Ads

19 August 2019

पंतप्रधान मोदींच्या हस्ते  भुटानमध्ये मांगदेछू जलविद्युत  प्रकल्पाचे उद्घाटन


👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

👉4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे.

👉 प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे.

👉2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.

👉मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा भुटान-भारत मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.

👉हा भुटानमधल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे.

👉हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तपुरवठा करण्यात येत आहे.

👉बांधकाम खर्चाच्या 70 टक्के कर्जस्वरुपात तर 30 टक्के अनुदान अश्या स्वरुपात भारताकडून वित्तपुरवठा केला जात आहे.

✍️भुटान

👉हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देश आहे.

👉थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे. भारतीय रुपया, भुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात.

👉झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे.

राज्यात नवीन 17 गरम पाण्याचे झरे आढळले

▪️राज्यातील रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये नवीन 17 गरम पाण्याचे झरे आढळले आहेत. आणखी काही ठिकाणीदेखील अशाप्रकारे गरम पाण्याचे झरे असण्याची शक्‍यता अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे.

▪️ मात्र, औषधी गुणधर्म असलेल्या आणि पर्यटनासाठी उपयुक्त असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांबाबत अनभिज्ञतेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या योग्य संवर्धनाची गरज शास्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

▪️अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तग धरणाऱ्या वनस्पतींबाबत पुण्यातील भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या अभ्यासकांकडून संशोधन केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा अभ्यास सुरू असून या अभ्यासांतर्गत या गरम पाण्याच्या झऱ्यांचा शोध लागला आहे.

▪️भूगर्भातील खालच्या थरात असलेल्या लाव्हामधून बाहेर पडणारी उष्णता ज्यावेळी भूगर्भातील पाण्याला मिळते, त्यावेळी पाण्याचे तापमान वाढते. लाव्हामुळे मिळणाऱ्या उषणतेमुळे तापलेले हे पाण्याचे स्रोत म्हणजेच गरम पाण्याचा झरा (हॉट वॉटर स्प्रिंग)असतो. काही ठिकाणी या झऱ्याचे तापमान सामान्य असते. अशावेळी या झऱ्यामध्ये नागरिक अंघोळदेखील करू शकतात. मात्र, काही ठिकाणी हे तापमान अतिशय घातक असते.

या पाण्यात असणाऱ्या विशिष्ट सूक्ष्मजीवांमुळे त्वचेचे रोग नष्ट होण्यास मदत होते.

राज्य पुनर्रचना आयोग 1953

- अध्यक्ष: फजल अली
- सदस्य: के.एम.पण्णीकर, ह्रद्यनाथ कुंझरू
- आयोगाने आपला अहवाल सप्टेंबर 1955 मध्ये सादर केला.

- या आयोगाने 14 राज्ये [आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, बाॅम्बे, जम्मू आणि काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, मद्रास, म्हैसूर, ओरिसा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल] निर्माण करण्यात आली.

- याच आयोगाने सहा केंद्रशासित प्रदेशांची [अंदमान व निकोबार बेटे, लॅकॅडिव्ह मिनिकाॅय व अमिनदिवी बेटे, दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा, मणीपूर] निर्मिती केली.

- 1956 नंतर भाषिक राज्यांच्या मागण्यांनी जोर धरला त्यामुळे 1960 मध्ये बाॅम्बे प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात (15 वे) या राज्यांची निर्मिती करण्यात आली.

भारत- भूतान आर्थिक, सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेणार- मोदी

✍पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भूतानच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले असून त्यांनी त्यांचे समपदस्थ लोटे शेरिंग यांच्याशी शनिवारी चर्चा केली. वेगवेगळ्या क्षेत्रांत द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली असून यासंबंधात १० सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

✍दोन्ही देशांच्या संबंधात दृढता आणि विश्वास आणण्याचा यात प्रयत्न असून मोदी यांनी शेरिंग यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली, अशी माहिती परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटर संदेशात दिली. त्यांनी म्हटले आहे, की भूतानमधील जुने धार्मिक केंद्र असलेल्या सिमटोका डोझाँग बरोबर समझोता करार होणार आहे. रुपे कार्डही सुरू करण्यात आले आहे.

