Thursday 26 November 2020

लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल.


🔰ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचं प्रमाण हे 39 टक्के आहे. गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे 47 टक्के लोकांचं म्हणणं आहे.सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावलं उचलत असल्याचं या सर्व्हेत सहभागी झालेल्या 63 टक्के लोकांचं म्हणणं आहे.


🔰भारतात 46 टक्के लोक आपलं काम करुन घेण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे.

तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणारे 32 टक्के लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी जर असं केलं नाही तर त्याचं काम होतच नाही.


🔰भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कंबोडिया. या देशात 37 टक्के लोक लाच देतात. यानंतर भ्रष्टाचाराचं प्रमाणं 30 टक्के असल्याने इंडोनेशिया तिसऱ्या स्थानी आहे. तर सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश आहेत मालदीव आणि जपान. या दोन्ही देशांमध्ये दोन टक्के लोकच लाच घेतात.


🔰आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा  दर 10 टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये 12 टक्के लोकचं भ्रष्टाचार करतात. मात्र, या सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने ‘ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया’या नावाने आपला अहवाल सादर केला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...