2025 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याला भारताचे सर्वोच्च प्राधान्य: डॉ हर्ष वर्धन


👁‍🗨 कद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी 23 सप्टेंबर 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांचे सभासद, संयुक्त राष्ट्रसंघ संस्थांचे प्रमुख आणि प्रतिनिधी आणि भागीदारी संस्था यांच्याशी आभासी पद्धतीने संवाद साधला. बैठकीत त्यांनी क्षयरोगाच्या उच्चाटनाबाबत भारताच्या भूमिकेविषयी स्पष्टता दिली.


🔵 भारत सरकारचे प्रयत्न....


👁‍🗨 कषयरोग एक प्रमुख जागतिक आरोग्य समस्या आहे.भारताने 2025 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. म्हणजेच जागतिक शाश्वत ध्येयाच्या 2030 सालाच्या मुदतीपूर्वी साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.अनेक नवोन्मेष योजनांच्या माध्यमातून क्षयरोग निर्मुलनासाठी अनेक महत्त्वाचे उपाय योजिले आहेत.


👁‍🗨  नोंद नसलेल्या क्षयरोगांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. 2016 साली रुग्णांच्या एक दशलक्ष संख्येवरुन ही संख्या 2019 साली अर्ध्या दशलक्षावर आली.वर्ष 2020 मध्ये 2.4 दशलक्ष रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी एक तृतीयांश नोंदी खासगी क्षेत्राच्या मदतीने केल्या गेल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यात रॅपीड मोलेक्युलर निदान चाचणी सुविधा प्रदान केल्यामुळे 2019 साली 66,000 रुग्ण ओळखण्यास मदत झाली.


👁‍🗨 कोविड-19 महामारीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळात क्षयरोग रुग्णांना घरपोच औषधी पुरविण्यात आली. तसेच सुदूर-संवाद, सक्रीय छाननी अनेक रुग्णांसाठी फलदायी ठरली.टाळेबंदीनंतर क्षयरोग रोग्यांना ओळखण्याविषयी राज्य सरकारांसाठी नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


👁‍🗨 सरकारने क्षयरोग आणि कोविड रूग्णांमध्ये बाय-डिरेक्शनल तपासणी आणि ILI आणि SARI प्रकरणांमध्ये क्षयरोगाची तपासणी आरंभ करण्यात आल्या.सरकारने थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून क्षयरोग्यांना आर्थिक मदत देत आहे. एप्रिल 2018 पासून 3 दशलक्ष लाभार्थ्यांना 7.9 अब्ज रुपये एवढी रक्कम दिली गेली.


🔵क्षयरोगाविषयी....


👁‍🗨 हा रोग प्राचीन काळापासून जगातल्या अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक असलेल्या ‘TB बॅसीलस’ नामक जिवाणूचा शोध लागला.


👁‍🗨 कषयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णाला डॉट्स (DOTS) प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...