Thursday 9 January 2020

पहिले भारतीय ICS सत्येंद्रनाथ टागोर

भारतीय नागरी सेवेत निवडून गेलेले पहिले भारतीय म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर होत. आज त्यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी...

👍 *प्रथमच भारतीयांची निवड* : 1832 मध्ये मुन्सिफ आणि सदर अमीन यांची पदे भारतीयांसाठी तयार करून या पदावर भारतीयांची नेमणूक करण्यात आली. यापूर्वी ब्रिटीश कालीन राज्यात फक्त ब्रिटिशांची निवड होत होती. मात्र 1833 मध्ये, उप-दंडाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या पदावरही भारतीयांना निवडण्याची परवानगी देण्यात आली.

● भारतीय सिव्हिल सर्व्हिसची स्थापना भारतीय नागरी सेवा कायदा 1861 अंतर्गत करण्यात आली.
● सत्येंद्रनाथ जून 1863 मध्ये प्रथमच निवडून आले. त्यानंतर ते प्रशिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. नोव्हेंबर 1864 मध्ये ते परत आले.
● सत्येंद्रनाथ यांनी 1865 मध्ये सहाय्यक दंडाधिकारी व अहमदाबादचे जिल्हाधिकारी या पदावर काम सुरू केले.
● ते सुमारे 30 वर्षे नागरी सेवेत राहिले. त्या दिवसांमध्ये अधिकाऱ्यांना कर वसूली करण्याचे मुख्य काम होते.
● 1896 मध्ये ते महाराष्ट्रातील सातारा येथे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.
● सत्येंद्रनाथ हे एक प्रसिद्ध लेखक, बहुभाषा जाणकार, गीतकार होते. ते महान कवी रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू होते.
● सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 रोजी कोलकाता येथे झाला. तर 9 जानेवारी 1923 ला कोलकाता येथेच त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला.

📚 *सत्येंद्रनाथ यांचे साहित्य* :

• बौद्धधर्म (1901) हा ग्रंथ बंगाली साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण.
• बोम्बाई चित्र (1888), आत्मचरित्र :आमार बाल्यकथा ओ बोम्बाई प्रवास (1915).
• नाटके : सुशीला, वीरसिंह.
• कालिदास यांच्या मेघदूताचा बंगाली अनुवाद व नवरत्नमाला, स्त्री स्वाधीनता आदी ग्रंथ उल्लेखनीय.

📌 *विशेष* : सत्येंद्रनाथ मराठी भाषेचे उत्तम जाणकार होते, त्यांनी लो. टिळकांच्या गीतारहस्याचा बंगालीत अनुवादही केला.

सत्येंद्रनाथ पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानदानंदिनी देवींना पुढाकार घ्यावयास लावून स्त्रीमुक्ती-आंदोलनास हातभार लावला. ज्ञानदानंदिनी देवींनी कुटुंबातील पडदापद्धती झुगारत रूढीविरुद्ध बंड पुकारले.

राजभवनात व्हाईसरॉयकडून सत्कार होणाऱ्‍या त्या पहिल्या भारतीय महिला होत. त्यावेळी बंगालमध्ये राष्ट्रीय गीत म्हणून गाजलेले ‘मिले राबे भारत संतान’ हे गीत सत्येंद्रनाथांनी लिहिले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...