06 April 2022

Important words of Antonyms : 50 Words

1. Inevitable- Avoidable
2. Exceptional- Common
3. Permanent- Temporary
4. Dim- Luminous
5. Reckless- Careful6. Explicit- Ambiguous
7. Incredible- Believable
8. Repel- Attract
9. Rapidly- Slowly
10. Meticulous- Careless
11. Barbarous- Civilized
12. Successor- Predecessor
13. Urban- Rural
14. Conclusive- Indecisive
15. Terminate-Begin
16. Niggardly- Lavishly
17. Advanced- Receded
18. Enlightened- Ignorant
19. Moderate- Extreme
20. Superficial- Thorough
21. Scorn- Admiration
22. Trivial- Serious
23. Loquacious- Reserved
24. Confiscate- Release
25. Often- Rarely
26. Eminent- Notorious
27. Embark upon- Conclude
28. Diffidence- Boldness
29. Paucity- Plenty
30. Triggered- Choked
31. Fastidious- Adjustable
32. Grandiose- Simple
33. Bleak- Bright
34. Insolent- Humble
35. Lurid- Mild
36. Unscrupulous- Conscientious
37. Melodious- Tuneless
38. Contaminate- Purify
39. Frugal- Extravagant
40. Falling off- Improvement
41. Genial- Unkind
42. Shallow- Deep
43. Immune- Vulnerable
44. Veneration- Disrespect
45. Yield to- Resist
46. Concur- Disagree
47. Vague- Precise
48. Humility- Pride
49. Extol- Censure
50. Takes off- Lands



Meanings💯

Magnate- मोठी व्यक्ती
Innate- जन्मजात
Proscribe- त्याग करणे
Ephemeral- क्षणभंगुर, तात्पुरते
Tacit-  शब्दात व्यक्त न केलेला,अल्पभाषी
Strife- भांडण, संघर्ष
Temerity- अविवेक,आडदांड सहशीपणा
Felicity- परमानंद,लेखनातील किंवा भाषणातील मोहकपणा
Elicit- काढून घेणे,बाहेर काढणे
Elusive- धुर्त, युक्तीने निसटणारा
Eminent-ख्यातनाम ,उच्च दर्जाचा
Lucid-  स्पष्ट ,सुबोध,चमकदार
Injunction- न्यायालयाचा हुकूम
Luminous- चमकदार, प्रकाशीत
Malleable- वितळून नरम होणारा
Iconoclast- परम्परा तोडणारा,व त्यावर हल्ला करणारा
Ideology- विचारधारा, विचारसरणी
Idiosyncrasy- विशेष लक्षण वयक्तीक लकब वागण्याची विशेष शैली
Idyllic- ग्रामीण ,सुंदर सोप्या वर्णनासंबधीचा
Ignominy- बदनामी ,नामुष्की, नाचक्की
Imminent- संकट ,मृत्यू इ. घडून येण्याची नाजीकची शक्यता
Decimate- समाप्त करणे
Opulent- कीमती,महत्वाचे
Decorous- योग्य सभ्य, शालीन
Deference- आदर, मान
Ponderous- कष्टदायक
Portent- इशारा, सूचना
Precept- धर्मादेश
Espouse- लग्न करणे
Infinitesimal- अति सूक्ष्म
Frugal- मितव्ययी, काटकसरी
Forgo- त्यागणे
Arable- कृषियोग्य
Maudlin- अतिभावुक
Erudite- ज्ञानी ,बुद्धिमान
Sacrosanct- अत्यंत पवित्र
Renounce- सोडणे, त्यागणे
Flagrant- सुस्पष्ट,ठळक
Foible- अवगुण ,स्वभावातील व्यंग
Desultory- अनियमित, विस्कळीत
Dilettante- कला वाङमय याचा अभ्यास करणारा परंतु त्याचे तितकेसे ज्ञान नसणारा
Fetter- बंधन , बेड्या घालणे
Prosaic- निरस ,रूक्ष
Euphemism- अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात सांगणारा
Unconscionable- बेसुमार, गैरवाजवी
Turpitude- नीचपणा,दुष्टपणा
Trepidation- भीती,अस्वस्थता
Touchstone- कस, कसोटीचा दगड,एखाद्या गोष्टीचे गुणवत्ता मोजण्याचे साधन
Tirade- लांबलचक निंदात्मक भाषण
Urbane- सुसंस्कृत,सभ्य
Incessant- अविरत, अखंड
Imperial- शाही,साम्राटविषयचा
Chronic- दीर्घकालीन ,जुना ,तीव्र
Bucolic- ग्रामीण,गावंढळ, धनगराच्या जीवनविषयक
Usurp- बळकवणे (सत्ता वगैरे)
Utopia- काल्पनिक आदर्श राज्य किंवा समाज, सर्वसुखस्थान, नंदनवन
Venerate- आदर, किंवा पूज्य मानणे
Vacillate- द्विधा अवस्था होणे
Tantamount- समान,बरोबरीचा
Flout- अवहेलना
Covenant- करारनामा,
Loquacious- बोलघेवडा ,बडबड्या
Litigate- न्याय मागणे

