Wednesday 6 April 2022

IQ Que

IQ Que. 👇

‘राजाराम हायस्कूल व कॉलेजची’ स्थापना कोल्हापूर येथे कोणी केली ?

(1)  वि. रा. शिंदे
(2)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(3)  सयाजीराव गायकवाड
(4)  छत्रपती शाहू महाराज. ✅

Explanation: 👇

✏भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असते. परंतु अनियमित पावसामुळे शेतकर्यांना काही महिने घरीच बसावे लागे. शेतकर्यांना त्यांच्या मालाचा रास्त भाव मिळण्यासाठी, अशा लोकांच्या उदरनिर्वाहार्थ 27 सप्टेंबर 1906 मध्ये ‘श्री शाहू स्पिनिंग अँण्ड विव्हिंग मिल’
ची स्थापना करण्यात आली.
इ.स. 1907 मध्ये कोल्हापूरच्या पश्चिमेला सुमारे 55 कि.मी. अंतरावर दाजीपूरनजीक भोगावती नदीला बंधारा घालून पाणीपुरवठा करण्याची योजना महाराजांनी आखली. आणि 1908 ला हा बंधारा बांधून ‘महाराणी लक्ष्मीबाई तलाव’ तयार केला. 1907 मध्ये सहकारी तत्त्वावर कापड गिरणी सुरू केली तसेच ‘निपाणी’ येथे डेक्कन रयत संस्था स्थापन केली. 1908 मध्ये राधानगरी नावाचे गाव वसविले. 1913 मध्ये सत्यशोधक समाजाची शाळा कोल्हापूर येथे सुरू केली. 25 जुलै 1917 रोजी महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केले, आणि 21 नोव्हेंबर 1917 पासून कोल्हापूर संस्थानातप्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. 1918 मध्ये कुळकर्णी वतने रद्द केली व कुळकर्णी करीत असलेली सर्व कामे तलाठ्यांकडे सोपविण्यात आली. तसेच 1918 मध्येकोल्हापुरात आर्य समाजाची स्थापना केली आणि राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेजची स्थापना शाहू महाराजांनी केली व नंतर त्यांची जबाबदारी आर्य समाजाकडे सोपविली.इ.स. 1907 साली अस्पृश्यांसाठी ‘मिस क्लार्क वसतिगृह’ सुरू केले. इ.स. 1919 मध्ये कायदा करून बलुतेदारी/वेठबिगारी पद्धती बंदकेली. यांचा भंग करणार्या व्यक्तीला 100 रु. दंडाची तरतूद केली. अस्पृश्य तरुणांची तलाठीपदावर नेमणूक केली. कांबळे या अस्पृश्य व्यक्तीला कोल्हापूरच्या चौकात चहाचे दुकान काढून दिले.इ.स. 1919 मध्ये अस्पृश्यांसाठी असलेल्या स्वतंत्र शाळा बंद पाडल्या व अस्पृश्यांच्या मुलांना शाळेतून इतर जातीच्या मुलांप्रमाणे दाखल करून घ्यावे असे धोरण जाहीर केले. उच्च शिक्षणासाठी सवलत देताना प्रथम शेती व मोलमजुरी करणार्यांच्या मुलांना, अस्पृश्य जातीच्या मुलांना सवलत द्यावी, त्यानंतर व्यापारी, सावकार, पुढारलेल्या ब्राह्मण जातीतील मुलांना सवलत द्यावी असे धोरण स्वीकारले. राजाराम कॉलेज सुरू केले. राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्या स्त्रियांसाठी फी माफ करण्यात आली. महाविद्यालयासाठी दरवर्षी 50,000 रु. अनुदान दरबारातून दिले. शिक्षकांसाठी ‘प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले.तांत्रिक शिक्षणाची आवड तरुणांमध्ये निर्माण व्हावी यासाठी ‘जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट’ ची स्थापना केली. या संस्थेत लोहारकाम, गवंडीकाम, सुतारकाम, यासारख्या विषयांचे शिक्षण दिलेजाई. विद्यार्थ्यांमध्ये लष्करी जीवना विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ‘इन्फन्ट्री स्कूल’ सुरू केले. अशाप्रकारे दरवर्षी सरकारी महसुलापैकी सहा टक्के शिक्षणावर खर्च केला जात होता.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

IQ Que 👇

मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला?
(1)  1809
(2)  1909 ✅
(3)  1919
(4)  1935

Explanation: 👇

✏1907 मधील सुरत येथील अधिवेशनात जहाल व मवाळ असे दोन गट पडले. याचा फायदा ब्रिटिशांनी घ्यायचेठरविले. मवाळांच्या अर्ज-विनंत्या काही प्रमाणात मान्य करून त्यांना खूश ठेवायचे तर दुसरीकडे जहालांना पकडण्यासाठी दडपशाही करायची. मवाळांना खूश करण्यासाठी 1909 मध्ये 'इंडियन कौन्सिल अँक्ट' हा कायदा पारित करण्यात आला. हाच मोर्ले-मिंटो कायदा होय.1909 च्या कायद्याने केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळाचा विस्तार केला आणि बहुमताचे तत्त्व मान्य करून काही प्रमाणात ते राबविले. या सुधारणेने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची योजना करून दुहीचे बीज पेरले. ही सुधारणा मवाळांना मुळात आवडली नसतानाही त्यांनी या योजनेला पाठिंबा द्यायचे ठरविले. त्यामुळे लोकांच्या मनातून ते अधिकच उतरले आणि जहालांना आपसुकच पाठिंबा मिळाला. लॉर्ड हार्डिंग या व्हॉईसरायने 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द करून भारतीयांना खूश करण्याचा प्रयत्न केला; तसेच कलकत्त्याऐवजी दिल्ली ही देशाचीराजधानी बनविण्यात आली. 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले.याच काळात लोकमान्य टिळकांची सुटका झाली आणि स्वातंत्र्यलढ्याला पुन्हा एकदा दिशा मिळाली.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰



No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...