16 March 2020

मुंबई सेंट्रलचे नामकरण आता जगन्नाथ शंकरशेट स्थानक..



🩸मुंबईचे आद्य शिल्पकार आणि भारतीय रेल्वेचे जनक जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकास देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

🩸आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी जाईल.भारतीय रेल्वेच्या जनकांपैकी एक असलेले जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे, ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यांच्या पुढाकाराने आशियातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे यादरम्यान सुरू झाली.

🩸तर त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीमध्ये त्यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची मागणी वारंवार होत असते.

🩸तसेच त्यातूनच जुलै- 2018 मध्ये ‘एलफिन्स्टन रोड’चे नामकरण ‘प्रभादेवी’ असे केले होते. चर्नी रोड, ग्रँट रोड, करी रोड, दादर याही स्थानकांच्या नामबदलाची मागणी केली जात आहे.

जनगणनेत कुटुंबाकडील लॅपटॉप, स्मार्ट फोनचीही नोंद

🔰 दशवार्षिक जनगणनेसाठी प्रगणकांना यंदा मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अ‍ॅपचा वापर करुन जनगणना करणाऱ्यांना अधिक मानधन मिळणार आहे, तर कागदपत्रांवरील नमुन्यात नोंदी करणाऱ्या प्रगणकांना कमी मानधन दिले जाणार आहे. या शिवाय प्रगणक प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन नोंदी करतो की नाही, याची पडताळणी विशेष ‘पोर्टल’मार्फत केली जाणार आहे. यंदाच्या जनगणनेत कुटुंबाकडील इंटरनेट, लॅपटॉप, स्मार्ट फोन याची प्रथमच नोंद होणार आहे, याशिवाय कुटुंब कोणते धान्य सेवन करते, याचीही स्वतंत्र नोंद केली जाणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे.

🔰 जनगणनेची पूर्वतयारी प्रशासनाच्या पातळीवर सुरु झाली आहे. यंदाची दशवार्षिक जनगणना प्रत्यक्षात ९ फेब्रुवारी २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होणार असली तरी त्यापूर्वी १ मे ते २० मे २०२० या कालावधीत जनगणनेतील कुटुंबाची घरयादी तयार केली जाणार आहे. प्रगणक म्हणून प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. घरयादी तयार करताना एका प्रगणक गटाकडे १५० ते २०० कुटुंबे, म्हणजे ६५० ते ७०० लोकसंख्या राहील, अशी रचना केली जाणार आहे.

🔰 एका गटावर पाच ते सहा पर्यवेक्षक नियुक्त केले जाणार आहेत. हे प्रगणक कुटुंबाची यादी तयार करण्यापूर्वी त्यांना दिलेल्या भागाचा नकाशा तयार करतील. त्याच्या मोजणीची सुरुवात वायव्य दिशेने (उत्तर व पश्चिम यांच्यामधील) होईल व नागमोडी (झिगझ्ॉग) पद्धतीने इमारतींना क्रमांक देऊन आग्नेय दिशेला (दक्षिण व पूर्व यांच्यामधील) त्याचा समारोप करतील.

​कोरोना : मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत

✅केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

चीनमधील वुहानपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस पूर्ण जगामध्ये वाढत चालला आहे. कोरोनाव्हायरसने जगभरात आतापर्यंन 4300 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. भारतात देखील भीतीचे वातावरण आहे. भारतात कोरोना विषाणूने दोघांचा बळी घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत आर्थिक मदत जाहीर केली आहे. या बरोबच, केंद्र सरकारने करोना विषाणूच्या भारतातील उद्रेकाला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे.

दरम्यान, भारतात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात कोरोनामुळे 76 वषीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर, शुक्रवारी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात 68 वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महिलेल्या तिच्या मुलामुळे कोरोनाचा संसर्ग झाला होता. या महिलेचा मुलगा 5 ते 22 फेब्रुवारी दरम्यान स्वित्झर्लंड आणि इटलीच्या दौऱयावर होता. सध्या महिलेच्या मुलाचा उपचार सुरु आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण 85 जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. उपचारांनंतर 10 जण बरे झाले आहेत. करोनाचा उदेक पाहता देश, तसेच जगभरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अमेरिकेने तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे

