Wednesday 29 April 2020

करोनाची नवीन लक्षणे जाहीर

- करोना संसर्गाच्या लक्षणात सहा नवीन घटकांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे त्यांचाही विचार निदान करताना करणे गरजेचे आहे.

- अमेरिकेतील यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने या लक्षणांचा समावेश केला आहे.

- नवीन लक्षणांमध्ये थंडी वाजून येणे, थंडी वाजून अंग शहारणे, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसा धरणे, चव किंवा वास संवेदना जाणे यांचा समावेश आहे. या आधी सीडीसीने जी लक्षणे जाहीर केली होती त्यात ताप, क फ, श्वास घेण्यात अडचण या लक्षणांचा समावेश करण्यात आला होता.

- करोनाच्या संसर्गात सौम्य व तीव्र प्रकारात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात असे सीडीसीचे मत आहे. विषाणूशी संपर्क आल्यापासून २ ते १४ दिवसांत ही लक्षणे दिसू शकतात. यात छातीत दाबल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे, श्वसनात त्रास होणे, चेहरा व ओठ निळसर दिसणे, उठून बसता न येणे अशीही काही लक्षणे आहेत.

-  अमेरिकेत आतापर्यंत करोनाने ५४ हजार बळी गेले असून ९ लाख ६५ हजार लोकांना संसर्ग झाला आहे.
सहा नवी लक्षणे
* थंडी वाजून येणे
* थंडी वाजून अंग शहारणे
* स्नायूदुखी
* डोकेदुखी
* घसा धरणे
* चव व वास संवेदना तात्पुरती जाणे

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...