Monday 20 July 2020

चालू घडामोडी


.........................................................
• सीमा रस्ते संस्था (BRO) ने................हा पूल पूर्णपणे बदलण्यासाठी ‘प्रोजेक्ट अरुणक’ आरंभ केला
- डापोरीजो पूल (अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात).

• केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने EPF ग्राहकांकडून तीन महिन्यांपर्यंत मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या रकमेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या ____पर्यंत, जे कमी असेल, आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली
- 75 टक्के.

• पहिल्यांदाच, भारतीय स्टेट बँकेने (SBI)................. इतक्या रकमेचे ग्रीन बॉन्ड उभारले आहेत जे SBIच्या लंडन शाखेत सिंगापूर SGX वर सूचीबद्ध केले जातील
- 100 दशलक्ष डॉलर.

• नवी दिल्लीच्या AIIMS संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले टेलीमेडिसिन केंद्र, ज्याद्वारे तज्ञ डॉक्टर देशभरातल्या तज्ञांशी संपर्क साधतील
- CoNTeC (कोविड-10 राष्ट्रीय दूर-सल्लामसलत केंद्र).

• 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाच्या मुक्तिसाठी चालविण्यात आलेल्या हवाई मोहिमांमध्ये नेतृत्व करणारे निवृत्त एअर वाइस-मार्शल........... यांचे 29 मार्च रोजी निधन झाले
– चंदन सिंग राठौड.

• .................या राज्य विधानसभेने 30 मार्च 2020 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला त्याच्या एकत्रित निधीतून 1.55 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे विनियोजन विधेयक एकमताने मंजूर केले
- ओडिशा.

• ..............या भारतीय संस्थेने विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी ‘कोरोनटाईन’ (CORONTINE) नावाचे एक व्यासपीठ तयार केले
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.

• ICICI लोंबार्ड कंपनीने ................. या व्यापारी देयक व्यासपीठासह भागीदारीत दुकानदारांसाठी 'कोविड-19 संरक्षण विमा' सेवा सुरू केली
– भारत पे.

• जगातले सर्वात थंड महाद्वीप जिथे शास्त्रज्ञांनी सन 2019-20 उन्हाळ्यात प्रथमच उष्णलहरीच्या घटनेची नोंद केली
- अंटार्क्टिका.

• लिबियावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शस्त्रास्त्र बंदीची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ................ या देशाने भूमध्य समुद्रात ‘ऑपरेशन इरिनी’ नावाने नौदल मोहीम सुरू करण्याची घोषणा केली
– युरोपिय संघ.

• सध्या चालू असलेल्या देशव्यापी बंदीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उत्पादनांचा पुरवठा सुलभ करण्यासाठी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) यांच्या वतीने घेण्यात आलेला पुढाकार
- 'फूड सोल्जर प्रोजेक्ट'.

• .............या राज्य सरकारने कोविड-19 संकटातून निघण्यासाठी व्यवसाय आणि लोकांना मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षात वीज दरात सरासरी 8 टक्के कपात करण्याची घोषणा केली – महाराष्ट्र.

• आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिन
- 31 मार्च.

• तामिळनाडूच्या करुर शहरात दैनंदिन किरकोळ व्यवहार करण्यासाठी ‘एन्कासू’ नावाचे भारताचे पहिले प्री-पेड कार्ड सादर करणारी ......... ही बँक होय
– करुर वैश्य बँक.

• 'लाइफलाईन उडान फ्लाइट्स' उपक्रमाच्या अंतर्गत सतत वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी भारत आणि........... या देशात "कार्गो एअर ब्रिज" उभारण्याची सरकारने घोषणा केली
- चीन.

• 31 मार्च 2020 रोजी झालेल्या आभासी “जी-20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्री बैठक” याचे अध्यक्षपद ........... होते
- सौदी अरब.

• संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) या गटाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘ठराव 2518’ मंजूर केला
- शांती सैनिक.

•  ‘द डेथ ऑफ जीसस’ या कादंबरीचे लेखक
- जे. एम. कोएत्सी.

• वाहनांसाठी ई-पास देण्याकरिता ...........या राज्य सरकारने ‘प्रग्यान अॅप’ सुरू केले
- झारखंड.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...