राष्ट्रीय सभा चे 2 वेळा आद्यक्ष होणारे व्यक्ती

🔘व्योमेश्चंद्र बॅनर्जी:-

1885: मुंबई
1892:अलाहाबाद

🔘विल्यम वेडर्नबर्ग:-

1889:मुंबई
1910:अलाहाबाद

🔘सुरेंद्रनाथ बॅनर्जी:-

1895:पूणे
1902:अहमदाबाद

🔘रासबिहारी बोस:-

1907:सुरत
1908:मद्रास

🔘मदन मोहन मालवीय:-

1909:लाहोर
1918:दिल्ली

🔘मोतीलाल नेहरू:-

1919:अमृतसर
1928:कलकत्ता

🔘जवाहरलाल नेहरू:-

1929:लाहोर
1936:फैजपूर

🔘सुभाषचंद्र बोस:-

1938:हरिपुरा
1939:त्रिपुरी

👉 8 व्यक्तीनि काँग्रेस चे 2 वेळा अद्यक्ष पद भूषवले

ग्रीसमध्ये पहिली महिला अध्यक्ष

🔸 ग्रीसच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश कतरिना साकेल्लारोपोलो यांची देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. शुक्रवारी एका साध्या समारंभात त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली.

🔸निवडणुकीत विजय मिळाल्यानंतरही दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कतरिना यांना शपथ घेतली असून, करोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर शपथविधी सोहळा पार पडला. या वेळी अगदी मोजके लोकप्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते. कतरिना यांनी मास्क लावूनच शपथ घेतली.

🔸ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांनी कतरिना यांच्या नावाला अनुमोदन दिले होते. जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत कतरिना २९४ पैकी २६१ मते मिळवून त्या मोठ्या मताधिक्याने जिंकून आल्या.

🔸 ग्रीसमध्ये राजकारणात ज्येष्ठ पदांवर अगदी मोजक्याच महिला आहेत. त्यामुळे मित्सोटाकीस यांनी कतरिना यांच्या नावाला अनुमोदन दिल्यानंतर त्यांना संसदेतील पुरुषांच्या टीकेला सामोरे जावे लागले. ग्रीकच्या मंत्रिमंडळात सध्या १८ वरिष्ठ पदांवर पुरुष असून, त्यामध्ये एकाही महिलेला स्थान मिळालेले नाही.

🔸करोना'मुळे ग्रीसमध्ये शाळा, कॉलेज, विद्यापीठे, सिनेमागृहे, व्यायामशाळा, नाइटक्लब बंद ठेवण्यात आले आहे. ग्रीसमध्ये आतापर्यंत ११७ जणांना करोनाची लागण झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे.

मास्क आणि हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये

🔰केंद्र सरकारने N95 मास्क, सर्जिकल मास्क आणि हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने याबाबत आदेश दिला आहे.

🔰देशभरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागणाऱ्या मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी त्यांचा काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे चढ्या दराने विक्री, साठेबाजी आणि काळाबाजार रोखणे शक्य होणार आहे. सदर आदेश 30 जून 2020 पर्यंत कायम राहणार असून त्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

🔰या निर्णयामुळे, बाजारात जर आपल्याला मास्क मिळाला नाही तर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 1800-11-400 या राष्ट्रीय ग्राहक क्रमांकावर तक्रार करावी लागणार.

अत्यावश्यक वस्तू कायदा-1955

🔰अत्यावश्यक वस्तू कायदा हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे. चढ्या दराने वस्तूंची विक्री, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. यात अन्न-धान्य, औषधे, खते, डाळी व खाद्यतेल आणि इंधन (पेट्रोलियम उत्पादने) इत्यादींचा समावेश आहे.

🔰या व्यतिरिक्त, सरकार अत्यावश्यक वस्तू घोषित करण्यात आलेल्या कोणत्याही डब्बाबंद असलेल्या उत्पादनाची कमाल किरकोळ किंमत (MRP) निश्चित करू शकते. गरज भासते तेव्हा केंद्र सरकार या यादीत नवीन वस्तूंचा समावेश करू शकते आणि परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना या यादीतून वगळू शकते.

