२९ एप्रिल २०२०

भीमा नदी


भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

🔹लांबी ७२५ किमी (४५० मैल)

🔹उगम स्थान उंची १,१०० मी (३,६०० फूट)

🔹पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४८,६३१

🔹उपनद्या - कुंडली घोड, नीरा, सीना, इंद्रायणी, मुळा, वेळ

🔹धरणे - उजनी धरण

भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.

भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.

भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ ४६,००० चौरस कि.मी.आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळ्यात भीमेला अनेकदा पूर येतो.

भीमा नदीवर एकूण बावीस धरणे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...