Saturday 26 September 2020

‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी.


🔰संरक्षण क्षेत्रात स्वत:ला अधिक बळकट करत भारतानं मोठं यश संपादन केलं आहे.


🔰सट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी केली.ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


🔰या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला.पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे.


🔰“350 किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-3 मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं,” अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्यां दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...