जगभरातील 74 हजार कोरोना संक्रमित झाले ठणठणीत बरे

- कोरोना विषाणूचा फैलाव जगभरातील 100 हून अधिक देशात झाला आहे. या रोगावर अद्याप लस उपलब्ध झाली नसल्याने त्याला सपोर्टीव्ह औषधे देण्यात येतात. तरी देखील जगभरातील 73,968 कोरोना संक्रमित रुग्ण या रोगातून सुखरूप बरे झाले आहेत.

- जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरात 1 लाख 56 हजारहून अधिक जणांना याची लागण झाली आहे. तर 5833 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या वृहान प्रांतातून पसरत असलेल्या विषाणूने चीनमध्येच 3085 जणांचा बळी घेतला आहे. तर 81 हजार जणांना याची लागण झाली आहे.

- कोरोनाच्या धास्तीमुळे जगभरातील अनेक शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, नाटय़गृह बंद ठेवण्यात आली आहेत. चीनमधून लागण झालेल्या 81 हजार कोरोना रुग्णांपैकी 54 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर चीनपाठोपाठ इटलीमधील 1966 रुग्ण, इराणमधील 2959 तर स्पेनमधील 517 जण यातून बरे झाले आहेत
------------------------------------------------

General knowledge

▪ केनियात आढळणाऱ्या जिराफच्या कोणत्या जातीत केवळ एकटाच नर जीवंत आहे?
उत्तर : पांढरा जिराफ

▪ भारत आणि अमेरिका यांची शिष्यवृत्ती असलेल्या ‘WISTEMM’ याचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर : विमेन इन सायन्स, टेक्नॉलजी, इंजिनीरिंग, मॅथेमॅटिक्स अँड मेडिसीन

▪ कोणत्या BSF प्रमुखाची मध्यप्रदेश पोलीस विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली?
उत्तर : व्ही. के. जोहरी

▪ भारत सरकार कोणत्या योजनेच्या अंतर्गत ‘हेल्थ बेनीफिट पॅकेज 2.0’ उपक्रम राबवित आहे?
उत्तर : आयुषमान भारत-PMJAY

▪ भारत ‘राष्ट्रकुल निधी’चे नाव कोणत्या राजकीय नेत्याच्या नावावरून ठेवण्याची योजना करीत आहे?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

▪ अफगाणिस्तानच्या कोणत्या दोन राजकीय नेत्यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केले?
उत्तर : अशरफ घानी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला

▪ उत्तरप्रदेश संरक्षण मार्गिका (UPDC) प्रकल्पामध्ये किती गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे?
उत्तर : रु. 20,000 कोटी

▪ भूषण पॉवर अँड स्टील कंपनी कोणत्या पोलाद निर्मिती कंपनीकडून विकत घेतली जाणार आहे?
उत्तर : JSW स्टील

▪ पेटीएमच्या साथीने हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी कोणती यंत्रणा सादर करणार आहे?
उत्तर : प्रवाश्यांसाठी QR वर आधारित असलेली तिकीट बुकिंग सिस्टम

मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देखील पाठवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून एका सुसज्ज आरामाराची स्थापना केली होती. म्हणून आजही महाराजांना भारतीय नौदलाचे सरसंस्थापक किंवा जनक असे म्हटले जाते.
स्वराजाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात कान्होजी आंग्रे यांच्या योगदानाला तोड नाही.
कान्होजींचा पराक्रम पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब बहाल केला.
कान्होजी आंग्रेंनी औरंजेबाच्या स्वारीच्या काळातच नव्हे तर पुढे १७२९ पर्यंत मराठा साम्राज्य.

15 March 2020

सामान्य ज्ञानावरील महत्वाचे प्रश्नः

▪ COVID-19 विषाणूचा उद्रेक कोणत्या देशातून झाला?
उत्तर : चीन

▪ कोणत्या राज्य सरकारने उच्च शिक्षणासाठी कर्जासाठी हमी देण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : हरयाणा

▪ 1 एप्रिल 2020 पासून कोणत्या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन होणार?
उत्तर : ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया

▪ “प्रज्ञान परिषद 2020” याच्या पहिल्या सत्राचा विषय काय होता?
उत्तर : ट्रान्सफॉर्मेशन इन द बॅटल स्पेसेस

▪ भारतीय रेल्वेच्या कोणत्या जुन्या रेलगाडीला नवे रूप दिले जाणार आहे?
उत्तर : डेक्कन क्वीन एक्सप्रेस

