Saturday 26 September 2020

ईश्वर चंद्र विद्यासागर


📌 26 सप्टेंबर 1820 ते 29 जुलै 1891


📌 मळ नाव :- नाव ईश्वरचंद्र बन्दोपाध्याय.



◾️1839 साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती


◾️तयांचे पुस्तक 'बोर्नो पोरीचॉय' (अक्षर परिचय),अद्याप बंगाली वर्णमाला शिकण्यासाठी प्रारंभिक मजकूर म्हणून वापरला जातो


◾️महिलांच्या शिक्षणसाठी समर्थक असे


◾️शिक्षणखात्यातर्फे मुली शिकल्या पाहिजेत, या हेतूने त्यांनी 35 नवीन बालिका विद्यालये, एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय आणि बंगालमधील प्रमुख शहरांत आदर्श (Model) विद्यालये स्थापन केली


◾️1856 साली विधवाविवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता.


◾️ईश्वरचंद्र हे स्वतः कर्ते सुधारक होते. स्वतःच्या मुलींची लग्‍ने त्यांनी त्या चौदा-पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केली नाहीत. आपल्या मुलाचे लग्‍न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिले होते


◾️बगाली वृत्तपत्र -शोम प्रकाश 1858 मध्ये प्रकाशन करण्यास सुरुवात केली


◾️1877 साली कलकत्त्यास भरलेल्या दरबारात ईश्वरचंद्र यांना इंग्‍लंडच्या राणीकडून बहुमानाची सनद मिळाली व पुढे ‘सी. आय. इ.’ ही पदवीही मिळाली.


◾️‘मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो’, असे ते म्हणत.


◾️सारे जग त्यांना ‘विद्यासागर’ म्हणून ओळखीत असले, तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना ‘दयासागर’ म्हणूनच अधिक ओळखते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...