23 March 2020

राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना निमलष्करी दलाच्या परीक्षेत जादा गुण दिले जाणार

🔰 राष्ट्रीय छात्र सेनेत (NCC) देशातल्या अधिकाधिक युवांनी सहभागी व्हावे या हेतूने केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी (CAPF) घेण्यात येणाऱ्या थेट भरती परीक्षेत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना जादा (बोनस) गुण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

🔴ठळक बाबी

🔰 राष्ट्रीय छात्र सेनेचे “अ” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 टक्के जादा गुण, ”ब” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 टक्के जादा गुण तर “क” प्रमाणपत्र धारकांना 5 टक्के जादा गुण देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

🔰 उपनिरीक्षक आणि हवालदार पदांसाठी आगामी भरती परीक्षा देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

🔰 सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या संबधित पोलीस दलांच्या प्रवेश परीक्षांमध्ये अशाच प्रकारच्या प्रोत्साहक योजना राबवाव्या अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

🔰 सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती होण्यासाठी उत्तमरीत्या प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध तरुण अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार.

🔰 राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या युवांना शिस्तबद्धता आणि राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी भारतीय भुदल, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे.

🔰 NCCची 1948 साली स्थापना झाली व त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.

🔰 दरवर्षी NCC कडून मुलगी तसेच मुलग्यांसाठी पर्वतारोहणाच्या मोहिमा आयोजित करते.

महाराष्ट्र लॉकडाऊन : काय सुरु राहणार आणि काय बंद?

🔰कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. तूर्तास 31 मार्चपर्यंत हा निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आाहे.

🔰 काय बंद असेल?

● परदेशातून येणारी वाहतूक बंद.
● मालवाहतूक वगळता मुंबईची लोकलसेवा बंद.
● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं बंद.
● अत्यावश्यक सेवांसाठीचा वापर वगळता बेस्ट बसमध्ये सामान्य नागरिकांचा प्रवास बंद.
● शाळा, महाविद्यालयं बंद.
● मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद.
● मोठ्या प्रमाणावर कार्यालयं बंद. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सेवा पुरवण्यात याव्यात.
● शासकीय कार्यालयांमध्य फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती.

🔰काय सुरु असेल?

● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु.
● धान्य, किराणा मालाची दुकानं सुरु.
● भाजीपाला वाहतूक सुरु.
● औषधांची दुकानं सुरु.
● बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था सुरु.
● वीजपुरवठा कार्यालयं सुरु.

🔰आजपासून 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

WHO ने जाहीर केलेली जागतिक आरोग्य आणीबाणी

🔰 2009 स्वाइन फ्लूमुळे

🔰 2014 पोलिओ साठी

🔰 2016झिका विषाणू साठी

🔰 2014 व 2019 इबोला विषाणूच्या प्रसारासाठी

🔰 2020 कोरोनो विषाणू साठी

Coronavirus: राजस्थान 'लॉकडाऊन', मुख्यमंत्री गेहलोत यांचे आदेश

🔰 करोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये ३१ मार्चपर्यंत संपूर्ण 'लॉकडाऊन' पाळण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले आहेत. संपूर्ण लॉकडाऊन घोषित करणारं पहिलं राज्य राजस्थान हे पहिलं राज्य ठरलंय.

🔰 या लॉकडाऊन दरम्यान, भाज्या, दूध यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींसोबत मेडिकल स्टोअर सुरू राहणार आहेत. याशिवाय कोणतेही दुकान सुरू राहणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलंय. यापूर्वी काही राज्यांनी काही शहरांत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. परंतु, राजस्थानमध्ये संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू राहणार आहे.

