चालू घडामोडी

1) २०१९ चे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे?

2) रॉकेट-क्षेपणास्त्र डागण्याची व्यवस्था, दूरवर मारा करू शकणारी बंदूक यासह आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण रुद्र हेलिकॉप्टरची तुकडी कोणत्या दलासाठी स्थापन झाली आहे?

3) आयुकाने कोणत्या विद्यापीठासोबत ‘सितारा प्रकल्प’ सुरु केला आहे?

4) बिलगेट्स फाऊंडेशनच्या वतीने कोणाला ‘ग्लोबल गोलकिपर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

5) ज्या पेशींना अजून निश्चित रचना लाभलेली नाही, परंतु कालांतराबे विशिष्ट प्रकारच्या पेशींचे स्वरूप ज्या धारण करू शकतील अशा पेशींना काय म्हणतात?

6) मानवी शरीरातील रक्ताची निर्मिती कोणत्या ठिकाणी होते?

7) विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक उमेदवार असलेला मतदारसंघ कोणता?

8) विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वांत कमी उमेदवार असलेला मतदारसंघ कोणता?

9) देशातील सर्वांत मोठी, सार्वजनिक तेल व वायू विक्री आणि विपणन कंपनी कोणती?

10) विधानसभा निवडून २०१९ साठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्याला काय नाव देण्यात आले आहे?

11) निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यादांच ‘क्‍यूआर कोड’च्या माध्यमातून मतदारांची ओळख पटविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी कोणते नवीन ॲप तयार करण्यात आले आहे?

12) कोणत्या दिवशी जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो?

13) १७ व्या जागतिक मैदानी स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवून पहिले स्थान कोणत्या देशाने प्राप्त केले आहे?

14) इंग्लंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तरे :
१) डॉ. विल्यम जी. केलीन ज्युनियर (अमेरिका),
सर पीटर जे. रॅटक्लिफ (अमेरिका)
ग्रेग एल. सेमेन्झा (ब्रिटन),
२) भारतीय लष्कर,
३) पुणे विद्यापीठ,
४) नरेंद्र मोदी,
५) मूल पेशी,
६) अस्थीमज्जा (बोन मॅरो),
७) नांदेड दक्षिण (३८),
८) चिपळूण (३),
९) भारत पेट्रोलियम कार्पोरेशन ऑफ इंडिया (BPCL) (देशातील इंधन व्यवसायात वाट : २३.४०%),
१०) शपथनामा,
११) बूथ ॲप,
१२) ९ ऑक्टोबर (यंदा ५० वे वर्ष),
१३) अमेरिका (२९ पदके),
१४) ख्रिस सिल्व्हरवूड
===================

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...