▪ 2020 साली 'बेंगळुरू इंडिया नॅनो' या परिषदेची कितवी आवृत्ती संपन्न झाली?
उत्तर : 11 वी

▪ भारतीय रिझर्व्ह बँकेनी 5 मार्च 2020 रोजी कोणत्या बँकेचे व्यवहार एका महिन्यासाठी मर्यादित केले?
उत्तर : येस बँक

▪ भारतात ‘जनऔषधी दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 7 जानेवारी

▪ नागरिकांना सार्वजनिक परिवहन विनामूल्य करणारा जगातला पहिला देश कोणता?
उत्तर : लक्झेमबर्ग

▪ भारताच्या कोणत्या शहरात गुगल कंपनी दुसरे क्लाऊड स्टेशन उघडणार आहे?
उत्तर : नवी दिल्ली

▪ केनियात आढळणाऱ्या जिराफच्या कोणत्या जातीत केवळ एकटाच नर जीवंत आहे?
उत्तर : पांढरा जिराफ

▪ भारत आणि अमेरिका यांची शिष्यवृत्ती असलेल्या ‘WISTEMM’ याचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर : विमेन इन सायन्स, टेक्नॉलजी, इंजिनीरिंग, मॅथेमॅटिक्स अँड मेडिसीन

▪ कोणत्या BSF प्रमुखाची मध्यप्रदेश पोलीस विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली?
उत्तर : व्ही. के. जोहरी

▪ भारत सरकार कोणत्या योजनेच्या अंतर्गत ‘हेल्थ बेनीफिट पॅकेज 2.0’ उपक्रम राबवित आहे?
उत्तर : आयुषमान भारत-PMJAY

▪ भारत ‘राष्ट्रकुल निधी’चे नाव कोणत्या राजकीय नेत्याच्या नावावरून ठेवण्याची योजना करीत आहे?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

▪ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला किती महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले?
उत्तर : 15

▪ अफगाणिस्तानच्या कोणत्या दोन राजकीय नेत्यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केले?
उत्तर : अशरफ घानी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला

▪ उत्तरप्रदेश संरक्षण मार्गिका (UPDC) प्रकल्पामध्ये किती गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे?
उत्तर : रु. 20,000 कोटी

▪ भूषण पॉवर अँड स्टील कंपनी कोणत्या पोलाद निर्मिती कंपनीकडून विकत घेतली जाणार आहे?
उत्तर : JSW स्टील

▪ पेटीएमच्या साथीने हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी कोणती यंत्रणा सादर करणार आहे?
उत्तर : प्रवाश्यांसाठी QR वर आधारित असलेली तिकीट बुकिंग सिस्टम

14 March 2020

General Knowledge

▪ केनियात आढळणाऱ्या जिराफच्या कोणत्या जातीत केवळ एकटाच नर जीवंत आहे?
उत्तर : पांढरा जिराफ

▪ भारत आणि अमेरिका यांची शिष्यवृत्ती असलेल्या ‘WISTEMM’ याचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर : विमेन इन सायन्स, टेक्नॉलजी, इंजिनीरिंग, मॅथेमॅटिक्स अँड मेडिसीन

▪ कोणत्या BSF प्रमुखाची मध्यप्रदेश पोलीस विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली?
उत्तर : व्ही. के. जोहरी

▪ भारत सरकार कोणत्या योजनेच्या अंतर्गत ‘हेल्थ बेनीफिट पॅकेज 2.0’ उपक्रम राबवित आहे?
उत्तर : आयुषमान भारत-PMJAY

▪ भारत ‘राष्ट्रकुल निधी’चे नाव कोणत्या राजकीय नेत्याच्या नावावरून ठेवण्याची योजना करीत आहे?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

▪ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला किती महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले?
उत्तर : 15

▪ अफगाणिस्तानच्या कोणत्या दोन राजकीय नेत्यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केले?
उत्तर : अशरफ घानी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला

▪ उत्तरप्रदेश संरक्षण मार्गिका (UPDC) प्रकल्पामध्ये किती गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे?
उत्तर : रु. 20,000 कोटी

▪ भूषण पॉवर अँड स्टील कंपनी कोणत्या पोलाद निर्मिती कंपनीकडून विकत घेतली जाणार आहे?
उत्तर : JSW स्टील

