Monday 16 March 2020

जनगणनेत कुटुंबाकडील लॅपटॉप, स्मार्ट फोनचीही नोंद

🔰 दशवार्षिक जनगणनेसाठी प्रगणकांना यंदा मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अ‍ॅपचा वापर करुन जनगणना करणाऱ्यांना अधिक मानधन मिळणार आहे, तर कागदपत्रांवरील नमुन्यात नोंदी करणाऱ्या प्रगणकांना कमी मानधन दिले जाणार आहे. या शिवाय प्रगणक प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन नोंदी करतो की नाही, याची पडताळणी विशेष ‘पोर्टल’मार्फत केली जाणार आहे. यंदाच्या जनगणनेत कुटुंबाकडील इंटरनेट, लॅपटॉप, स्मार्ट फोन याची प्रथमच नोंद होणार आहे, याशिवाय कुटुंब कोणते धान्य सेवन करते, याचीही स्वतंत्र नोंद केली जाणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे.

🔰 जनगणनेची पूर्वतयारी प्रशासनाच्या पातळीवर सुरु झाली आहे. यंदाची दशवार्षिक जनगणना प्रत्यक्षात ९ फेब्रुवारी २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होणार असली तरी त्यापूर्वी १ मे ते २० मे २०२० या कालावधीत जनगणनेतील कुटुंबाची घरयादी तयार केली जाणार आहे. प्रगणक म्हणून प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. घरयादी तयार करताना एका प्रगणक गटाकडे १५० ते २०० कुटुंबे, म्हणजे ६५० ते ७०० लोकसंख्या राहील, अशी रचना केली जाणार आहे.

🔰 एका गटावर पाच ते सहा पर्यवेक्षक नियुक्त केले जाणार आहेत. हे प्रगणक कुटुंबाची यादी तयार करण्यापूर्वी त्यांना दिलेल्या भागाचा नकाशा तयार करतील. त्याच्या मोजणीची सुरुवात वायव्य दिशेने (उत्तर व पश्चिम यांच्यामधील) होईल व नागमोडी (झिगझ्ॉग) पद्धतीने इमारतींना क्रमांक देऊन आग्नेय दिशेला (दक्षिण व पूर्व यांच्यामधील) त्याचा समारोप करतील.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...