भारताचा : क्षेत्रानुसार नदी खोऱ्यांचा

नदीखोरे    भारतातील क्षेत्रफळ चौकिमी.
--------------------------------------------------------
गंगा नदी खोरे  ★  ८,६१,४५२ (२६.२%)

गोदावरी खोरे  ★  ३,१२,८१२ (९.५१% )

कृष्णा खोरे    ★    २,५८,९४८ (७.८७%)

महानदी खोरे  ★  १,४१,६०० (४.३%)

नर्मदा खोरे    ★   ९८,७९५ (३.००५%)

कवेरी खोरे    ★ ८७,९०० (२.६७%)

--------------------------------------------------------

MSME मंत्रालय ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ राबवित आहे

🔰पारंपारिक कारागीर आणि बेरोजगार तरुणांना मदत करण्यासाठी अकृषक क्षेत्रात सूक्ष्म उद्योगांची स्थापना करुन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी

🚦सूक्ष्म,
🚦लघू व
🚦मध्यम उद्योग मंत्रालय (MSME)

🔰 ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (PMEGP) राबवित आहे.

🔰पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) याची 15 ऑगस्ट 2008 रोजी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घोषणा केली होती.

🔰ही भारत सरकारची पत योजना आहे.

🔰राष्‍ट्रीय पातळीवर खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) तर

🔰राज्‍य/जिल्हा पातळीवर KVIC चे राज्य कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ (KVIB) आणि

🔰जिल्हा उद्योग केंद्र (DIC) या योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या मध्यवर्ती संस्था आहेत.

ISRO पुढच्या वर्षी 10 पृथ्वी निरीक्षक उपग्रहांसह 36 अंतराळ मोहिमा पूर्ण करणार

🔰 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 36 अंतराळ मोहिमांचे नियोजन केले आहे.

🔰 36 अंतराळ मोहिमांमध्ये 10 पृथ्वी निरीक्षक (Earth Observation) उपग्रह, 10 PSLV मोहिमा, 3 दळणवळण उपग्रह, 3 अंतराळ विज्ञान उपग्रह, 2 सुचालन (Navigation) उपग्रह, 1 तंत्रज्ञान प्रदर्शन मोहीम, 1 GSLV MK-III, 3 GSLV MK-II, 2 SSLV मोहिमा, 1 गगनयान (मानवरहित) मोहीम यांचा समावेश आहे.

🔴भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

🔰 ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे.

🔰 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली.

🔰 ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 

🔴संस्थेनी केलेली कार्ये -

🔰 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.

🔰1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.

🔰 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली.

🔰 ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला .

🔰 पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

🔰फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.

🔰 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) विकसित केले.

🔰सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.

🔰 यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.

🔴प्रक्षेपक

🔰 ISRO ने भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम 1970 साली सुरू केले.

🔰ह्या कामाचे नेतृत्व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे दिले गेले होते. अग्निबाणात सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात.

🔰 प्रथम प्रक्षेपण वर्ष 1979 मध्ये झाले.

🔰 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) - ISRO चा शाश्वत प्रक्षेपक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘धृवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV)’ याचा जागतिक अंतराळ स्पर्धेत भारताला आघाडी मिळवून देण्यास मोलाचा वाटा आहे.

🔰 PSLV हे ISRO चे अष्टपैलू प्रक्षेपण वाहक अग्निबाण आहे. PSLV कडून केल्या गेलेल्या प्रथम यशस्वी 36 प्रक्षेपणांनंतर, PSLV हे ISRO चे ‘वर्कहोर्स लाँच व्हेईकल’ म्हणून उदयास आले आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी खुले करण्यात आले.

🔰 PSLV हे जगातल्या सर्वात विश्वसनीय प्रक्षेपकांपैकी एक आहे. PSLV-C37 ही PSLV-XL ची एक सुधारित संरचना आहे.

🔴PSLV ची वैशिष्ठ्ये - 

🔰 उंची 44 मीटर

🔰 व्यास 2.8 मीटर

🔰 स्टेज ची संख्या 4

🔰 वाहून नेण्याची क्षमता

 320 टन (XL)

🔰प्रकार

 3 (PSLV-G, PSLV - CA, PSLV - XL)

🔰प्रथम उड्डाण

 20 सप्टेंबर 1993

🔰 भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) - GSLV हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत उपग्रहाच्या INSAT वर्गातल्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. 

🔰GSLV हे उपग्रहाच्या GSATमालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे. GSLV  मध्ये तीन टप्पे आहेत - घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज.

🔰 या वाहनाची 49.13 मीटर उंची आहे. GSLV चे प्रथम उड्डाण 18 एप्रिल 2001 रोजी केले गेले होते.

