Saturday 26 September 2020

अक्किथम अच्युतन नंबुथिरी (मल्याळी कवि): 55 व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी.


🧩परसिद्ध मल्याळी कवि अक्किथम अच्युतन नंबुथिरी यांचा 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.


🅾️अक्किथम नंबुथिरी विषयी....


🧩मल्याळी साहित्यातले नामांकित व्यक्तित्व असलेले अक्किथम नंबुथिरी यांच्या नावावर 55 पुस्तके आहेत, त्यात 45 काव्यसंग्रह आहेत.


🧩93 वर्षांचे अक्किथम नंबुथिरी यांना साहित्य अकादमी, पद्मश्री, कबीर यासहित देशातले बहुतेक सारे वाङ्मयीन पुरस्कार लाभले. ‘उन्नी नंबुद्री’ या मासिकाचे ते संस्थापक आहेत. याशिवाय, त्यांनी ‘आकाशवाणी’मध्ये दीर्घकाळ काम केले.


🧩‘योगक्षेम सभा’ आणि ‘पलियम सत्याग्रह’ या दोन संस्थांमार्फत त्यांनी अनेक दशके सामाजिक कार्ये केलीत.


🅾️जञानपीठ पुरस्काराविषयी...


🧩जञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. पुरस्कारस्वरूप प्रमाणपत्र, वाग्देवीची प्रतिमा आणि अकरा लक्ष रुपयांचा धनादेश दिला जातो.


🧩22 मे 1961 रोजी रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी स्वतःच्या कौटुंबिक न्यासच्यावतीने भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देण्याची घोषणा केली.


🧩भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...