▪ पेटीएमच्या साथीने हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी कोणती यंत्रणा सादर करणार आहे?
उत्तर : प्रवाश्यांसाठी QR वर आधारित असलेली तिकीट बुकिंग सिस्टम

शास्त्रीय उपकरणे व वापर

▫️स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
▫️सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
▫️ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
▫️हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
▫️ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
▫️ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
▫️ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
▫️ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
▫️अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
▫️ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
▫️बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
▫️बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
▫️मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
▫️लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
▫️ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

दुसरी पंचवार्षिक योजना

🔘कालावधी:1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961

🩸भर:जड व मूलभूत उद्योग

🩸प्रतिमान:पी सी महालनोबिस

👉योजना

🔘दुसरे आद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956

🔘1957-58 राज्यात खादी व ग्रामउद्योग सुरुवात

🔘1960-61 सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम

🔘1959:भिलाई पोलाद-रशिया

🔘1959:रुरकेला पोलाद-पश्चिम जर्मनी

🔘1962:दुर्गापूर पोलाद:ब्रिटन

🔘भेल पोलाद

🔻खत खारखाना

नांगल व रुरकेला

⚫️वृद्धी दर

👁‍🗨संकल्पित:4.5%

👁‍🗨साध्य:4.21%

👉समाजवादी समाजरचना तत्व

👉भौतिकवादी योजना

13 March 2020

‘महामारी कायदा-1897’ लागू करण्याविषयी राज्यांना सूचना

➤ COVID-19 विषाणूचा प्रसार थांबावा यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना ‘महामारी कायदा-1897’ याच्या कलम 2 मधील तरतुदींना लागू करण्याविषयी सूचना केली आहे.

➤ या तरतुदींमुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या सर्व सुचनांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येते.

➤ या तरतुदींमुळे रेल्वेने किंवा इतर मार्गाने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची तपासणी करण्याचे अधिकार तसेच संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला लोकांपासून वेगळे करणे, रुग्णालयात, तात्पुरत्या निवासस्थानात स्थलांतरित करणे अश्या सक्तीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार देखील सरकारला देते.

➤ ‘महामारी रोग कायदा-1897’ पहिल्यांदा पूर्वीच्या बॉम्बे राज्यात ब्यूबोनिक प्लेगच्या वेळी लागू करण्यात आला होता.

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪ ‘नेचर रँकिंग इंडेक्स 2020’ यामध्ये कोणती संस्था अग्रस्थानी आहे?
उत्तर : वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

▪ ‘वर्ल्ड वाइड एज्युकेशन फॉर द फ्यूचर इंडेक्स’ कोणी प्रकाशित केले?
उत्तर : इकनॉमिक इंटेलिजेंस यूनिट

▪ ‘अटल किसान - मजदूर कँटीन’ उघडण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला?
उत्तर : हरयाणा

▪ कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
उत्तर : पी. व्ही. सिंधू

▪ ‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
उत्तर : क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस

▪ कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
उत्तर : तिताबोर

▪ कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
उत्तर : आसाम

▪ नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त कोण आहेत?
उत्तर : संजय कोठारी

▪ कोणते राज्य 20 फेब्रुवारी या दिवशी स्थापना दिवस साजरा करतात?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

▪ कोणत्या संस्थेनी ‘HRMS’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : भारतीय रेल्वे

घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी

👉घटने मध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही

👉धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही

👉समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही

👉घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही

👉घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत

👉घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही

👉घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही

👉घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही

👉घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही

👉संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही

👉उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

👉पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही

👉संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही

👉घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही

👉कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता

👉कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही

👉महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही

👉राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

👉घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही

👉घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही

👉व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही

👉CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

👉सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही

👉न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही

👉घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही

👉उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही

👉न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही

👉उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही

👉घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही

👉महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळ होणार स्थापन

एकसारखे व उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळाची स्थापना करण्यात येईल. नुकताच सरकारकडून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

तर त्यानंतर पालक-शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी, पालकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्याचे स्पष्टीकरण देत ही माहिती दिली.

राज्यात जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 66 हजार 33 शाळा कार्यरत आहेत. त्यामधील 81 शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू होते.

तसेच फक्त 81 शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण न देता जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये ते देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.