थोर भारतीय विचारवंत

(१) राजा राममोहन राॅय :--
           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली.
मृत्यू २७ सप्टेंबर १८३३

(२) स्वामी विवेकानंद :--
            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे
भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण.

(३) रवींद्रनाथ टागोर :--
            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली
हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१.

(४) न्यायमूर्ती रानडे :--
           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१.

(५)लोकमान्य टिळक :--
             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.

(६) महात्मा गांधी :--
            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली
लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८.

(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--
              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे
पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार.

(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--
         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६.

(९) सुभाषचंद्र बोस :--
               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते.

(१०) इंदिरा गांधी :--
               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या
पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.

IQ Que

IQ Que. 👇

‘राजाराम हायस्कूल व कॉलेजची’ स्थापना कोल्हापूर येथे कोणी केली ?

(1)  वि. रा. शिंदे
(2)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(3)  सयाजीराव गायकवाड
(4)  छत्रपती शाहू महाराज. ✅

Explanation: 👇

✏भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असते. परंतु अनियमित पावसामुळे शेतकर्यांना काही महिने घरीच बसावे लागे. शेतकर्यांना त्यांच्या मालाचा रास्त भाव मिळण्यासाठी, अशा लोकांच्या उदरनिर्वाहार्थ 27 सप्टेंबर 1906 मध्ये ‘श्री शाहू स्पिनिंग अँण्ड विव्हिंग मिल’
ची स्थापना करण्यात आली.
इ.स. 1907 मध्ये कोल्हापूरच्या पश्चिमेला सुमारे 55 कि.मी. अंतरावर दाजीपूरनजीक भोगावती नदीला बंधारा घालून पाणीपुरवठा करण्याची योजना महाराजांनी आखली. आणि 1908 ला हा बंधारा बांधून ‘महाराणी लक्ष्मीबाई तलाव’ तयार केला. 1907 मध्ये सहकारी तत्त्वावर कापड गिरणी सुरू केली तसेच ‘निपाणी’ येथे डेक्कन रयत संस्था स्थापन केली. 1908 मध्ये राधानगरी नावाचे गाव वसविले. 1913 मध्ये सत्यशोधक समाजाची शाळा कोल्हापूर येथे सुरू केली. 25 जुलै 1917 रोजी महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केले, आणि 21 नोव्हेंबर 1917 पासून कोल्हापूर संस्थानातप्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. 1918 मध्ये कुळकर्णी वतने रद्द केली व कुळकर्णी करीत असलेली सर्व कामे तलाठ्यांकडे सोपविण्यात आली. तसेच 1918 मध्येकोल्हापुरात आर्य समाजाची स्थापना केली आणि राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेजची स्थापना शाहू महाराजांनी केली व नंतर त्यांची जबाबदारी आर्य समाजाकडे सोपविली.इ.स. 1907 साली अस्पृश्यांसाठी ‘मिस क्लार्क वसतिगृह’ सुरू केले. इ.स. 1919 मध्ये कायदा करून बलुतेदारी/वेठबिगारी पद्धती बंदकेली. यांचा भंग करणार्या व्यक्तीला 100 रु. दंडाची तरतूद केली. अस्पृश्य तरुणांची तलाठीपदावर नेमणूक केली. कांबळे या अस्पृश्य व्यक्तीला कोल्हापूरच्या चौकात चहाचे दुकान काढून दिले.इ.स. 1919 मध्ये अस्पृश्यांसाठी असलेल्या स्वतंत्र शाळा बंद पाडल्या व अस्पृश्यांच्या मुलांना शाळेतून इतर जातीच्या मुलांप्रमाणे दाखल करून घ्यावे असे धोरण जाहीर केले. उच्च शिक्षणासाठी सवलत देताना प्रथम शेती व मोलमजुरी करणार्यांच्या मुलांना, अस्पृश्य जातीच्या मुलांना सवलत द्यावी, त्यानंतर व्यापारी, सावकार, पुढारलेल्या ब्राह्मण जातीतील मुलांना सवलत द्यावी असे धोरण स्वीकारले. राजाराम कॉलेज सुरू केले. राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्या स्त्रियांसाठी फी माफ करण्यात आली. महाविद्यालयासाठी दरवर्षी 50,000 रु. अनुदान दरबारातून दिले. शिक्षकांसाठी ‘प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले.तांत्रिक शिक्षणाची आवड तरुणांमध्ये निर्माण व्हावी यासाठी ‘जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट’ ची स्थापना केली. या संस्थेत लोहारकाम, गवंडीकाम, सुतारकाम, यासारख्या विषयांचे शिक्षण दिलेजाई. विद्यार्थ्यांमध्ये लष्करी जीवना विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ‘इन्फन्ट्री स्कूल’ सुरू केले. अशाप्रकारे दरवर्षी सरकारी महसुलापैकी सहा टक्के शिक्षणावर खर्च केला जात होता.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