🔰2017 साली तयार करण्यात आलेले ‘जियोसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल मार्क-III’ (GSLV Mk-III) हे भारताने आतापर्यंत बनविलेले सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. याला ‘फॅट बॉय’ असे टोपणनाव दिले गेले. त्याचे वजन जवळपास 640 टन आहे.

🔰हा अग्निबाण पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या परिभ्रमन कक्षेत 8 टन वजनापर्यंतचे अंतराळ केंद्र पोहोचवण्यास सक्षम आहे.

भारतात राष्ट्रीय उद्याने नसलेले राज्य व केंद्रशासित प्रदेश

◾️ चंदीगड,
◾️ दादरा नगर हवेली,
◾️दमन व दीव ,
◾️लक्षद्वीप,
◾️पद्दुचेरी,
◾️ दिल्ली
याठिकाणी एकही राष्ट्रीय उद्यान नाही✍

🔰भारतामध्ये एकूण 104 राष्ट्रीय उद्याने आहेत

🔰 राष्ट्रीय उद्याने भारतातील 40500 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापली आहे

🔰देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या  1.23 टक्के  

🔰 भारतात सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने ⛰⛰🏝

◾️ मध्य प्रदेश( 10 )
◾️अंदमान निकोबार (9) ,
◾️केरळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल प्रत्येकी 6,
◾️आसाम कर्नाटक हिमाचल प्रदेश तामिळनाडू तेलंगणा प्रत्येकी 5

🔰 भारत सरकारने 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू केला सध्या भारतात 50 व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️ त्यापैकी महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️प्रत्येक चार वर्षांनी वाघांची 🐅🐅
जनगणना होते 2018 च्या व्याघ्र जनगणनेनुसार भारतात 2967 वाघ आहेत  त्यापैकी महाराष्ट्रात 312 वाघ आहेत

_____________________________

अरुणाचल प्रदेशात “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” याची स्थापना

- बौद्ध तत्वज्ञान, संस्कृती आणि कला यांचे शिक्षण आणि बौद्ध धर्माच्या विविध पैलूंवर संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अरुणाचल प्रदेशाच्या दाहुंग या शहरात भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” (Central Institute of Himalayan Culture Studies -CIHCS) याची स्थापना केली.

- आधुनिक विद्यापीठाच्या प्रणालीद्वारे तिबेटी, चिनी, पाली, संस्कृत, जापानी आणि इतर आशियाई भाषांमध्ये जतन केलेल्या प्राचीन बौद्ध हस्तलिपी आणि ग्रंथांचे जतन करणे आणि ते डिजिटल करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू आहे.

- संस्थेच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून वित्तपूरवठा केला जाणार आहे. तसेच संस्कृती मंत्रालयाच्या योजनांच्या माध्यमातून संशोधनासाठी निधी पुरवला जाणार आहे.

- वर्तमानात, तिबेट हाऊस, नवी दिल्ली; लायब्ररी ऑफ तिबेटियन वर्क्स अ‍ॅन्ड आर्चीव्ह, धर्मशाला; नामग्याल तिबेटोलॉजी संस्था, सिक्कीम; बौद्ध सांस्कृतिक शिक्षण केंद्र, तवांग मठ, अरुणाचल प्रदेश; आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ; आणि GRL मोनास्टिक स्कूल, बोमडिला, अरुणाचल प्रदेश या सहा संस्थांना बौद्ध संस्कृती आणि कलेच्या संवर्धनासाठी संस्कृती मंत्रालय वार्षिक अनुदान देखील देत आहे.

आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रांचा राष्ट्रीय आयुष अभियानामध्ये समावेश करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

◾️केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत योजनेचा एक घटक असलेल्या आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रांचा राष्ट्रीय आयुष आयभियानामध्ये समावेश करण्यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

◾️आर्थिक वर्ष 2019-20 ते 2023-24 या कालावधीसाठी आयुष केंद्रांच्या कारभारासाठी  3399.35 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे, ज्यात 2209.58 कोटी रुपये केंद्र सरकारचा वाटा आणि 1189.77 कोटी रुपये राज्य सरकारचा वाटा असणार.

