650 रुपये जाहीर केली आहे. यामध्ये प्रतिक्विंटरल 225 रुपये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 5.1 टक्के आहे


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...