Ads

09 January 2020

मिसाइल स्ट्राइकनंतर अमेरिकेच्या विमानांना इराक, इराण, ओमानमधून उड्डाणांवर बंदी

अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन इराण, इराक, ओमान आणि इराण-सौदी अरेबियाच्या सागरी हद्दीतून अमेरिकन प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून FAA कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन तळांवर बारापेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. मध्य आशियात वाढलेला राजकीय तणाव आणि लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने हा निर्णय घेतला आहे. अमेरिका वगळता अन्य देशांच्या प्रवासी विमानांची या भागातून उड्डाणे सुरु आहेत.

एफएएच्या बंदीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. पण अन्य देश सुद्धा FAA चा सल्ला गांभीर्याने घेतात.

फेडरल एव्हिएशनने ताजा निर्णय घेण्याआधीच अमेरिकन प्रवासी विमान कंपन्यांना इराक, इराण, ओमान या भागातून २६ हजारफुटापेक्षा कमी उंचीवरुन उड्डाण करण्यास मनाई केली होती. जूनमध्ये इराणने अमेरिकेचे टेहळणी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. इराकमधील अमेरिकन तळावरील हल्ल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेडने इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment