Saturday 26 September 2020

DRDO एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं.


💠 लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे.


💠 डीआरडीओने लेझर गाइडेड रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (ATGM) यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.अहमदनगरच्या केके रेंज येथे एमबीटी अर्जुनवरुन या मिसाइलची चाचणी करण्यात आली.


💠 “नजीक भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मेहनत करणाऱ्या डीआरडीओच्या टीमचा भारताला अभिमान आहे” असे राजनाथ सिंह यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


💠 आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल अहमदनगर येथे यशस्वी चाचणी केल्याचे डीआरडीने मंगळवारी जाहीर केले होते.एमबीटी अर्जुन रणगाडयावरुन डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने तीन किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूकतेने वेध घेतला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...