✍मोदी यांची ही भूतानला दुसरी भेट असली तरी त्यांच्या दुसऱ्या पर्वातील पहिलीच भेट आहे. पंतप्रधान मोदी यांना भूतानच्या ताशीछोडझोंग राजवाडय़ात सलामी देऊन जंगी स्वागत करण्यात आले. पारो विमानतळावरही त्यांचे शाही स्वागत झाले.

✍दोन्ही देशांदरम्यान व्यापक चर्चा झाली असून आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेण्यास मोठी संधी असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते भूतानी विद्यार्थ्यांशी प्रतिष्ठित रॉयल विद्यापीठात संवाद साधणार आहेत.

बीपिन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ ?


📌लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

📌तीन महिन्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये ही समिती सरकारला आपला अहवाल सोपवेल. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत देशाचे २६ वे लष्करप्रमुख आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होतील. तेच देशाचे पहिले सीडीएस असू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. सीडीएस तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना वरिष्ठ असतील कि तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांच्या समान त्यांचा दर्जा असेल ते अजून स्पष्ट झालेले नाही. सीडीएसचा कार्यकाळ किती असेल ते सुद्धा अजून स्पष्ट नाही असे हिंदुस्थान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

📌संरक्षण तज्ञांनी आतापर्यंत अनेकवेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९ साली पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करेल. तिन्ही सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

💐धावपटू हिमा दास, मोहम्मद अनसला सुवर्ण पदक


🔹या दोघांनी चेक गणराज्यमधील अॅथलेटिक मिटिनेक रीटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.
पुरूष गटातील ३०० मीटर स्पर्धेत मोहम्मद अनस तर
महिलांच्या ३०० मीटर स्पर्धेत हिमा दासनं
सुवर्णपदकांची कमाई केली.

युरोपीय स्पर्धेतील हिमा दासचे हे सहावे सुवर्ण पदक आहे.

अनसने पुरूषांची ३०० मीटर स्पर्धा केवळ ३२.४१ सेकंदात पूर्ण करीत सुवर्ण पदक पटकावले.

राष्ट्रीय विक्रम नावावर असलेला मोहम्मद अनस सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोहात होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशीपच्या ४०० मीटर स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरला आहे. तर
हिमा दास अद्याप पात्र ठरली नाही.

अनस आणि हिमा दास यांच्याशिवाय भारताच्या निर्मल टॉमला ३०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळाले आहे.

दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद अनसची निवड करण्यात आली आहे.

रवींद्र जाडेजासह 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार....


👇👇👇

💕निवड समितीकडून पुरस्कार प्राप्त खेळाडूंची नावे जाहीर

💕विविध खेळांमधील सर्वोच्च कामगिरी केलेल्या खेळाडूंना तसेच प्रशिक्षकांना विविध अ‍ॅवॉर्ड देऊन गौरविण्यात येते. निवड समितीने विविध क्रीडा पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली.

🍀💕*पुरस्कार विजेत्यांची नावे*💕🍀

🚦 *राजीव गांधी खेल रत्न* - बजरंग पुनिया ( कुस्ती) व दीपा मलिक ( पॅरा अ‍ॅथलिट)

🚦 *द्रोणाचार्य पुरस्कार* - विमल कुमार ( बॅडमिंटन), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन ( अ‍ॅथलिट)

🚦 *जीवनगौरव पुरस्कार* - मेर्झबान पटेल ( हॉकी), रंबीर सिंग खोक्कर ( कबड्डी), संजय भरद्वाज ( क्रिकेट)

🚦*अर्जुन पुरस्कार* - तजिंदरपाल सिंग तूर ( अ‍ॅथलिट), मोहम्मद अनास याहीया ( अ‍ॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), रवींद्र जडेजा ( क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान ( हॉकी), अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), पूनम यादव ( क्रिकेट), स्वप्ना बर्मन ( अ‍ॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अ‍ॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल ( पोलो)

🚦*ध्यानचंद पुरस्कार* - मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी)

🌺🌺१०० गावांमध्ये ‘समूह गृहनिर्माण’ योजना.🌺🌺

🔰मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यभरात मोठय़ा प्रमाणात घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून डिसेंबर २०१९ पर्यंत पाच लाख घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार असून १०० गावांमध्ये समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून ‘स्मार्ट व्हिलेज’ साकारण्यात येणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी दिली.

🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वासाठी घरे-२०२२’ या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री आवास योजना-सर्वासाठी घरे (शहरी)’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यातून महाराष्ट्रासाठी १९.४० लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेला गती देण्याच्या उद्देशाने राज्यात डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.

🔰या महामंडळाला  पाच लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महामंडळाने नुकतेच पुणे येथे १० हजार घरांच्या आणि भुसावळ (जि. जळगाव) येथे पाच हजार घरांच्या प्रकल्पाला मान्यता दिली असून सोलापूर येथे ११ हजार घरांच्या प्रकल्पाला या महिन्यात मान्यता देण्यात येईल, असे मिरगणे यांनी सांगितले.

🌺🌺केरळच्या श्रीशंकरची आठ मीटर लांब उडी; जिंकले सुवर्णपदक🌺🌺

🔰के. एस. बिजीमोल आणि मुरली या आंतरराष्ट्रीय ऍथलिट्‌सचा मुलगा असलेल्या एम. श्रीशंकरने आपल्या कारकिर्दीत लांब उडीत तिसऱ्यांदा आठ मीटर उडी मारण्याची किमया केली. पुढील वर्षीपर्यंत 8.50 मीटरपर्यंत उडी मारण्याची आशा बाळगून असलेल्या 20 वर्षीय श्रीशंकरने पतियाळा येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री ऍथलेटिक्‍स स्पर्धेत आठ मीटर उडी मारताना सुवर्णपदक जिंकले.

🔰सहा महिन्यांपूर्वी संगरूर येथे झालेली इंडियन ग्रांप्री ही त्याची यापूर्वीची भारतातील शेवटची स्पर्धा होती. त्यानंतर तो युरोपीमधील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला होता. त्यात बिश्‍केक येथील स्पर्धेत त्याने 7.97 मीटरपर्यंत मजल मारली होती. गेल्या वर्षी भुवनेश्‍वर येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत अंकित शर्माचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढताना श्रीशंकरने प्रथम 8.11 व नंतर 8.20 मीटर अशी कामगिरी केली होती. यात कर्नाटकच्या सिद्धार्थ नाईकने रौप्य आणि हरियानाच्या साहिल महाबलीने ब्रॉंझपदक जिंकले.

🌺🌺मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर🌺🌺


🔰 राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ संत साहित्याचे अभ्यासक श्री.म.रा.जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. रुपये ५ लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.

🔰मधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक असून या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याच्या ज्ञानकोषाचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी आणि एम.फिलचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

🔰मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उज्जैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. श्री जोशी संत साहित्य विषयाचे पीएचडी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे २०० हून अधिक लेख ‘एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम’ कडून प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘सार्थ तुकाराम गाथे’ची ४०० हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत.

🔰नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील ३५०० मराठी हस्तलिखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.

🔰संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी श्री. रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यू. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते आणि डॉ.किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

🔰सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधील डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड या सदस्यांनी श्री मधुकर जोशी यांची निवड केली.

🔷भारतीय सायकलपटूंनीही जिंकले सुवर्णपदक, विश्व अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक यश

◼️फ्रँकफर्ट(जर्मनी): क्रिकेट, बॕडमिंटन, टेनिस, हॉकी व टेबल टेनिसपाठोपाठ भारतीय खेळाडू अलीकडे वेगवेगळ्या खेळांमध्ये यश मिळवू लागले आहेत. स्क्वॕश, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलपाठोपाठ आता सायकलिंगमध्ये भारतीय सायकलिंगपटूंनी आपली मोहोर उमटवली आहे. ज्युनियर गटाच्या ट्रॕक सायकलिंग विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक तर एस्बो अल्बेन याने कास्यपदक जिंकले आहे.