◾️अभियानाच्या अंतर्गत आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी खालील उद्दिष्टे साध्य करावी लागणार -

◾️विद्यमान सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीसह एकत्रीकरणातून प्रतिबंधात्मक प्रोत्साहन, रोगनिवारक, पुनर्वसन आणि उपशामक आरोग्य सेवा यावर लक्ष केंद्रित करून आयुष तत्वे आणि पद्धतींवर आधारित समग्र निरोगीकरण आदर्श स्थापित करणे.

◾️गरजू लोकांना आयुष सेवा उपलब्ध करून माहितीही उपलब्ध करून देणे.

◾️आयुष सेवांमध्ये जीवनशैली, मृत्यू, योग, औषधी वनस्पती आणि आयुष प्रणालीच्या सामर्थ्यानुसार निवडलेल्या परिस्थितीसाठी औषधांची तरतूद याविषयी जनजागृती समाविष्ट आहे.

🔰पार्श्वभूमी

◾️आयुष (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी / AYUSH) मंत्रालय आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत उप-आरोग्य केंद्रांपैकी 10 टक्के म्हणजेच 12,500 केंद्रे आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रे म्हणून चालविणार असा निर्णय घेण्यात आला असून, ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये एकात्मिक आरोग्य सेवांच्या बहुलवादी प्रणालीत आयुष प्रणालीच्या संभावित शक्यतांना मुख्य प्रवाहात नेण्याचे समर्थन केले आहे.

◾️भारत सरकारने फेब्रुवारी 2018 या महिन्यात निर्णय घेतला आहे की सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी विद्यमान उप-आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर करून दीड लक्ष आरोग्य व निरोगीकरण कल्याण केंद्रांची स्थापना केली जाणार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2020-21 या वर्षापासून RBIचे लेखा वर्ष आणि सरकारचे वित्त वर्ष एकच असणार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईयर) आणि भारत सरकारचे वित्त वर्ष (फायनॅनष्यल ईयर) 2020-21 या वर्षापासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे.

सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष 1 जुलै ते 30 जून असून, वित्त वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. या निर्णयानुसार, दोनही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही.

भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापना केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.

🔸RBIची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. RBIचे 1949 साली भारत सरकारद्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे.

🔸RBI वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण जाहीर करते.

🔸भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश - भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, भारताचा FDI प्रवाह (गंगाजळी) राखणे, भारताची आर्थिक स्थिती राखणे, भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

🌅 RBIने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.

🌅 सर ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर (1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937) होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर (तिसरे गव्हर्नर) दि. 11 ऑगस्ट 1943 रोजी या पदावर विराजमान झाले.

🔸वर्तमानात, शक्तीकांत दास गव्हर्नर आहेत. बी. पी. कानुंगो, एन. एस. विश्वनाथन, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा असे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.

ISRO पुढच्या वर्षी 10 पृथ्वी निरीक्षक उपग्रहांसह 36 अंतराळ मोहिमा पूर्ण करणार


- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 36 अंतराळ मोहिमांचे नियोजन केले आहे.

- 36 अंतराळ मोहिमांमध्ये 10 पृथ्वी निरीक्षक (Earth Observation) उपग्रह, 10 PSLV मोहिमा, 3 दळणवळण उपग्रह, 3 अंतराळ विज्ञान उपग्रह, 2 सुचालन (Navigation) उपग्रह, 1 तंत्रज्ञान प्रदर्शन मोहीम, 1 GSLV MK-III, 3 GSLV MK-II, 2 SSLV मोहिमा, 1 गगनयान (मानवरहित) मोहीम यांचा समावेश आहे.

▪️भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

- ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे.

-  15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली.

-  ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 

▪️संस्थेनी केलेली कार्ये -

- 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.

- 1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.

- 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली.

- ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला .

-  पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

- फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.

- ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) विकसित केले.

- सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.

- यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.

▪️ प्रक्षेपक

- ISRO ने भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम 1970 साली सुरू केले.

- ह्या कामाचे नेतृत्व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडे दिले गेले होते. अग्निबाणात सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात.

- प्रथम प्रक्षेपण वर्ष 1979 मध्ये झाले.

- ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) - ISRO चा शाश्वत प्रक्षेपक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘धृवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV)’ याचा जागतिक अंतराळ स्पर्धेत भारताला आघाडी मिळवून देण्यास मोलाचा वाटा आहे.

- PSLV हे ISRO चे अष्टपैलू प्रक्षेपण वाहक अग्निबाण आहे. PSLV कडून केल्या गेलेल्या प्रथम यशस्वी 36 प्रक्षेपणांनंतर, PSLV हे ISRO चे ‘वर्कहोर्स लाँच व्हेईकल’ म्हणून उदयास आले आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी खुले करण्यात आले.

-  PSLV हे जगातल्या सर्वात विश्वसनीय प्रक्षेपकांपैकी एक आहे. PSLV-C37 ही PSLV-XL ची एक सुधारित संरचना आहे.

▪️PSLV ची वैशिष्ठ्ये - 

उंची

 - 44 मीटर

- व्यास

 2.8 मीटर

- स्टेज ची संख्या

 4

- वाहून नेण्याची क्षमता

 320 टन (XL)

▪️प्रकार

 3 (PSLV-G, PSLV - CA, PSLV - XL)

▪️प्रथम उड्डाण

 20 सप्टेंबर 1993

- भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) - GSLV हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत उपग्रहाच्या INSAT वर्गातल्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. 

-GSLV हे उपग्रहाच्या GSATमालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे. GSLV  मध्ये तीन टप्पे आहेत - घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज.

- या वाहनाची 49.13 मीटर उंची आहे. GSLV चे प्रथम उड्डाण 18 एप्रिल 2001 रोजी केले गेले होते.

- 2017 साली तयार करण्यात आलेले ‘जियोसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल मार्क-III’ (GSLV Mk-III) हे भारताने आतापर्यंत बनविलेले सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. याला ‘फॅट बॉय’ असे टोपणनाव दिले गेले. त्याचे वजन जवळपास 640 टन आहे.

- हा अग्निबाण पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या परिभ्रमन कक्षेत 8 टन वजनापर्यंतचे अंतराळ केंद्र पोहोचवण्यास सक्षम आहे.

गुजरातच्या कंपनीला करोना व्हायरसचे टेस्ट किट बनविण्याचा परवाना

अहमदाबाद येथील कोसारा डायग्नोस्टिक या कंपनीला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून करोनाव्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळाला आहे. भारतात करोना व्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळवणारी ही पहिलीच कंपनी आहे. या किटवद्वारे अडीच तासामध्ये करोना व्हायरस संबधित चाचणी होवू शकते असा दावा या कंपनीने केला आहे. कोसारा डायग्नोस्टिक्स ही कंपनी अमेरिकेच्या को-डायग्नोस्टिक्स इंक आणि भारतीय अंबालाल साराभाई एंटरप्रायजेस या अन्य कंपन्यासोबत काम करते.

कोसारा डायग्नोस्टिक्सने परवाना मिळवण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे एका महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मंगळवारी त्यांना याचा परवाना मिळाला. अहमदाबाद मिररने या संदर्भात वृत्त दिले आहे.

कोविड १९ वर कोणतीही लस आतापर्यंत उपलब्ध नसल्याने त्याचे निदान करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या किटची मागणी पूर्ण करण्याची क्षमता आमच्य़ाकडे आहे अशी माहिती को. डायग्नोस्टिक्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड्वेइट इगन यांनी दिली आहे.

भारतात १९५ जणांना आत्तापर्यंत या विषाणूची लागण झाल्याचे आढळले असून एकूण पाच जणांनी प्राण गमावला आहे. तसेच राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी येत्या रविवारी २२ मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

General Knowledge

▪ ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
उत्तर : पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स

▪ शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर : K2-18b

▪ कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर : 3 मार्च

▪ ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर : झारखंड

▪ कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अजय भूषण पांडे

▪ राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर : 15

▪ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर : सुखना तलाव

▪ 1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : साहित्य

▪ कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय प्रथिने दिन’ पाळण्यात आला?
उत्तर : 27 फेब्रुवारी

▪ ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 4 था