Monday 20 July 2020

महान क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त


🔸कानपूरात शिकत असताना भगतसिंग यांच्याशी त्यांची ओळख झाली.त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते सुरुवातीला कानपूरमध्ये 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' या क्रांतीकारी संघटनेत कार्य करू लागले...

🔸या संघटनेत काम करत असतानाच त्यांनी बाँब बनविण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक बाँब बनविण्याचा कारखाना गुप्तपणे चालू करण्यात आला...

🔸लाहोर येथे सायमन आयोगाविरुद्ध निदर्शने करताना झालेल्या जबर लाठीहल्ल्यात ज्येष्ठ क्रांतिकारक लाला लजपतराय हे जखमी होऊन पुढे त्यांचे निधन झाले (१९२८).

🔸या घटनेमुळे ब्रिटिशांच्या विरोधात देशभर तीव्र असंतोषाची लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाठीहल्ल्याचा मुख्य सूत्रधार पोलीस अधिकारी स्कॉट याचा खून करण्याचे ठरविले...

🔸तथापि या हल्ल्यात स्कॉट ऐवजी दुसरा पोलीस अधिकारी साँडर्स मारला गेला.तेव्हा लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतल्याची पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली...

🔸त्यातच ब्रिटिश सरकारला अनिर्बंध सत्ता व अधिकार मिळवून देणारी दोन अन्यायकारक विधेयके (Trade Dispute Bill व Public Safety Bill) ब्रिटिश सरकार लादणार होते...

🔸या विधेयकांना विरोध करण्यासाठी व लालाजींच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी दिल्लीच्या कें.विधानसभेत बाँब टाकण्याचे ठरविले...

🔸सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जातून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी कोणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या सभागृहात बाँब फेकला,हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके भिरकावली...

🔸त्यांच्या निषेधपत्रात ‘बहिऱ्या झालेल्या लोकांसाठी हा मोठा आवाज असून खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी बलिदान चालू आहेʼ,असा मजकूर होता...

🔸त्यानंतर पळून न जाता दोघेही ‘इन्किलाब जिंदाबादʼ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले...

🔸भगत व दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.तर तत्पूर्वीच्या लाहोर येथील साँडर्स हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवून भगतसिंग आणि त्यांचे सहकरी सुखदेव, राजगुरू यांना पुढे फाशीची शिक्षा सुनावली...

🔸आपल्याला फाशी झाली नाही म्हणून बटुकेश्वर दत्त दु:खी होते.परंतु क्रांतिकारक फासावर लटकूनच नाही,तर जिवंतपणी कारागृहात मरणयातना भोगूनसुद्धा लढा देतात, अशा शब्दांत भगतसिंगांनी त्यांची समजूत घातली...

🔸अंदमानच्या कारागृहातही दत्त यांनी उपोषण करून इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवला...

🔸महात्मा गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली (१९३८)...

🔸छोडो भारत आंदोलनात भाग घेतल्यावरून पुन्हा त्यांना 4 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.या दरम्यान त्यांना क्षयरोगाचाही सामना करावा लागत होता.पुढे १९४५ साली त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली...

🔸भारतीय स्वातंत्र्यानंतर ते राजकीय प्रसिद्धीपासून दूरच राहिले.अंजली या युवतीशी त्यांनी विवाह केला (१९४७) व पाटणा येथे स्थायिक झाले..

🔸दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावरील अंत्यसंस्कार हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिस्थळाशेजारी हुसेनीवाला (पंजाब) येथे करण्यात आले...

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...