◼️सायकलिंगच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सिनियर असो वा ज्युनियर, कोणत्याही गटात मिळालेले हे पहिलेच सुवर्ण पदक आहे. एस्बो अल्बेन, एल. रोनाल्डो सिंग, वाय रोहित सिंगा आणि जेम्स सिंग यांच्या संघाने ही ऐतिहासिक कामगिरी बजावली.

◼️एस्बो अल्बेन याने अपेक्षेनुरूप कामगिरी करताना पुरुषांच्या किरीन प्रकाराचे कांस्यपदक जिंकले.

◼️पुरुषांच्या सांघिक स्प्रिंटमध्ये पहिल्या फेरीत भारतीय संघाने 44.764 सेकंदाची सर्वात जलद वेळ नोंदवली. त्यांनी चीनपेक्षाही (46.248 सेकंद) सरस वेळ नोंदवली.

◼️अंतिम फेरीत भारतीय चमूची स्पर्धा अॉस्ट्रेलियाशी होती. अॉस्ट्रेलियन त्रिकुट पहिल्या दोन लॕपनंतर आघाडीवर होते परंतु भारतीय चमूने आपल्या दुसऱ्या आणि अंतिम लॕपमध्ये 12.915 सेकंदाची वेळ नोंदवत केवळ 0.056 सेकंदाच्या फरकाने सुवर्ण पदक जिंकले. भारताची विजयी वेळ 44.625 सेकंदाची राहिली.

◼️पुरुषांच्या किरीन स्पर्धेत एस्को तिसऱ्या स्थानी आला. या गटात ग्रीसच्या काँन्स्टॕन्टिनोस लिव्हानोसने सुवर्ण तर अॉस्ट्रेलियाच्या सॕम गॕलाघेर याने रौप्यपदक जिंकले.

◼️सद्यस्थितीत स्प्रिंट व किरिन या सायकलिंगच्या प्रकारांमध्ये एस्को ज्युनियर गटातील टॉपचा सायकलपटू आहे. अंदमान व निकोबारचा हा सायकलपटू गेल्या वर्षी ज्युनियर ट्रॕक सायकलिंगच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय सायकलपटू ठरला होता. त्यावेळी त्याने किरिन प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.

रवी शास्त्री: नोव्हेंबर 2021 पर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

✍17 ऑगस्ट रोजी कपिल देव (अध्यक्ष), अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड केली. आता रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषक 2021 पर्यंत असणार आहे.

👉रवी शास्त्री यांची तिसऱ्यांदा प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. आता रवी शास्त्रींसमोर चार प्रमुख आव्हाने आहेत आणि ते आहेत – 2020 साली टी-20 विश्वचषक; 2021 साली टी-20 विश्वचषक, 2021 विश्व कसोटी अजिंक्यपद आणि 2021 विश्व एकदिवसीय अजिंक्यपद.

रवी शास्त्री यांची जुलै 2017 मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली होती. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 21 कसोटी सामने खेळले. त्यातल्या 13 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 36 सामन्यांपैकी 25 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यासोबतच एकदिवसीय सामन्यात 60 पैकी 43 सामन्यांमध्ये विजय मिळवला.

राज्य सरकारकडून 'जलसंजाल' योजनेची घोषणा

✍मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारकडून 16 हजार कोटींच्या 'जलसंजाल' योजनेची घोषणा

✍ या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील प्रमुख 11 धरणं एकमेकांना जोडली जाणार आहेत

✍ प्रमुख धरणं जोडण्यासाठी हजारो किलोमीटरची बंद पाईपलाईन टाकण्यात येणार

✍यात जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपिंग स्टेशन सुविधांचाही समावेश असणार

✍ जलसंजाल योजनेची पहिली निवादा आठवड्याभरात निघणार

✍पहिल्या टप्प्यात 4,527 कोटींच्या कामाचा समावेश.

✍ इस्रायलची मेकोरोट ही राष्ट्रीय पाणीपुरवठा कंपनी या योजनेत सल्लागार म्हणून काम पाहणार

✍2050 पर्यंतच्या पाण्याची गरज पाहून आराखडा तयार करण्याचे काम सुरू

​​🚂 'मुंबई सेंट्रल' ठरले सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक 🚂

🚇 अस्वच्छ फलाट, सदोष तिकीट मशिनमुळे झालेली गर्दी, स्वच्छतागृहांत दुर्गंधी... अशी ओळख असलेल्या मुंबई रेल्वेवरील स्टेशनांमध्ये मुंबई सेंट्रलने आदर्श स्थानक म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे.

🚇आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणपूरकतेच्या तब्बल १२ कसोट्यांवर पात्र ठरल्याने स्थानकाची दखल आतंरराष्ट्रीय संस्थेने घेत स्थानकाला iso 14001 : 2015 या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.

🚇विशेष म्हणजे, आयएसओ प्रमाणित मुंबई सेंट्रल स्टेशनाचा पॅटर्न अन्य ३८ रेल्वे स्टेशनांवर राबवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.

🚇रेल्वेच्या निकषांनुसार रेल्वे स्टेशनातील एकूण जागेपैकी ३० टक्के जागेवर उद्यान उभारणे आवश्यक आहे. मुंबई सेंट्रलमध्ये जागेची अडचणी असल्याने टप्प्या टप्प्यांमध्ये छोटेखानी उद्यानांची निर्मिती करण्यात आली.

🚇स्टेशन आणि फलाटाची स्वच्छता, कचरा आणि मलजलाच्या विल्हेवाटीसाठी बायोगॅस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. विजेच्या बचतीसाठी सूर्यप्रकाश परावर्तित करणारे दिवे छतावर बसविण्यात आले.

🚇या दिव्यांचे आयुर्मान २० वर्षांपेक्षा अधिक असल्याने वीज संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. या पर्यावरणीय प्रकल्पांमुळे आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेत मुंबई सेंट्रल स्टेशनाला गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

🚇 मे-२०१९ ते मे-२०२२ पर्यंत पर्यावरण प्रकारातील आयएसओ प्रमाणपत्रधारक स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मुंबई रेल्वेवरील हे एकमेव स्टेशन आहे.

🚇एटीव्हीएम, तिकीट खिडकी यांसह दिव्यांगासाठी रॅम्प, कार्यरत असणाऱ्या लिफ्ट यांमुळे प्रवाशांना स्थानकात आल्यानंतर दिलासा मिळतो. मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व मेल-एक्स्प्रेसमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे.

🚇आंतरराष्ट्रीय आयएसओ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वे मुख्यालय आणि मुंबई विभागाने विशेष प्रयत्न केले होते. पर्यावरण आणि प्रवासी सुविधा दर्जेदार असल्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ प्रमाणपत्र मिळाले.

🚇 येणाऱ्या काळात या सुविधा टिकवणे अधिक गरजेचे आहे. मुंबई रेल्वेवरील अनेक रेल्वे स्टेशनांत पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट या सुविधा आहेत.

🚇मात्र देखभालीअभावी त्या सुविधाच गैरसोयीचे मुख्य कारण ठरत आहेत.

  🚆आयएसओ म्हणजे काय 🚆

🚇 देशातील एखाद्या गुणवत्तेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डडायझेशन' मानांकन घेतले जाते.

🚇आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता १२० देशांनी एकत्र येऊन एक प्रमाण निश्चित केलेले आहे. 

     🚀आयएसओचे प्रकार🚀

🚇 आयएसओ ९००१ - गुणवत्ता व्यवस्थापन
🚇आयएसओ १४००१ - पर्यावरण व्यवस्थापन
🚇 आयएसओ २७००१ - माहिती सुरक्षा व्यवस्थापन
🚇आयएसओ २२००८ - अन्न सुरक्षा व्यवस्थापन

🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