केंद्रीय दक्षता आयोगाचे संजय कोठारी नवे आयुक्त.

🔰राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून जारी एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.देशाची भ्रष्टाचारविरोधी सर्वोच्च संस्था केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी) प्रमुख के. व्ही. चौधरी यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी जूनपासून हे पद रिक्त होते.

🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एका उच्चस्तरीय निवड समितीने फेब्रुवारीत कोठारी यांच्या नावाची शिफारस केली होती.त्यावेळी काँग्रेसने याचा विरोध करीत दक्षता आयुक्त नियुक्तीसाठीची प्रक्रिया बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचे म्हटले होते.

🔰1978च्या बॅचचे कोठारी हे हरयाणा केडरचे आयएएस अधिकारी होते. 2016 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना पीईएसबीचे प्रमुख म्हणून नेमले होते.
तर जुलै 2017 मध्ये त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव नियुक्त केले होते. दक्षता आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती एका निवड समितीच्या शिफारशीवर करतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...