IQ Que 👇

मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला?
(1)  1809
(2)  1909 ✅
(3)  1919
(4)  1935

Explanation: 👇

✏1907 मधील सुरत येथील अधिवेशनात जहाल व मवाळ असे दोन गट पडले. याचा फायदा ब्रिटिशांनी घ्यायचेठरविले. मवाळांच्या अर्ज-विनंत्या काही प्रमाणात मान्य करून त्यांना खूश ठेवायचे तर दुसरीकडे जहालांना पकडण्यासाठी दडपशाही करायची. मवाळांना खूश करण्यासाठी 1909 मध्ये 'इंडियन कौन्सिल अँक्ट' हा कायदा पारित करण्यात आला. हाच मोर्ले-मिंटो कायदा होय.1909 च्या कायद्याने केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळाचा विस्तार केला आणि बहुमताचे तत्त्व मान्य करून काही प्रमाणात ते राबविले. या सुधारणेने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची योजना करून दुहीचे बीज पेरले. ही सुधारणा मवाळांना मुळात आवडली नसतानाही त्यांनी या योजनेला पाठिंबा द्यायचे ठरविले. त्यामुळे लोकांच्या मनातून ते अधिकच उतरले आणि जहालांना आपसुकच पाठिंबा मिळाला. लॉर्ड हार्डिंग या व्हॉईसरायने 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करून भारतीयांना खूश करण्याचा प्रयत्न केला; तसेच कलकत्त्याऐवजी दिल्ली ही देशाचीराजधानी बनविण्यात आली. 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले.याच काळात लोकमान्य टिळकांची सुटका झाली आणि स्वातंत्र्यलढ्याला पुन्हा एकदा दिशा मिळाली.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰



राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव


1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी

1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.




🔹ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :

👉1.संन्याशाचा उठाव
1765-1800
बंगाल
शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

👉2.चुआरांचा उठाव
1768
बंगाल-मिजापूर जिल्हा
जगन्नाथ घाला

👉3.हो जमातीचे बंड
1820
छोटा नागपूर व सिंग
भूम

👉4.जमिनदारांचा उठाव
1803
ओडिशा
जगबंधु

👉5.खोंडांचा उठाव
1836
पर्वतीय प्रदेश
दोरा बिसाई

👉6.संथाळांचा उठाव
1855
कान्हू व सिंधू

👉7.खासींचा उठाव
1824आसाम
निरत सिंग

👉8.कुंकिंचा उठाव
1826
मणिपूर

👉9.दक्षिण भारतातील उठाव

👉10.पाळेगारांचा उठाव
1790
मद्रास

👉11.म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव
1830
म्हैसूर

👉12.विजयनगरचा उठाव
1765
विजयनगर

👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव
1870
गोरखपूर

👉14.रोहिलखंडातील उठाव
1801
रोहिलखंड

👉15.रामोश्यांचा उठाव
1826
महाराष्ट्र
उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव
1824

👉17.केतूरच्या देसाईचा उठाव
1824
केतूर

👉18.फोंडा सावंतचा उठाव
1838

👉19.लखनऊ उठाव

👉21.भिल्लाचा उठाव
1825
खानदेश

👉21.दख्खनचे दंगे
1875
पुणे,सातारा,महाराष्ट्र
शेतकरी
---------------------------------------

रशियाचा इतिहास

🔹 🔹रशिया

🎯रशियाचा इतिहास🎯

🔵रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे.

🔴पूर्वेकडील स्लेव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्ची सुरुवात केली .

🔵रशियाची राजधानी *मॉस्को* आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात .

🔴जून १२, १९९० तारिखला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ ला मिळाली .

*🎯रशियन साम्राज्य-🎯*

🔵रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील *झारशाही* नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला.

🔴रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएट संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले.

*🔵पीटरने*एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले.

🔴पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला.

🔵या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात.

🔴इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले.

🔵हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले.

🔴 बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने *सेंट पीटर्सबर्ग* ही राजधानी उभारली.

🔵 एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर *एलिझाबेथ* बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले.

🔵कैथेरिन दुसरी किंवा *"महान कॅथेरिन"* हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.

🔴१९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' *सोविएट युनिअन 'चा इतिहास* असे म्हणत होते .

*🎯सोव्हियेत रशिया-🎯*

सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.

🔵सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. 

🔴सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती.

🔵जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी *ओब, येनिसी, लेना व अमूर* या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या.

*🔴आर्क्टिक* समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता.

🔵सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला *कास्पियन* समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल.

🔴सैबेरियातील *बैकाल सरोवर* जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती.

🔵१९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

🎯रशियाचा इतिहास🎯

🔵रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे.

🔴पूर्वेकडील स्लेव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्ची सुरुवात केली .

🔵रशियाची राजधानी *मॉस्को* आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात .

🔴जून १२, १९९० तारिखला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ ला मिळाली .

*🎯रशियन साम्राज्य-🎯*

🔵रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील *झारशाही* नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला.

🔴रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएट संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले.

*🔵पीटरने*एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले.

🔴पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला.

🔵या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात.

🔴इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले.

🔵हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले.

🔴 बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने *सेंट पीटर्सबर्ग* ही राजधानी उभारली.

🔵 एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर *एलिझाबेथ* बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले.

🔵कैथेरिन दुसरी किंवा *"महान कॅथेरिन"* हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.

🔴१९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' *सोविएट युनिअन 'चा इतिहास* असे म्हणत होते .

*🎯सोव्हियेत रशिया-🎯*

सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.

🔵सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. 

🔴सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती.

🔵जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी *ओब, येनिसी, लेना व अमूर* या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या.

*🔴आर्क्टिक* समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता.

🔵सुमारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला *कास्पियन* समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल.

🔴सैबेरियातील *बैकाल सरोवर* जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती.

🔵१९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

सराव प्रश्न

[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?
अ] बाबा पदमनजी
ब] ना. म. जोशी
क] बाळशास्त्री जांभेकर
ड] गोपाळ हरी देशमुख

उत्तर
क] बाळशास्त्री जांभेकर
-------------------
[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?
अ] गोपाळ कृष्ण गोखले
ब] आचार्य अत्रे
क] गोपाळ हरी देशमुख
ड] साने गुरुजी

उत्तर
क] गोपाळ हरी देशमुख
-------------------
[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी ______________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.
अ] मौलाना महमद अली
ब] हाकीम अजमल खान
क] बॅ. हसन इमाम
ड] मदन मोहन मालवीय

उत्तर
ब] हाकीम अजमल खान
{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.}
-------------------
[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?
अ] केसरी
ब] मराठा
क] अमृतबझार पत्रिका
ड] तरुण मराठा

उत्तर
क] अमृतबझार पत्रिका
{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.}
-------------------
[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?
अ] शाहू महाराज
ब] वि. रा. शिंदे
क] सयाजीराव गायकवाड
ड] बाबासाहेब आंबेडकर

उत्तर
क] सयाजीराव गायकवाड
{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.}
-------------------
[प्र.६] १९४१ साली ___________ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.
अ] रामराव देशमुख
ब] टी. जे. केदार
क] शंकरराव देव
ड] स. का. पाटील

उत्तर
अ] रामराव देशमुख
रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा
टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद
शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव]
-------------------
[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व ______ जिल्हे होते.
अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

उत्तर
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद}
{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.}
-------------------
[प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
अ] पंडित नेहरू
ब] वल्लभभाई पटेल
क] जे. बी. क्रपलनी
ड] एच. सी. मुखर्जी

उत्तर
ड] एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}
-------------------
[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
अ] पंडित नेहरू
ब] जे. बी. क्रपलनी
क] वल्लभभाई पटेल
ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद

उत्तर
ब] जे. बी. क्रपलनी
-------------------
[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
अ] सातव्या
ब] आठव्या
क] नवव्या
ड] दहाव्या

उत्तर
ब] आठव्या
{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}