Thursday 9 January 2020

नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” : परराष्ट्र मंत्रालयातला नवा विभाग

भारत सरकारच्या केंद्रीय परराष्ट्र कल्याण मंत्रालयाने 1 जानेवारी 2020 रोजी घोषणा केली की नवी दिल्लीत मंत्रालयात “नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” नावाने एका नव्या विभागाची स्थापना करण्यात येणार आहे.

वेगाने वाढणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेत अश्या पुढाकाराने परकीय संबंधातून तंत्रज्ञान क्षेत्रात होणार्‍या गुंतवणुकीला आकर्षित करण्याला प्रोत्साहन मिळणार. सध्या भारत देशात 5G नेटवर्क तंत्रज्ञान आणण्यासाठी त्याच्या क्षेत्रात चाचण्यांमध्ये भाग घेण्यासाठी ह्यूवेई कंपनीसारख्या मोठ्या उद्योगांना परवानगी देण्याच्या विचारार्थ सरकार आहे.

ठळक बाबी:-

NEST विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्द्यांकरिता मंत्रालयात एक केंद्र म्हणून काम करणार.
5G आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये परदेशी भागीदारांचे सहकार्य घेण्यामध्ये नवा विभाग मदत करणार.

स्थानिक भागधारक आणि परदेशी भागधारक यांच्यादरम्यान समन्वय ठेवण्यासाठी तसेच भारताच्या विकासाची प्राथमिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन धोरणे ठरविण्यामध्ये या विभागाची मदत होणार आहे.

नवा विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संसाधनांविषयीची परकीय धोरणे आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकट अश्या बाबींचे मूल्यांकन करणार आणि योग्य परकीय धोरण निवड करण्याविषयीची शिफारस करण्यास देखील मदत करणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

यकृत शरीर रचना

👉यकृत उदर पोकळीच्या उजव्या-उजव्या भागामध्ये डायाफ्रामच्या खाली आणि पोट, उजवीकडे मूत्रपिंड आणि आतड्यांच्या वर स्थित आहे. 👉शकूच्या आकाराचे, ...